लगोरी खेळाची संपूर्ण माहिती Lagori Game Information In Marathi

Lagori Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो ! जगभरामध्ये विविध खेळ खेळले जातात. त्यामुळे लहानपणी आपण वेगवेगळे खेळ खेळत होतो. परंतु सर्व खेळ खेळण्यासाठी आपण घराबाहेर मैदानावर जाऊन खेळात. आजच्या काळात असल्याप्रमाणे घरबसल्या खेळले जाणारे खेळ हे पूर्वी खूप कमी प्रमाणात होते त्यामुळे कुठलाही खेळ खेळायचा म्हटलं हे सर्वजण एकत्र जाऊन मैदानावर खेळत असत.

Lagori Game Information In Marathi

लगोरी खेळाची संपूर्ण माहिती Lagori Game Information In Marathi

लगोरी हा खेळ सर्व साधारणपणे आपल्यातील सर्वजणांनी खेळला असेल कारण लगोरी हा खेळ खूप लोकप्रिय आणि लहान वयामध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जाणारा खेळ आहे.

पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्या म्हटल्या कि आपलं गाव आठवायचं. गावाकडचे विविध खेळ आठवायचे. त्यात मग काही खेळ घरात बसून खेळल्या जायचे तर काही मैदानी खेळ असायचे. कॅरम, चांपुल, चिट्ठ्या, सापशिडी इ. खेळ घरात बसून खेळल्या जायचे. मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानाची गरज असते. क्रिकेट, आबाधुबी, लगोरी, चोर-पोलीस, खो-खो असे नानाविध मैदानी खेळ मुलांना आवडायचे.

परंतु आज मोबाइल आणि व्हिडीओ गेम मुळे आपल्याला मैदानी खेळांचा जणू विसरच पडला आहे. कुणी घराच्या बाहेर पडण्यास तयारच नाही. तासंतास मोबाईल वर गेम खेळत राहणे आणि सोशल मिडिया वर वेळ घालवणे हे आजच्या पिढीला प्रचंड प्रमाणात आवडीचे आहे.

लगोरी यास लिंगोरचा असेही म्हणतात .लगोरी हा एक महाराष्ट्र व अन्य राज्यांमध्ये प्रचलित असलेला एक पारंपारिक खेळ आहे लगोऱ्या, चेंडू एवढेच साहित्य ,सोपे साधे नियम व छोटेसे मैदान हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे.

हा खेळ वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो .जसे की महाराष्ट्रात व कर्नाटकात लिंगोरचा ,लगोरी. तेलंगणा मध्ये लिंगोज, गुजरात मध्ये सतोडीयु व हरियाणा, पंजाब, चंदिगड, बिहार या राज्यांमध्ये पिट्टू पिट्टो या नावाने लगोरी या खेळाला ओळखले जाते. लगोरी या खेळाला इंग्रजीमध्ये सेव्हन स्टोन गेम असे म्हणतात तर हिंदी मध्ये लगोरीला लगोरी किंवा पिठु असे म्हणतात. लगोरी मध्ये सात दगड असतात.

साधारणतः सर्वांनीच लहानपणी लगोरी हा खेळ खेळला असेल. परंतु आता याच लगोरी खेळाने आंतरराष्ट्रीय सर्किट मध्ये जाण्यास सुरुवात केली आहे. आज जगभरामध्ये तब्बल 30 राष्ट्रांमध्ये लगोरी खेळ खेळला जातो.

लगोरी या खेळाला हळूहळू जागतिक पातळी पर्यंत चे स्थान मिळत आहे. त्यातला त्यात भारत देशा मुळे लगोरी या खेळाला अधिकच विकासाची गती मिळाली आहे.

नोव्हेंबर 2011 मध्ये झालेल्या इंडियन लोगोरी प्रीमियर लीग अमेच्योर फाऊंडेशन ऑफ इंडिया ने आयोजित केल्याने या खेळायला देशभरामध्ये गती प्राप्त झाली होती.

या खेळांमध्ये सात दगडाच्या चपट्या किंवा लाकडाच्या चपट्या एकावर एक ठेवून त्यांना चेंडूने फोडून पळत सुटायचे असते. या खेळामध्ये साधारणत दोन संघ असतात व दोन्ही जण एकमेकांच्या विरोधी पक्षांमध्ये खेळत असते.

एक संघ लगोरी फोडत असतो तर दुसरा संघ लगोरी फोडलेल्या संघाला चेंडूने मारून बाद करण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत पहिला संघ चपट्या एकावर एक थर रचण्याचा प्रयत्न करत असतो.

अशा प्रकारे लगोरी खेळ खेळला जातो हे आपण सर्वांना माहितीच आहे. आजच्या लेखामध्ये आपण या खेळा विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

लगोरी खेळाचे फायदे :

लगोरी या खेळा मध्ये शरीरांचा व्यायाम तर होतो त्या सोबत सर्वांगिन गुणांमध्ये विकास साधण्यासाठी मदत होते. व आपले आरोग्य चांगले राहते.

लगोरी खेळामुळे धावण्याची सगळे लागते. त्याप्रमाणेच या खेळा मधून चतुराई आणि चपळता या गुणांचा विकास होतो.

लैंगिक कार्य शिकायला मिळते.

नेतृत्व हा गुण अंगीकृत होतो.

लगोरी खेळाचा इतिहास आपण जाणून घेऊयात.

लगोरीचा इतिहास

लगोरी हा एक प्राचीन खेळ असल्याचे म्हटले जाते. हा खेळ गेल्या 5000 वर्षांपासून चालू आहे. हा खेळ मूळचा भारतीय उपखंडातील दक्षिणेकडील भागात आढळला आहे असे मानले जाते .भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रांसह लगोरीचा खेळ खेळत असत, हे आमच्या भगवद्गीतेमध्ये लिहिलेले आहे. असे म्हटले जाते की हा खेळ दक्षिण भारतात 1990 पासून सुरू झाला.

लगोरी हा खेळ १९९० चा दशकात भारत आणि पाकिस्तान मधील सर्वात लोकप्रिय असा खेळ होता.

पण आता हा खेळ फार कमी लोकांच्या हातून खेळला जातो. जवळजवळ हा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावरच आहे. ह्यांची अधिक आक्रमक आवृत्ती जात म्हणजे डॉजबॉल.

लगोरी खेळासाठी लागणारे साहित्य

लगोरी साठी आपल्याला ७ छोट्या दगडांची गरज असते. हे दगड चापट किंवा ओबडधोबड असले तरी चालतील. दगड ओबडधोबड असतील तर आणखी मज्जा येईल. शिवाय आपल्याला हवा आहे एक चेंडू. हा चेंडू एकमेकांना मारावा लागतो, त्यामुळे सौम्य चेंडू घ्यावा. लगोरी पासून १५ ते २० फूट अंतरावर चेंडू मारण्यासाठी रेष आखावी.

लगोरी खेळा साठी लागणारे गडी

या साठी आपल्याला दोन संघांची गरज असते. प्रत्येक संघामध्ये कमीत कमी ३ आणि जास्तीत जास्त १० गडी असू शकतात.

लगोरी खेळाचे नियम

लगोरी या खेळाचे नियम खूप साधे आणि सोपे आहेत ते पुढीलप्रमाणे:-

या खेळामध्ये सातबाराच्या किंवा लाकडाच्या एकावर एक अशा रचल्या जातात. या खेळांमध्ये साधारणता दोन संघ असतात व प्रत्येकी सांगा मध्ये दहा-दहा असे खेळाडू असतात.

पहिल्या संघातील खेळाडूचे लक्ष केवळ रचलेल्या चपट्या चेंडूच्या साहाय्याने फोडणे हे असते. तर दुसऱ्या संघाचे लक्ष केवळ पहिला संघ फोडलेल्या चपट्या रचण्याच्या अगोदर पहिल्या संघातील खेळाडू ला चंदू च्या साह्याने बाद करणे हे असते.

जर चेंडू पहिला संघातील एखाद्या खेळाडूला स्पर्श करत असेल तर तो खेळाडू आणि संघ बाद ठरवला जातो.

जर पहिल्या संघातील सर्व खेळाडू लवकरात लवकर चेंडूला स्पर्श न करता दगडांच्या चपट्या ची पुनर्रचना करतात तेव्हा त्या संघाला गुण दिले जातात.

पहिल्या संघातील एखाद्या खेळाडूला चंदू स्पर्श झाल्यास तो डाव तेथेच संपतो आणि दुसरा संघ चपट्या फोडण्यासाठी प्रयत्न करतात.

अशा प्रकारे वरील सर्व नियम पाळत लगोरी हा खेळ खेळला जातो.

वेळ आणि गुण

लगोरीच्या सामन्यात प्रत्येक डावास ८ मिनिटे वेळ असतो. प्रत्येक बाजूचे दोन डाव खेळवले जातात. खेणा पक्षास लगोरी पाडण्याबद्दल प्रत्येक वेळी २५ गुण मिळतात. लगोरी रचण्याबद्दल प्रत्येक लगोरीस ५ गुण असतात. मारणार्‍या पक्षास गड मारण्याबद्दल प्रत्येक गडयास गुण मिळतात.

८ मिनिटांच्या आंत विरुद्ध बाजूचे सर्व गडी मारून डाव पुरा केल्यास राहिलेल्या प्रत्येक मिनिटास ५ गुण मिळतात.

या नियमाचे उल्लंघन केल्यास प्रत्येक नियघनाबद्दल ५ गुण कमी करतात. सामान्यासाठी क पंच व क हिशेबनीस असतो. पंच डाव चालू असताना गडी मेद्दल किंवा निमांचे उघन झालचा व इतर तक्रारींचा निकाल देतात.

लहानपणी खूप खेळला गेलेला लगोरी ने आता आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये जाण्यास सुरुवात केली आहे .जगामध्ये आज किमान 30 राष्टांद्वारे लगोरी खेळली जात आहे .खेळाला हळूहळू जागतिक पातळीवरील महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी एक मोठं व्यासपीठ आणि समकालीन प्रेक्षकांपर्यंत विस्तृत पोहोच असलेल्या खेळाच्या विकासाचे केंद्रस्थान आपला भारत देश आहे.

नोव्हेंबर 2011 मध्ये झालेल्या इंडियन लगोरी प्रीमियर लीगने आमेच्योर लगोरी फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित केलेल्या देशभरात जोरदार गती वाढली होती. त्यांनी हा खेळ भारताच्या किती राज्यातून तसेच इतर देशांमध्येही खेचण्याचा प्रयत्न केला असून खेळाला लोकप्रिय करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे .दुसरा लगोरी विश्वचषक लवकरच या वर्षाच्या अखेरीस होणार आहे.

भारत, भूतान ,हॉंगकॉंग ,ब्राझील, श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ सह अनेक देश आमने-सामने असतील .नियमांमध्ये बऱ्याच वर्षांमध्ये बदल केलेला नाही. तथापि गेम खेळण्याच्या मार्गाने काही बदल केले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय लगोरी फाउंडेशन ने पुढील मूलभूत तत्त्वे घालून दिली आहेत प्रत्येक संघात 12 खेळाडू असतील आणि प्रत्येक संचासाठी फक्त 6 खेळाडू असावेत.

एक सेट 3 मिनिटे चालतो आणि त्यानंतर सेटमध्ये अर्धा मिनिट ब्रेक लागतो .एका सामन्यात सामान्यतः 3 सेट असतात आणि ज्या संघाने सर्वाधिक गुण घेतले ते सामना जिंकतात. त्याखेरीज नियम मुळात सर्व लीगसाठी समान असतात.

धन्यवाद!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment