मी शिक्षक झालो तर…मराठी निबंध If I Were A Teacher Essay In Marathi

If I Were A Teacher Essay In Marathi आज आपण बऱ्याच शिक्षकांना पाहतो ज्यांना शिक्षणाची’ खरे मूल्य ‘कळत नाही .अशा शिक्षकांना पाहिल्यावर माझ्या मनात निरनिराळ्या प्रकारचे विचार उद्भवतात .कधी कधी मला असे वाटते की मी शिक्षक झालो तर मी लोकांसमोर एक आदर्श निर्माण करेल .

If I Were A Teacher Essay In Marathi

मी शिक्षक झालो तर…मराठी निबंध If I Were A Teacher Essay In Marathi

जर मी शिक्षक झालो तर मी प्रथम माझ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची खरी  आवड निर्माण करेल .मी त्यांची शिक्षणाबद्दलची त्यांचे दुर्लक्ष दूर करेल .जो शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये रोज निर्माण करू शकत नाही त्याला शिक्षक कसे म्हटले जाऊ शकते ?जेव्हा मन शिक्षणामध्ये गुंतलेले असते तेव्हा बऱ्याच वाईट गोष्टी आपोआपच नष्ट होतात .

प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक हा एक आदर्श व्यक्ती असतो .कारण बालपणी आपल्या बालवा यावर होणारे सर्व संस्कार आपल्या आई वडील नंतर जो कोण करत असेल तर ती व्यक्ती म्हणजे शिक्षक असतो .त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांना शिक्षक व्हावे असे वाटत असते .

मला लहानपणापासूनच शिक्षक व्हायला खूप खूप आवडते त्यामुळे मी जर शिक्षक झालो तर प्रत्येक विद्यार्थ्याला खूप आत्महत्येने शिकविण्याचा प्रयत्न करेल .मी शिक्षक बनेपर्यंत जो काही ज्ञानाचा साठा त्यातील कण न कण  मी विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करेल .

मी विद्यार्थ्यांना चांगली शिकवण देईल ,त्यांना चांगली शिस्त लावेल ,वडीलधार्‍या माणसांचा आदर करायला शिकवेल व त्यांच्यावर उत्तम असे संस्कार करेल .जे की त्यांना भावी आयुष्यात एक आदर्श नागरिक होण्यासाठी मदत करतील .

जर मी शिक्षक झालो तर प्रत्येक विद्यार्थ्यास शिक्षणाची समान संधी देईल .सर्वांना सारखीच शिक्षण देईल ,कोणत्याही विद्यार्थ्यांचा तिरस्कार करणार नाही .मी प्रत्येक विद्यार्थ्याला असे शिक्षण देईल ही तो भविष्यात कोठे नोकरीला जरी नाही लागला तरी तो आपल्या देशाचा एक आदर्श नागरिक मात्र नक्कीच बनेल .

माझे देखील स्वप्न आहे की मी एक विद्यार्थ्यांचा आदर्श शिक्षक बनावे .विद्यार्थ्यांनी माझ्या अनेक चांगल्या गुणांचे अनुसरण करावे .त्यांनीदेखील माझ्यातील सर्व चांगले गुण अंगीकृत करावेत .पण त्यासाठी मला अगोदर स्वतःमध्ये आणि माझ्या वागण्यात बदल करावे लागतील .त्यासाठी मी पूर्ण मेहनत घेईल .

जर मी शिक्षक झालो तर मी अगोदर ते मी सर्व अंगीकृत करेल जे की एक आदर्श शिक्षकांमध्ये असायला हवेत .कारण प्रत्येक विद्यार्थी त्याला आवडणारे शिक्षक आणि त्याच्यासाठी आदर्श असणारे शिक्षक तो मनात ठेवत असतो .त्या शिक्षकांप्रमाणे तो स्वतः अनुसरण करत असतो .

अनेक विद्यार्थ्यांना शांत आणि प्रेमळ शिक्षक आवडतात .त्यामुळे मी नेहमी शांत राहून प्रत्येक विद्यार्थ्याची प्रेमळपणे वागेन .कोणावरही विनाकारण ओरडणार नाही .शिवाय गरजेच्या वेळी त्यांना शिक्षा देखील करेल कारण विद्यार्थ्यांना वाचत बसणे देखील गरजेचे असते .त्यांना जर शिक्षा नाही केली तर ते वाईट कृत्य करण्यास घाबरणार नाहीत .

विद्यार्थी हे मळलेल्या पिठाच्या उंद्या सारखे  सारखे असतात त्यांना आपण जसा आकार देऊ तसे ते घडत जातात .त्यामुळे त्यांना मी प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल .पण काही विद्यार्थी हे खूप खोडकर असतात त्यांना प्रेमळ शब्दात सांगितलेले लक्षात येत नाही .त्यावेळी मी त्यांना शिक्षा करून देखील वठणीवर आणण्याचा प्रयत्न करेल .शिवाय त्यांना वाईट कृत्य करण्यास भीतीदेखील वाटायला हवी .

मी विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत शिकवेल .मी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षे पुरते न शिकविता त्यांना जास्तीत जास्त ज्ञान कसे देता येईल यासाठी प्रयत्न करेल .मी त्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच आव्हान तर ज्ञानही भरपूर देईल .कारण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच अवांतर ज्ञान देखील असावे लागते .

माझ्याकडे असलेला ज्ञानाचा साठा आणि प्रत्येक विद्यार्थ्याला विषयाशी संबंधित जास्तीत जास्त माहिती कशी देता येईल यासाठी वापरेल .मी प्रत्येक विद्यार्थ्याला खूप आत्मीयतेने आणि जीव तोडून शिकवेल .आणि विद्यार्थ्यांमध्ये ढ आणि हुशार असा भेद देखील करणार नाही .कारण बुद्धीने प्राथमिक कोणीच हुशार किंवा ढ नसतो

जो विद्यार्थी अभ्यास करतो त्यात खूप मेहनत घेतो तोच विद्यार्थी हुशार आणि अभ्यास न करणारा ढ असतो त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यास हुशार आणि ढ कोणीच नसून अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हुशार होऊ शकतो जो वर्गात पहिला क्रमांक मिळू शकतो ही भावना रुबेल प्रत्येकाला अभ्यासासाठी प्रोत्साहन देईल .

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment