Sikkim Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण सिक्कीम या राज्याची माहिती पाहणार आहोत.चला मग पाहूया सिक्कीम या राज्याविषयी आणखीन माहिती.
सिक्किम राज्याची संपूर्ण माहिती Sikkim Information In Marathi
सिक्कीम हे राज्य 16 मे 1975 ला भारताचा अविभाज्य भाग झाले असून सिक्कीमचे सर्वात मोठे शहर गंगटोक हे आहे. सिक्कीम हे हिमालय डोंगररांगात वसलेले राज्य आहे. पश्चिमेला नेपाळ, उत्तरेला तिबेट, पूर्वेला भूतान हे देश तर दक्षिणेला पश्चिम बंगाल हे भारतीय राज्य. सिक्किम हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे लहान राज्य आहे. (पहिल्या क्रमांकाचे लहान राज्य गोवा हे आहे.
सिक्किम राज्य त्याच्या जैवविविधतेमुळे देशभर ओळखले जाते. उष्णकटिबंधीय वातावरणामुळे हे राज्य देशभर प्रसिद्ध आहे. या राज्यात दरवर्षी मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय फुल महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये साधारणत: राज्यभरातून सुमारे 5000 प्रकारच्या फुलांची झाडे, प्रजाती दिसून येतात.
सिक्कीम राज्याची स्थापना
सिक्कीम हे राज्य 16 मे 1975 ला भारताचा अविभाज्य भाग झाले असून सिक्कीमचे सर्वात मोठे शहर गंगटोक हे आहे. सिक्कीम हे हिमालय डोंगररांगात वसलेले राज्य आहे.सिक्किम हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे लहान राज्य आहे.
गंगटोक हे राजधानीचे सर्वात मोठे शहर आहे.सिक्कीम हे नाम ग्याल राजशाहीने शासित एक स्वतंत्र राज्य होते, परंतु प्रशासकीय समस्यांमुळे आणि भारतात विलीन होण्याच्या सार्वमतमुळे, १९७५ मध्ये झालेल्या सार्वमतानुसार ते भारतात विलीन झाले. त्याच सार्वमतानंतर राजशाही संपुष्टात आली आणि भारतीय संविधानाच्या शासन व्यवस्थेच्या चौकटीत लोकशाही उदयास आली.
इतिहास
सिक्कीममध्ये सतराव्या शतकापर्यंत नामग्याल राजघराण्याची एकसत्ताक पद्धत रूढ होती. राजा तेन सिंग न्यामग्याल ने युकसोम येथून राजधानी हलवून रबदानसे येथे नेली. पण नेपाळ व भूतान यांच्याकडून सतत होणाऱ्या स्वाऱ्यांनी या छोट्या राज्याची व रहिवाश्यांची वाताहात झाली.
ब्रिटिश काळात सिक्कीमचे तत्कालीन हिंदुस्थानच्या मदतीने नेपाळशी युद्ध झाले. त्या वेळी सिक्कीमने ब्रिटिश इंडिया व नेपाळशी अनुक्रमे सुगोली, तितालिया करार करून हस्तगत केलेला भाग परत मिळवला. भारताचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९८४ पर्यंत सिक्कीम भारताचे संरक्षित क्षेत्र बनले.
सिक्कीमच्या संरक्षण,परराष्ट्र,आणि दळणवळणाची जबाबदारी सरकारने स्वीकारली. भारताबरोबर घनिष्ठ संबंध असावेत अशी इच्छा सिक्कीमने १९८४ मध्ये व्यक्त केली. त्यानुसार सिक्कीमला सहयोगी राज्य घोषित करण्यात आले.यामुळेही सिक्कीमच्या आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत.
म्हणून १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींच्या राजवटीत सार्वमत घेऊन सिक्कीम भारतीय संघराज्यात सामील झाले व ते भारताचे एक राज्य म्हणून गणले जाऊ लागले. सिक्कीम हे तीन दिशांनी वेगवेगळ्या सीमांनी बंदिस्त असल्याने संरक्षणदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे, त्यामुळे भारतीय लष्कराचे तेथे वर्चस्व आहे.
भूगोल
डोंगराळ भाग असल्याने सतत दरड कोसळणे, पावसाने रस्ते वाहून जाणे, भूकंप वगैरे आपत्तींना सिक्कीम येथील रहिवाशांना सामोरे जावे लागते.
एकीकडे कांचनगंगासारखी बर्फाच्छादित हिमशिखरे आणि दुसरीकडे वसंतात डोळ्यांचे पारणे फेडायला लावणारी फुलणारी विविध प्रकारची फुले अशा दोन्ही टोकाच्या गोष्टी सिक्कीममध्ये आहेत. नेपाल, तिबेट, भूतान आणि बंगाल असे चारही दिशांनी बंदिस्त असे सिक्कीम हे हिमालयाच्या कुशीत असलेले एक छोटे राज्य आहे.
हिमालयातील स्थानामुळे सिक्कीमच्या प्राकृतिक रचनेत टोकाची तफावत आढळते. येथील खोल दरी प्रदेशातील सस.पासूनची किमान उंची ३०० मी. असून ती कमाल ८,५९८ मी. पर्यंत वाढत गेलेली आहे. सिक्कीमला पश्चिम, उत्तर व पूर्व अशा तिन्ही दिशांच्या पर्वतश्रेण्यांनी वेढलेले असून त्यामुळे सिक्कीमचा सर्वसाधारण आकार घोड्याच्या नालेसारखा दिसतो.
उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेल्या दोन विदीर्ण कटकांमुळे सिक्कीमच्या पश्चिम व पूर्व सरहद्दी सीमित केलेल्या आहेत. त्यांपैकी पश्चिमेकडील नेपाळ-सिक्कीम यांच्या सरहद्दीवर सिंगलिला कटक आहे. याच श्रेणीत कांचनजंघा (उंची ८,५९८ मी.) हे एव्हरेस्ट व के-टू नंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे.
सिक्कीमी लोक या शिखराला पवित्र मानतात. येथे बर्फाचे अनेक मीटर जाड थर असून गुरुत्व व न पेलणारे त्याचे वजन यांमुळे हिमनद्या व हिमप्रपात यांच्या स्वरुपात ते खाली येतात. जगातील सर्वांत मोठे हिमलोट येथेच होतात. उत्तर सिक्कीममध्ये या बर्फकड्यांची नेहमीच धास्ती असते. ते केव्हा घसरतील याचा नेम नसतो.
बर्फाच्या हालचाली होत असताना होणाऱ्या आवाजांमुळे वातावरणात एक प्रकारची भेसूरता निर्माण होते. पूर्वेस सिक्कीम-तिबेट सरहद्द डोंख्या श्रेणीने निश्चित केलेली आहे.
या दोन कटकांच्या मध्ये सिक्कीम खोरे असून या खोऱ्याच्या उत्तरेस पसरलेल्या हिमालयाची बहिर्वक्र श्रेणी व तिच्यावरील उंच शिखरांनी तिबेटपासून सिक्कीम अलग केले आहे.
विदारणामुळे सिक्कीममध्ये खडक उघडे पडलेले असून कड्यांच्या अनेक मालिका तिबेट-सिक्कीम सीमेवर दृष्टीस पडतात. येथील हिमालयाच्या भागाला सिक्कीम हिमालय असे म्हणतात. या श्रेणीत स्फटिकमय खडकरचना आहे.
हवामान
सिक्कीमच्या हवामानात उंचीनुसार प्रदेशपरत्वे विविधता आढळते. सखल खोऱ्यात उष्णकटिबंधीय, १,००० मी. पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात समशीतोष्ण कटिबंधीय, तर उंच पर्वतीय प्रदेशातील माथ्याच्या भागात अल्पाइन किंवा आर्क्टिक प्रकारचे शीत हवामान आढळते.
उंच पर्वतीय माथे कायम हिमाच्छादित असून तेथील बर्फाच्या थरांची जाडी ३० मी. पर्यंत आढळते. हिमालयातील सर्वाधिक आर्द्र प्रदेशांपैकी हा एक प्रदेश आहे. वार्षिक पर्जन्यमान १२७ ते ५०८ सेंमी. यांदरम्यान असून ते प्रामुख्याने नैर्ऋत्य मान्सून वाऱ्याच्या काळात मे–ऑक्टोबर या महिन्यांत असते. पर्जन्यमानात उंचीनुसार तफावत आढळते.
नद्या
सिक्कीम हे राज्य छोटे असले तरी राज्यामधून बऱ्याच नद्या वाहतात. धरला, जालधका, लाचेन, लाचुंग, ल्होनाक, ताकचांग, रांगीत, रांगपो चू, रानीखोला, राटे चू, रेल्ली, रोरा चू, तालुंग, तिस्ता या नद्या सिक्कीम मधून वाहतात.
राज्यात हिमालय पर्वत आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर सिक्कीममध्ये आहे. कांचनगंगा असे या हिमालय शिखराचे नाव आहे.
लोकसंख्या
सिक्कीमचे भौगोलिक क्षेत्रफळ 7096 चौरस किलोमीटर आहे.
2011 च्या जनगणनेनुसार सिक्कीमची लोकसंख्या 6,07,688 इतकी आहे. राज्यात साक्षरतेचे प्रमाण 82.20 टक्के इतके आहे. राज्यात चार जिल्हे आहेत.
भुतिया, लेपचा, आइम, नेपाळी वांशिक जमातीची मिळून सिक्कीमची लोकसंख्या आहे.
भोटिया, चुंबीपा, दोपथापा, दुकपा, कगाटे, शेरपा, तिबेटन, ट्रोमोपा, योलमो, लेप्चा आदी आदिवासीही सिक्कीममध्ये राहतात.सिक्कीममधील बहुसंख्य जनता नेपाळी वंशाची असून बौद्ध हा येथील प्रमुख धर्म आहे.
संस्कृती आणि धर्मात, सिक्किमचा तिबेटशी आणि भूतानशी जवळचा संबंध होता, आणि सिक्कीमचा पहिला राजा तिबेटहून स्थलांतरित झाला. सिक्कीमची भूतानसोबत सीमा देखील आहे. येथे, प्रामुख्याने पूर्व आणि मध्य नेपाळमधील नेपाळी लोकांच्या मोठ्या सांख्येची उपस्थिती देखील नेपाळशी सांस्कृतिक संबंध निर्माण करते.
सिक्कीम राज्याची माती व खनिजे
तिस्ता व रंगीत नद्यांच्या खोऱ्यात गाळाच्या मृदा आढळून येतात. जास्त पावसामुळे पर्वतीय प्रदेशातील मृदा धुपून गेलेल्या आढळतात.
राज्यात चांदी, तांबे, शिसे, जस्त, लोहखनिज, ग्रॅफाइट, संगजिरे, दगडी कोळसा, रत्ने, पायराइट, संगमरवर इ. खनिजद्रव्यांचे उत्पादन होते.
भाषा
सिक्किम राज्यात अकरा भाषांसाठी राजमान्यता आहे. नेपाळी, सिक्कीमीज, हिंदी, लेप्चा, तमांग, नेवारी, राइ, गुरूंग, मगार, सनवार आणि इंग्रजी इतक्या भाषा सिक्कीमला बोलल्या जातात.
राजमान्यता नसली तरी लिंबू, शेरपा, भोटीया, कागती, रोंग, तिबेटन या बोलीभाषाही बोलल्या जातात. राज्यात काही आदिवासी लोक राहतात. त्या आपल्या घटक बोली- मायबोली बोलतात.
सिक्किम मधील शेती व्यवसाय
सिक्कीम राज्याची कृषिप्रधान अर्थव्यवस्था आहे. येथे मका, भात, गहू, बटाटे. विलायची, मसाला, आले व संत्री ही प्रमुख पिके घेतली जातात. देशातील विलायचीचे देशात सर्वात जास्त उत्पादन येथे होते. बटाटे, आले, संत्री व बिगर हंगामी भाजीपाला ही इतर नगदी पिके आहेत. सिक्कीममध्ये सेंद्रीय शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.
ग्रामीण विकासाच्या दृष्टीने उद्यानशेती व पुष्पशेती महत्त्वाची ठरत आहे. भाजीपाला व फुलांच्या उत्पादनांसाठी हरितगृहांचा वापर वाढत आहे. सेंद्रिय शेतीवर अधिक भर दिला जात आहे.
पाण्याच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी तलाव बांधण्यात आले आहेत. त्यासाठी इझ्राएल व हॉलंडचे तंत्रज्ञान वापरले जाते. पर्जन्यजल साठवणीचे प्रयोगही केले जात आहेत.
सिक्कीम राज्यात शेती बरोबर जोडधंदे ही केले जातात.शेळ्या, मेंढ्या, म्हशी, डुकरे, याक, तट्टू, खेचरे, कोंबड्या ही पर्वतीय प्रदेशातील निर्वाहाची साधने आहेत. मांस, दूध, लोकर व कातडी उत्पादनांबरोबरच काही प्राण्यांचा वाहतुकीसाठीही उपयोग केला जातो.
उद्योगधंदे
कृषी मालावर आधारित उद्योग, परंपरागत हातमाग, विणकाम, हस्तव्यवसाय, लोकरी कपडे, गालिचे, घोंगडी व ब्लँकेट निर्मिती, चहावरील प्रक्रिया, फळांवरील प्रक्रिया, बांबूकाम, सिगारेटी व मद्यनिर्मिती, चर्मशोधन, घड्याळे जुळणी, भरतकाम, तैलचित्रे काढणे, कशिदाकाम, काड्यापेट्या तयार करणे, वेताच्या व बांबूच्या वस्तू, लाकडावरील खोदकाम, चांदीकाम इ. उद्योग-व्यवसाय येथे चालतात.
कारागिरीसाठी येथील लोक प्रसिद्घ आहेत. ईशान्य भारतासाठीचे १ एप्रिल २००७ पासून कार्यान्वित झालेले ‘ईशान्य औद्योगिक व गुंतवणूक धोरण २००७’ हे सिक्कीमसाठीही लागू आहे. त्या अंतर्गत औषधनिर्माण, आवेष्टन यांसारखे विविध उद्योग येथे स्थापन झाले आहेत.
सिक्कीम औद्योगिक विकास व गुंतवणूक महामंडळ तसेच NEDFI कडून लहान व मध्यम उद्योगांसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज पुरविले जाते. फलसंस्करण कारखाना, टेमी चहा इस्टेट आणि हातमाग व हस्तव्यवसाय संचालनालय येथे आहे.
कुटिरोद्योग संस्थेकडून परंपरागत व्यवसायांबरोबरच बाहुल्या निर्मिती, भरतकाम, मृत्तिकाशिल्प, कापडाच्या गुंडाळीवरील परंपरागत चित्रकाम, हातबनावटीची कागदनिर्मिती व इतर कलांसाठी मार्गदर्शन केले जाते. राज्यव्यापार निगम वैयक्तिक उत्पादनांच्या व्यापारास उत्तेजन देतो.
वनस्पती व प्राणी
सिक्कीम या राज्यात विविध प्रकारचे ओक, पाइन, फर, स्प्रूस, सिमल, साल, बांबू, प्रिम्यूला इ. वनस्पती प्रकार येथे आढळतात. मोठ्या वृक्षांखाली अनेक परोपजीवी वनस्पती वाढतात. उत्तर भागात विरळ गवताळ प्रदेश आहे. राज्यात 500 पेक्षा अधिक जातीचे प्राणी व पक्षी आढळतात
या राज्यात दरवर्षी मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय फुल महोत्सवाचे आयोजन केले जाते यामध्ये साधारणत राज्यभरातून सुमारे 5000 प्रकारच्या फुलांची झाडे प्रजाती दिसून येतात.
50 जातीचे उभयचर प्राणी, 80 प्रकारचे सरीसृप, 600 जातीचे रंगीबेरंगी पक्षी, 150 प्रकारचे सस्तन प्राणी, 700 पेक्षा अधिक जातींची फुलपाखरे व 48 जातीचे मासे येथे आहेत.
अरण्यांमध्ये अस्वल, तांबडा पंडक, रुपेरी कोल्हा, वाघ, लांडगा, चित्ता, खवल्या मांजर, कस्तुरी मृग, काळवीट, याक, सरपटणारे प्राणी इ. प्राणी पहावयास मिळतात. दुर्मिळ व जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला हिमचित्ता येथे आढळतो.
सिक्कीम राज्याचे सण व संस्कृती
माघ संक्रांती, दुर्गा पूजा, लक्ष्मी पूजा, आणि चैते दासाई ह्या नेपाळी सणांसोबत भुतिया जमातीचे पांग-ल्हाबसोल लोसूंग आणि लोसार हे सण मोठ्या उत्सवात साजरे केले जातात. लेपचा लोकांचे नामसंघ, तेडाँग, हलो रूम फात हे सण साजरे होतात.
सिक्कीम मधील नेपाळी लोक हिंदू सण साजरे करतात. स्थानिक सण म्हणता येतील असे काही सण आहेत. भीमसेन पूजा, सागा दावा, ल्हाबाब दुइचेन, द्रुपका तेशी, भूमचू आदी सण सिक्कीम मध्ये साजरी होतात.
सिक्कीम राज्याचे संगीत व लोककला
पाश्चिमात्य रॉक संगीत, भारतीय पॉप संगीत, नेपाळी रॉक आणि लेप्चा संगीतही सिक्कीम मध्ये लोकप्रिय आहे.
सिंघी छाम हे मुखवटा नृत्य सिक्कीम मध्ये खूप लोकप्रिय आहे. सिक्कीममध्ये बर्फाचा सिंह हे सांस्कृतिक प्रतिक मानले जाते. म्हणून सिक्कीमच्या लोकनृत्यात सिंहाची प्रतिकृतीही नाचवली जाते. सिंहाचा बाह्य भाग हा कापडाने तयार केलेला असतो आणि त्यात दोन पुरूष आतून सिंहाकार देऊन नृत्य करतात.
सुरीया नावाचे लोकवाद्य सिक्कीममध्ये खूप लोकप्रिय आहे. हे वाद्य हवेच्या दाबाने वाजते. म्हणजे तोंडाने हवा फुंकून आणि त्यांच्या छिद्रांवर बोट फिरवून ते विविध आवाजाने संगीत निर्माण करते. लोकगितांच्या चालीवर हे वाद्य वाजवले जाते.
सिक्कीम राज्याच्या अन्न
सिक्कीममधील बहुतेक लोक मांसाहारी आहेत. मटण, गोमांस, डुकराचे मांस आणि मासे यांचे ताजे आणि प्रक्रिया केलेले मांस जवळजवळ प्रत्येक जेवणात दिले जाते. आरा (होममेड व्हिस्की), आणि चांग / टोंगबा (आंबवलेला बाजरी) सारखे स्थानिक आंबवलेले पेय देखील सिक्कीमी पाककृतीची प्रशंसा करतात.
सिक्कीम राज्याच्या पोशाख
खो किंवा बाखू हा एक पारंपारिक पोशाख आहे जो भुतिया, सिक्कीम आणि नेपाळमधील सिक्कीमी वंशीय लोक परिधान करतात. हा एक सैल, झगा-शैलीचा पोशाख आहे जो गळ्यात एका बाजूला आणि कंबरेजवळ तिबेटी चुबा आणि भूतानच्या न्गालोप घो सारखाच रेशीम किंवा सुती पट्टा बांधलेला असतो, परंतु स्लीव्हलेस असतो.
-
हे सुद्धा अवश्य वाचा :-