गोदावरी नदीची संपूर्ण माहिती Godavari River Information In Marathi

Godavari River Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण नदी प्रणाली मधील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या गोदावरी नदीबद्दल माहिती पाहणार आहोत.

Godavari River Information In Marathi

गोदावरी नदीची संपूर्ण माहिती Godavari River Information In Marathi

गोदावरी  नदीची गणना ही भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जात असते. या नदीला दक्षिण गंगा असे  देखील म्हटले जाते. गोदावरी नदीची एकूण लांबी ही १,४५० किलोमीटर एवढी   आहे.  गोदावरीचा उगम नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. गोदावरी नदी ही आग्नेय दिशेला वाहत जाते आणि गोदावरी राजमहेंद्रीजवळ आंध्रप्रदेश मध्ये बंगालच्या उपसागरास मिळते.

दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा ह्या उपनद्या असलेल्या गोदावरी नदीचे राजमहेंद्रीपासूनचे अंतर१० किमी असून तर 80 किलोमीटर आधी  समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये तिचे विभाजन होते. त्या उपवाहिन्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे देखील म्हणतात.

गोदावरी नदीच्या उगमस्थानापासून ते संगमापर्यंत दोन्ही तटांची जी प्रदक्षिणा केली जाते तिला गोदावरी परिक्रमा म्हणले जाते. गोदावरी नदीचा (उगम)-त्र्यंबकेश्वर मुख-काकिनाडा (बंगालचा उपसागर).पाणलोट क्षेत्रामधील राज्य- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा.

लांबी-१,४६५ किमी उगम स्थाना पासूनची उंची-१,६२० मी (५,३१० फूट) पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ-३,१९,८१० उपनद्या-इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा, मांजरा,गोदावरी नदीवरील धरणे-पैठण(औरंगाबाद); गंगापूर(नाशिक), नांदूर मधमेश्वर(नाशिक), डौलेश्वरम.

गोदावरी नदीतील पाणी हे ऋतूनुसार कमी-अधिक होते असते. नदीमधून वाहणाऱ्या पाण्यापैकी ८०% पाणी हे जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यांमध्येच वाहुन जात असते.

गोदावरी या नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर असून , काही ठिकाणी ६.५ कि.मी  इतकी होत जाते. गोदावरी नदीच्या पाणी साठ्यामुळे  गोदावरीला महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्याची जीवनवाहिनी संबोधले जाते.

ही नदी दक्षिण गंगा म्हणून देखीलओळखली जाते.

त्याच्या सोबतच  नांदेड या शहराला गोदावरीचे नाभी-स्थान म्हणून देखोल ओळखले जाते.गोदावरी नदीला गौतमी गोदावरी असे सुद्धा म्हणटले जाते.

गोदावरी परिक्रमा:

गोदावरीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर पासून  तर दक्षिण तटाने जाऊन अंतर्वेदी आंध्रप्रदेश सागर संगमपर्यंत व नरसापुर पासुन उत्तर तटाने जाऊन तत्र्यंबकेश्वर पर्यंत अशी 3600 किलोमीटर गोदावरी परिक्रमा केली जाते .

प्रवरा जी गोदावरीची उपनदी आहे तिच्या काठी पाषाण युगापासूनच गोदावरी खोऱ्यात मानवी वस्ती असावी व हडप्पा सारख्या समकालीन  संस्कृतीचा उगम याच खोऱ्यात झाला असावा, असे दैमाबाद येथे झालेल्या उत्खननावर इतिहासतज्ज्ञांने मत व्यक्त केले आहे.

रामायण काळात प्रभू रामचंद्रांनी वनवासाच्या काळातच गोदावरी तटावर एक आश्रम बांधला होता असे समजले जाते. पण संपूर्ण गोदावरीच्या  प्रवाह क्षेत्रात ते आश्रम बांधलेले ठिकाण नेमके कोणते, याचा काही पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही.

एका आख्यायिका असे देखील सांगते की गौतम ऋषींच्या हातून चुकीने झालेल्या गोवधाचे प्रायश्चित्त म्हणूनच की काय श्री शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगा नदीत स्नान करून ऋषींनी पाप धुतले, आणि ही अवतरलेली गंगा म्हणजेच गोदावरी नदी असा  लोकांचा समज आहे.

ही आख्यायिका गोदावरी नदी अवतरण्याआधी पडलेल्या २४ वर्षांच्या दुष्काळाचे देखील वर्णन करते. अहिल्या, गंगा, वैतरणा या तिच्या उपनद्या ब्रह्मगिरीवरच उगम पावतात व लगेच त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीस येऊन मिळतात. ऐतिहासिक काळापासूनच पैठण व राजमहेंद्री या ठिकाणी विविध राजवटींनी प्रदीर्घ भरभराटीचा काळ अनुभवलयाचा इतिहास सांगतो.

स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासात गोदावरी खोऱ्यात  मोगल व निजाम राजवट होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  निजामाने स्वतंत्र भारतात प्रवेश न होता आपले वेगळे राष्ट्र निर्माण करण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा घाट घातला होता. परंतु कॉॅंग्रेस व आर्य समाजाच्या काही स्वातंत्र्यसैनिकांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्तिसंग्राम जोमाने चालवला होता.

भारत सरकार ने विविध संस्थानिकांसोबत चर्चा करण्यासाठी सरदार वल्लभभाई यांची नियुक्ती केली होती त्यामुळे पटेलांनी केलेल्या पोलीस  कारवाईनंतर हा भाग स्वतंत्र भारताशी संलग्न झाला होता.

गोदावरी खोऱ्यातील लोक जास्त करून मराठी आणि तेलुगू भाषिक असून निजाम काळामध्ये उर्दू भाषेचा वापर शासकीय कामकाजात केला जात होता. भात हे तेलुगू लोकांचा मुख्य आहार असून   ज्वारी हे मराठी लोकांचा मुख्य आहार आहे.

रेल्वेमार्ग हा या संपूर्ण भागाला जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे. गोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रामधील त्र्यंबकेश्वर येथे आहे व येथील  कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरला जातो व लाखो भाविक येथे स्नान करायला येत असतात.

त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, त्र्यंबकेश्वरापासून जवळ असलेले नाशिक हे औद्योगिक शहर असून, जायकवाडी सिंचन प्रकल्प हा अशिया खंडातील सर्वांत मोठा मातीचा बंधारा आहे.

पैठण हे धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले स्थान असून येथे जायकवाडी धरणाच्या पार्श्वभूमीवर नयनरम्य उद्यान देखीलआहेत. नांदेड या ठिकाणी  शीख समाजाचा एक प्रमुख गुरुद्वारा असून शिखांचे शेवटचे गुरू गोविंदसिंग यांचे नांदेड येथे निधन झाले होते.

आंध्रप्रदेशमध्ये कंदाकुर्ती या ठिकाणी मंजिरा , हरिद्रा  या उपनद्या गोदावरीशी त्रिवेणी संगम करताना आपल्याला दिसतात. या सुंदर संगमावर आंतरराज्य पूल देखील आहे.

शिवालय व स्कंद आश्रम ही प्राचीन देवालये देखीलआहेत. बासर या ठिकाणी देवी सरस्वतीचे मंदिर आहे व धर्मापुरी हे सुद्धा  एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. पट्टिसीमा ह्या प्रेक्षणिय स्थळी गोदावरी नदीच्या मधोमध देवकूट या डोंगरावर वीरभद्र  हे मंदिर आहे. भद्राचलम्‌ येथे श्री‍रामाचे सुंदर मंदिर आहे.

राजमहेंद्री हे गाव राजमुंद्री या नावानेदेखील ओळखले जात असून राजा महेंद्रवर्मन्‌ हा इतिहासामधील पहिला ज्ञात असलेला तेलुगू राजा येथे होऊन गेला असल्याचे समजते. दौलैश्वरम या ठिकाणी  १०० वर्षे जुना आशियामधील सर्वांत लांब लोहमार्ग पूल पहावयास मिळतो.

आंध्रप्रदेशात दर बारा वर्षांनी पुष्करम मेळा गोदावरीच्या काठावर भरतो व कुंभमेळ्याप्रमाणेच या मेळ्याचे देखील स्नानमाहात्म्य सांगितले जाते. सह्याद्री डोंगर रांगेच्या कुशीत पश्चिम घाटात १,०६७ मीटर उंचीवर सुरू होणाऱ्या गोदावरी नदीचा प्रवास  दख्खनच्या पठारावरून आग्नेय दिशेने होताना दिसतो.

आंध्रप्रदेशातील भद्राचलम्‌नंतर गोदावरी पूर्वेकडील निमुळत्या डोंगर रांगांतून  पुढे सरकते व या ठिकाणी तिची रुंदी २०० मीटरपेक्षा कमी होते.

गोदावरी नदीचे खोरे ३,१२,८१२ चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापते. त्यांमधील महाराष्ट्रात १,५२,१९९ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते तर आंध्रप्रदेश मध्ये ७३,२०१ चौरस किलोमीटर, मध्य प्रदेश मध्ये ६५,२५५ चौरस किलोमीटर, ओरिसा मध्ये १७,७५२ चौरस किलोमीटर तर कर्नाटकात गोदावरी नदीने व्यापलेले खोरे  हे ४,४०५ चौरस किलोमीटर इतके आहे.

गोदावरीचा त्रिभुज प्रदेश हा ५,१०० चौरस किलोमीटर इतका असून अत्यंत सुपीक समजला  मानला जातो.तज्ज्ञांच्या मते या त्रिभुज प्रदेशाच्या उत्क्रांती मध्ये तीन महत्वाचे टप्पे दिसून येतात व  शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये असे दिसून येते की गाळाचे प्रमाण हे जमिनींचा शेतीकरिता वाढता वापर व वाढत्या जंगलतोडीमुळे वाढले आहे.

गोदावरी नदीची इतर नद्यांशी तुलना करता असे दिसून येते कीएकूण लांबीमध्ये गोदावरीचा जगात ९२वा क्रमांक लागतो व  ६,६९० किलोमीटर लांबी असलेली आफ्रिका खंडातील नाईल नदी ही प्रथम क्रमांक पटकावते. सिंधू नदी ३,१८० कि.मी. लांबीचा प्रवास करून २१व्या क्रमांकावर आहे तर ब्रह्मपुत्रा ही नदी २,९४८ कि.मी चा प्रवास करून २८ व्या क्रमांकावर आहे, तर २,५१० कि.मी. चा प्रवास करून गंगा नदी ही ३९व्या क्रमांकावर येते.

यमुना नदी १,३७६ कि.मी वाहते तर सतलज नदी ही १,३७० कि.मी. लांबीचा प्रवास करते  व या नद्या अनुक्रमे १०२ व १०३ क्रमांकांवर आहेत. कृष्णा नदी ही १,३०० कि.मी चा प्रवास करते ११४व्या क्रमांकावर आहे, तर १,२८९ कि.मी. वाहून नर्मदा नदी ही ११६व्या क्रमांकवर येते. १,००० कि.मी. पेक्षा अधिक लांबीच्या जगात सुमारे १६० नद्या आहेत.

गोदावरी च्या उपनद्या व त्यांवरील प्रकल्प:

  • ऊर्ध्व गोदावरी
  • दारणा नदी – दारणा धरण
  • कोळगंगा – वाघाड प्रकल्प
  • उणंद -ओझरखेड प्रकल्प
  • कडवा -करंजवन प्रकल्प
  • मुळा नदी -मुळा धरण
  • प्रवरा नदी- भंडारदरा जिल्हा (अहमदनगर),
  • निलवंडे धरण म्हाळुंगी – भोजापुर प्रकल्प (सोनेवाडी ता. सिन्नर),

मध्य गोदावरी उपनद्या:

कर्पुरा , दुधना, यळगंगा , ढोरा , कुंडलिका , सिंदफणा , तेरणा , मनार तिरु,सुकना , माणेरू , मंजिरा किन्नेरासानी , पूर्णा , मन्याड, आसना, सीता , लेंडी , वाण , बिंदुसरा इत्यादी.

कर्नाटक राज्यामधील गोदावरीचे पाणलोट क्षेत्र हे १७०१ वर्ग मैल असून मांजरा आणि तिच्या उपनद्या तेरणा, कारंजा, हलदी, लेंडी, मन्नार मिळून एकूण पाणलोट क्षेत्र ११९०० वर्ग मैल आहे.

निसर्ग,शेती व आर्थिक स्थिती:

नांदुर-मधमेश्वर, जायकवाडी या जलअभयारण्यात रोहित, करकोचा, सारस  यांसारख्या पक्षांच्या विभिन्न प्रजाती आढळून येतात.

नैसर्गिकदृष्ट्या जर पाहायला गेले तर  दख्खनच्या पठारावरील गोदावरी नदीच्या सुरुवातीचा भाग हा कमी पर्जन्यमानाचा असल्यामुळे प्रामुख्याने  या प्रदेशात कापूस, ज्वारी ही पिके घेतली जातात. सिंचिन केलेल्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ऊस, कापुस व केळी ही पिके घेतली जातात. तेलंगण आणि आंध्रप्रदेश मध्ये साधारणत: भाताची शेती केली जाते.

गोदावरी नदीमध्ये जास्त करून गोड्या पाण्यातील Cyprinidae या  माशांच्या प्रजाती आढळून येतात.

गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात ऍव्हिसेनिआ या  प्रजातीच्या mangrove झाडांची जंगले आढळून येत असतात व त्यांना स्थानिक तेलुगू लोक माडा अडावी असे देखील संबोधतात.

मॅंग्रोव्ह झाडांची जंगले ही जमिनीच आणि परिसराच  नैसर्गिकरीत्या संरक्षण करते. डौलेश्वर या गोदावरीमधील  त्रिभुज प्रदेश मधील बंधारा हा ब्रिटिश अभियंता सर आर्थर थॉमस कॉटन याने बांधला असून हे क्षेत्र भाताची शेती, नौकानयन व मासेमारी यामुळे संपन्न झाले असल्याचे समजते.

जलव्यवस्थापन

गोदावरी नदीतील पाणी हे ऋतूप्रमाणे कमी-अधिक होत असते व नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर मध्येच वाहून जाते.

उरलेल्या काळामध्ये गोदावरी खोऱ्यात दुष्काळाची स्थिती देखील असू शकते.हे पाणी व्यवस्थित वापरले जाऊन पुरांचा प्रश्न सुटावा व ज्या ठिकाणी नदी पोहचु शकात नाही त्या भागामध्ये पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी खोऱ्यात अनेक पाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती केलेली आहे.

नदी खोऱ्यातील विविध लोकांच्या गरजा वाढल्याकारणाने इतर नद्यांच्या प्रमाणेच गोदावरी नदीच्या पाणीवाटपाचे प्रश्न देखील गंभीर झाले आहेत.नदीकाठांवर स्थित असलेली अनेक खेडी, शहरे, राज्ये इत्यादी पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी परस्परांशी संघर्ष करीत असतात.

पाण्याची बचत व्हावी व योग्य पाणीव्यवस्थापन व्हावे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचा दावा करत आहे.गोदावरीखोऱ्याचे पाणलोट क्षेत्र हे ३,१९,८१० कि.मी. असून भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९.५% भाग ह्या क्षेत्राने वायपला आहे .

महाराष्ट्रासाठी गोदावरी खोऱ्यामधील १,७९८ टी.एम.सी. पाणी उपलब्ध असून या पाण्यापैकी ७५% म्हणजे १,३१८ टी.एम.सी. पाणी हे भरवशाचे असले तरी आंतरराज्य निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास अधिकतम १,०९७ टी.एम.सी. उपलब्ध होणार असून कृष्णा खोरे १,२०१ टी.एम.सी., तापी खोरे ३२२ टी.एम.सी., नर्मदा खोरे २० टी.एम.सी.  इतके पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला असून  आंतरराज्य लवादानुसार सर्व खोरे मिळून एकूण १,८९० टी.एम.सी. पाणी महाराष्ट्रास उपलब्ध आहे. आंध्र प्रदेश राज्यास किमान १,४८० टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यातून उपलब्ध होते.

नैसर्गिक आपत्ती:

अतिवृष्टी, पुरांची नैसर्गिक संकटे आणि कोरडे दुष्काळ दोन्हीही गोदावरीच्या खोऱ्यात आढळून येत असतात. या पुरस्थिती मुळे नदीतील सुपीक गाळाचा लाभसुद्धा परिसरातील प्रदेशाला होत असतो.

वाढत्या सिंचन क्षमतांमुळे पूर्वीपेक्षा तरी पूराची धोकापातळी कमी झाली असली तरी नदीपात्रातील वृक्षतोडीमुळे नदीपात्रात वाढणारा गाळ आणि पात्राजवळच्या वाढत्या मनुष्यवस्तीमुळे आर्थिक हानी व मनुष्यहानी वाढल्याचे दिसून येत आहे.

प्रदूषण:

गोदावरी नदीत जवळच्या मोठ्या नागरी वास्तयांमधून येणाऱ्या सांडपाण्यापासून सर्वाधिक ८५% प्रदूषण झाल्याचे दिसते.मान्सून सोडून इतर काळातील सिंचनोतर काळामध्ये नदीचे प्रवाह आधीच रोडावलेले व कमी वेगाचे असतात व नदीची नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया मंदावलेली असते त्याशिवाय  सांडपाणी सोडल्यामुळे पिण्याचे पाणी वरचे वरचे न घेता नदी पात्रातील विंधन विहिरींद्वारे अथवा धरणांतून घेतले जाते असते.

नदी पात्राचे १५% प्रदूषण औद्योगिक कारणांमुळे होत असते.सर्फेस वॉटर मध्ये ऑक्सीजनची कमतरता असून  बी. ओ. डी. चे प्रमाण जास्त आहे. तसेच फ्लोराईड आणि डिझॉल्वड सॉलीड्स यांचे प्रमाण सुद्धा अधिक पहावयास मिळते.त्यामुळे आपल्या नद्या वाचवणे हे आपले परम कर्तव्य असून त्या आपल्या जीवन वाहिन्या आहेत.

धन्यवाद!!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment