मिझोराम राज्याची संपूर्ण माहिती Mizoram Information In Marathi

नमस्कार मित्रांनो,भारताचा उत्तर-पूर्व भाग जो समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांसाठी प्रसिद्ध आहे. मिझोरम भारतातील सर्वात लहान राज्य आहे. मिझोरम पहिल्यांदा आसाम राज्यातील एक जिल्हा होता परंतु फेब्रुवारी 1987 मध्ये त्याला आसाम पासून वेगळे करण्यात आले. आणि भारतामधील 23 वे राज्य म्हणून नोंदविण्यात आले. आजच्या या पोस्टमध्ये आपण मिझोरम राज्याची माहिती जाणून घेणार आहोत.

Mizoram Information In Marathi

मिझोराम राज्याची संपूर्ण माहिती Mizoram Information In Marathi

मिझोरम हे भारत देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. मिझोरमच्या उत्तरेस आसाम, ईशान्येस मणिपूर, पश्चिमेस त्रिपुरा ही राज्ये तर पूर्वेस व दक्षिणेस म्यानमार व पश्चिमेस बांगलादेश हे देश आहेत.राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 21087 चौरस की.मी.आहे. ऐझॉल ही मिझोरमची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

मिझोरम हे जुन्या उत्तर आणि दक्षिण लुशाई पर्वताचे संयोजन आहे. मिझोरामच्या भूमीत अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य, विविध निसर्गदृश्ये, समृद्ध वनस्पती आणि प्राणी, पाइन्सचे समूह आणि बांबूची घरे असलेली अनोखी गावे आहेत.

मिझोराम नावाची उत्पत्ती

मिझोरम नावाला तीन भागांमध्ये वेगळे करून नावाचा अर्थ लावला गेला आहे. मि म्हणजे लोक, झो म्हणजे पर्वत आणि रम म्हणजे प्रदेश. आणि याला जोडून याचा अर्थ होतो पर्वतीय लोकांचा प्रदेश किंवा पर्वतीय लोकांची भूमी.

मिझोराम राज्याची स्थापना

मिझोराम भारतीय संघ राज्याचे 23 वे राज्य 20 फेब्रुवारी 1987 मध्ये स्थापन झाले. 1972 पर्यंत ते आसामचा एक जिल्हा होते. नंतर ते केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित झाले.

1891 साली ब्रिटिशांनी ते संघराज्यात जोडले. काही वर्ष ते उत्तरेला लुशाई हिल्स आसाम लगत होते तर अर्धे राज्य बंगालच्या अखत्यारीत. 1898 मध्ये ते लुगाई हिल्स डिस्ट्रिक्ट असे मुख्य संयुक्त आसाम म्हणून घोषित झाले. 1972 नॉर्थ इस्टर्न रिऑर्गनायझेशन अॅक्ट अंतर्गत मिझोराम केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित झाले.

इतिहास

मिझोरामच्या सुरुवातीच्या इतिहासाबद्दल फारसे माहिती नाही. 1750 ते 1850 च्या दरम्यान, मिझो जमातीचे लोक जवळच्या चिन हिल्समधून आले आणि येथे स्थायिक झाले आणि स्थानिक लोकांना व तत्सम जमातींना वश करून एकत्र येऊन स्वतःचा समाज तयार केला.

मिझोने 300 वंशपरंपरागत प्रमुखांवर आधारित निरंकुश राजकीय व्यवस्था विकसित केली. मिझो जमाती कोणत्याही परकीय राजकीय प्रभावाने अप्रभावित राहिल्या, परंतु 1826 च्या यांदाबो करारानुसार ब्रिटिशांनी आसामचा ताबा मिळेपर्यंत.

पुढील दशकांमध्ये, मिझोच्या ब्रिटिश प्रदेशात घुसखोरी झाल्यामुळे, ब्रिटिशांनी मिझोवर दंडात्मक हल्ले करणे सुरूच ठेवले. 1890 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत मिझोराम अधिकृतपणे ब्रिटीशांच्या ताब्यात नसला तरी दोन दशकांपूर्वी ते त्यांच्या ताब्यात आले होते.

भूरचना

मिझोरामची सीमा भारताच्या तीन राज्यांना आणि दोन देशांना मिळते. मिझोरम ची सीमा पूर्व आणि दक्षिणेला म्यानमार आणि पश्चिमेला बांगलादेश ला मिळते. आणि पश्चिमेला भारताच्या त्रिपुरा राज्याला आणि उत्तरेमध्ये आसाम राज्याला तर पूर्वेला मणिपूर राज्याला मिळते.

मिझोरम राज्याच्या लांबी आणि रुंदीमध्ये सुमारे 21 प्रमुख डोंगररांगा आणि विविध उंचीची शिखरे इकडे तिकडे विखुरलेली मैदाने आहेत. राज्याच्या पश्चिमेकडील टेकड्यांची सरासरी उंची सुमारे 1,000 मीटर (3,300 फूट) आहे.

मिझोराम हा टेकड्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. बहुतेक टेकड्यांच्या रांगा एकमेकीला समांतर अशा उत्तर-दक्षिण पसरलेल्या असून त्यांचे उतार तीव्र आहेत. नद्यांच्या खननामुळे या टेकड्यांमध्ये अनेक खोल दऱ्या तयार झालेल्या आहेत.

टेकड्यांदरम्यान लहानलहान मैदानी द्रोणी प्रदेश असून त्यांतील सुपीक मृदेमध्ये भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मिझोरामाच्या मध्यातून उत्तर-दिक्षण दिशेने मिझो टेकड्या पसरलेल्या आहेत. या तीव्र उताराच्या टेकड्यांची सरासरी उंची सु. ९०० मी. असून ती मध्यभागी जास्त आहे.

दक्षिण भागातील ब्लू मौंटन (फ्वंगपुरी) हे या टेकड्यांमधील सर्वोच्च (२,२६५मी.) शिखर आहे. मिझोरामच्या पूर्व व दक्षिण सरहद्दींवर चिन टेकड्या व ब्रह्मदेशातील आराकान पर्वतरांगेचा विस्तारित भाग असून पश्चिम सरहद्दीवर बांगला देशातील चितगाँग टेकड्यांची रांग आहे.

छिमतुईपुई ही मिझोराम मधील सर्वात लांब नदी आहे, या नदीला कलादान या नावानेसुद्धा ओळखतात.

मिझोरम राज्याच्या आग्नेय भागात वसलेले, ब्लू माउंटन म्हणून ओळखले जाणारे फावंगपुई त्लांग हे मिझोराममधील 2,210 मीटर (7,250 फूट) सर्वात उंच शिखर आहे.

पलक सरोवर हे मिझोराममधील सर्वात मोठे सरोवर आहे आणि 30 हेक्टर (74 एकर) क्षेत्रात व्यापलेले आहे. हे सरोवर दक्षिण मिझोराममधील सायहा जिल्ह्यात आहे.

मिझोरम मधील सर्वात मोठा धबधबा झील धबधबा आहे.  जो दक्षिण मिझोरम मधील सैहा जिल्हामध्ये स्थित आहे.

मिझोरामच्या डोंगराळ भूमीतून अनेक लहानमोठे नदीप्रवाह वाहत असलेले दिसतात. डोंगराळ भागातील खोल निदऱ्यांमधून उत्तरेकडे अथवा दक्षिणेकडे हे नदीप्रवाह वाहत जातात.

ढालेश्वरी (त्लावंग), सोनई (त्वीरेल) व तुइव्हावल या नद्या मध्यवर्ती डोंगराळ प्रदेशात उगम पावून उत्तरेस वाहत जाऊन आसामच्या काचार जिल्ह्यात बऱ्‍रा क नदीला मिळतात,तर कर्णफुली ही नदी प्रदेशाच्या दक्षिण टोकापासून उत्तरेस साधारण मध्यभागापर्यंत वाहत जाते व तेथून पुढे ती पश्चिमेस बांगला देशात प्रवेश करते. तेथेच तिच्यावर प्रचंड जलविद्युत्‌ प्रकल्प उभारला गेला आहे.

कलदन ही नदी ब्रह्मदेशातून मिझोराममध्ये वाहत जाते. द्रोणी प्रदेशात अनेक सरोवरेही निर्माण झालेली दिसून येतात. दक्षिण भागातील पालक हे सर्वां त मोठे सरोवर असून त्याशिवाय ताम्‌डिल, रुंग्‌डिल इ. सरोवरेही महत्त्वाची आहेत.

जिल्हे

मिझोरम मध्ये एकूण 11 जिल्हे आहेत.

आयझॉल, कोलासिब, लॉंगटलाय, लुंगले,  ममित,सायहा, सरचिप, चंफई, ह्नहथियाल, खवजवल, सैच्युअल.

लोकसंख्या

मिझोराम मधील लोकसंख्येचा एक विशाल भाग काही खास जनजातीचा समूह आहे. ज्यांना सामूहिक रूपामध्ये मीझोस असे म्हणतात.मिझोरम भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असणारे दुसरे राज्य आहे.

2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 1,091,014 इतकी आहे. राज्याची साक्षरता 91.58 टक्के इतकी आहे. मिझोरम राज्य साक्षरतेच्या हिशोबाने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त साक्षर राज्य आहे, येथील साक्षरता दर कमीत कमी 91 टक्के आहे.

मिझोरामच्या लोकसंख्येपैकी सुमारे 95% लोक विविध आदिवासी वंशातील आहेत. भारतातील सर्व राज्यांपैकी मिझोराममध्ये आदिवासी लोकांची संख्या सर्वाधिक आहे.

राज्यातील बहुतेक लोक विविध वंश आणि समुदायांचे आहेत जे वांशिक किंवा भाषिकदृष्ट्या एकमेकांशी संबंधित आहेत.

या कुळांना किंवा जमातींना एकत्रितपणे ‘मिझो’ असे म्हणतात आणि ‘मी’ म्हणजे ‘लोक’ आणि ‘जो’ म्हणजे ‘डोंगर’. मिझोराम व्यतिरिक्त हे लोक बांगलादेश, म्यानमार आणि भारताच्या इतर ईशान्येकडील राज्यांमध्येही स्थायिक झाले आहेत. मिझो जमातींमध्ये लुशाई, हमर, लाई, पायते आणि मारा यांचा समावेश होतो. हमार लोक अनेक गटांमध्ये विभागले गेले होते, जसे की लुंगटाऊ, थाईक, खबांग, डॅमगोन आणि झोटे.

तापमान

मिझोरामचे हवामान आल्हाददायक आहे. येथील हिवाळा व उन्हाळा सौम्य असतात. हिवाळ्यातील तापमान ११°से. ते २४°से. यांदरम्यान,तर उन्हाळ्यातील तापमान १८°से. २९°से. यांदरम्यान असते.

खोलगट द्रोणी प्रदेशात किंवा दऱ्याखोऱ्यां मधील हवामान उष्ण व दमट असते परंतु त्यामानाने डोंगरमाथ्यावरील हवामान जवळजवळ वर्षभर थंड असते. बहुधा याच कारणामुळे मिझो लोकांनी आपल्या वसाहती अथवा गावे डोंगरमाथ्यावर वसविलेली दिसून येतात.

या प्रदेशात मार्च ते एप्रिल या काळात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होते. या प्रदेशातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५४ सेंमी. असून उत्तरेकडीलप्रदेशापेक्षा दक्षिणेकडील प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक आहे (उदा., उत्तरेकडील ऐजाल शहरी वार्षिक सरासरी २०८ सेंमी. पाऊस पडतो तर दक्षिणेकडील लुंगलेई येथे ३५० सेंमी. पडतो ). हिवाळ्यात पाऊस पडत नाही तसेच आकाशही निरभ्र असते. स्वच्छ व निळे आकाश आणि सकाळी पडणारे धुके यांमुळे या डोंगराळ प्रदेशांचे हिवाळ्यातील सृष्टिसौंदर्य विशेष विलोभनीय असते.

भाषा

मिझोरम मधील मुख्य भाषा मिजो आहे. येथील लोक इंग्रजी भाषेचा सुद्धा उपयोग आपल्या बोलण्यामध्ये करतात. मात्र मिझो भाषेसाठी ते रोमन लिपीचा वापर करतात.चकमा जातीचे लोक अजूनही बौद्धधर्मीय आहेत व बंगाली भाषा बोलतात.

राज्याच्या प्रमुख भाषा मिझो व इंग्रजी असल्या तरी अजून काही घटक बोली राज्यात बोलल्या जातात. त्यापैकी काही भाषा व ती कोण बोलतं ते पुढीलप्रमाणे –

बॉम – मिझो-बॉम, बाइटे – मिझो-बाइटे, चाकेसंग – चाक्मा, दुहलियान-त्वांग – हमार, मिझो हुआँल्गो – मिझो हुआँल्गो, खासी – प्नार/सीटेंग, लाई – मिझो-पवाई, लाखेर-मारा – मिझो-मारा/लाखेर, पाँग – मिझो-पाँग, राल्टे – मिझो-राल्टे, रियांग – रियांग, थाडो – थाडो.

दुहलीयन वा लुसेइ ही मिझोरामची पहिली भाषा होती जी आता मिझो नावाने ओळखली जाते. ह्या भाषेचा मिझोराम मधील इतर भाषांवरही प्रभाव दिसून येतो. हमार, मारा, लाइ, थाडो, पाइटे, गांगटे आदी भाषा राज्यात बोलल्या जातात. चकमा, दिमासा (कचारी), गारो, हजोंग, हमार, खासी आदी आदिवासी तर अनेक कुकी जमाती मिझोराममध्ये वास्तव्य करतात.

शेती

मिझोरममधील बहुतेक भू-भाग डोंगराळ स्वरूपाचा असून शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. त्यासोबतच पशुपालन व रेशीम हे येथील जोड व्यवसाय आहेत.

मका, चहा व कडधान्ये ही मिझोरम मधील प्रमुख पिके आहेत.

येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असून बहुतेक भागात ‘झूम’ अथवा फिरती शेती केली जाते. एकूण सु. ८७% लोक शेती व्यवसायात गुंतलेले आहेत. लागवडीखालील क्षेत्राच्या फक्त १७% क्षेत्रालाच जलसिंचनाचा फायदा मिळतो.

झूम शेतजमिनी वैयक्ति क मालकीच्या नसून गावठाणाच्या मालकीच्या आहेत. स्थिर पायऱ्यापायऱ्यांची शेतजमीन मात्र शेतकऱ्यांना वाटून दिलेली असते. डोंगरउताराच्या शेतीत प्रामुख्याने मका व भात ही पिके घेतली जातात.

यांशिवाय कडधान्ये, कापूस, तंबाखू, चहा व जलसिंचनाची सोय असलेल्या प्रदेशांत ऊस, मिरची, आले, हळद, बटाटे, केळी, अननस, संत्री, तीळ, कागदी लिंबू इ. पैशाची पिकेही घेतली जातात. कॉफी,रबर,काजू,वेलदोडे यांच्या लागवडीचेही प्रयत्न सुरू आहेत. आले व तीळ यांच्या उत्पादनात चांगली प्रगती दिसून येत आहे.

4.4 लाख हेक्टर जमीन बागायतीसाठी तर 25000 हेक्टर जमीन लागवडीखाली असून प्रमुख बागायती उत्पन्न म्हणजे संत्रा, लिंबू, ताजी फळे, हटकोरा, जमीर, अननस आणि पर्यायी इतर पिके. तसचे ऊस, टॅपिओका व कापूस.

मिझोराम राज्याची सण व संस्कृती

मिझोरम मधील प्रमुख सण चापचार कुट आहे, ज्याला वसंत महोत्सव या नावानेसुद्धा ओळखतात. हा सण दरवर्षी मार्च महिन्यामध्ये साजरा केला जातो.

मिझोरम राज्यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या लोकांचे वेगवेगळे लोक नृत्य प्रसिद्ध आहेत. जसे की चेरौ, खुल्ल्म,छैहलम.

मिझो पारंपरिक संगीत साधे सोपे आहे. स्थानिक लोक रात्रभर गाणे गात नाचतात. गिटार हे मिझोरामचे लोकप्रिय वाद्य आहे. चर्चच्या प्रार्थनेवेळी जे वाद्य वाजवले जाते त्याला खुआंग नावाने ओळखतात.

ते ढोल सारखेच असते. खुआंग हे वाद्य लाकडापासून आणि प्राण्यांच्या कातडीपासून बनवतात. मिझो लोक हे कोणत्याही वाद्याशिवाय आपले नृत्य करतात. यावेळी गाताना आपल्या तोंडातून ते काही हुंकार काढतात, हाताने टाळ्या वाजवतात. अशा अनौपचारिक संगीताला ते छपचेर म्हणतात.

चेराव नावाचे लोकनृत्य खूप प्रचलित असून या नृत्यावेळी पुरूष जमिनीवर बांबू धरून ठेवतात. दोन्ही हातांनी ते बांबू जवळ घेतात आणि दूर करतात. त्या उघडझाप करणाऱ्या बांबूमध्ये महिला पायांचे ठेके धरून नाचतात. यावेळी महिलांनी आपला पारंपरिक रंगीबेरंगी वेश परिधान केलेला असतो.

स्त्री-पुरूष मिळून एक नाच केला जातो याला खुआल्लाम असे.

मिझोराम राज्याचे खाद्य

मिझोरामच्या प्रसिद्ध खाद्यपदार्थांबद्दल बोलायचे झाले तर इथे भाताची भरपूर लागवड होते. या कारणास्तव, मिझोरामचे अन्न बंगाल आणि आसामच्या लोकांसारखेच आहे. येथील लोकांच्या जेवणात भाताचे प्राबल्य दिसून येते.

मिझोरामच्या जेवणात इथल्या लोकांना भातासोबत मांस आणि मासे खायला आवडतात. मिझोरामच्या काही मुख्य पारंपारिक पाककृतींमध्ये मऊ बांबूची भाजी, बाई, मिझो विक्सा, कोठ पिठा इत्यादींचा समावेश होतो.

येथील लोक आपल्या स्वादिष्ट पदार्थांमध्ये मोहरीच्या तेलाला प्राधान्य देतात. विशिष्ट हेतूने केळीच्या पानांवर जेवण देऊन जेवण करण्याची पद्धत आहे.

मिझोरामचा पोशाख

मिझोरामचा पोशाख किंवा पेहराव देशातील इतर राज्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. ‘पुआन’ हे नाव मिझोरामच्या पारंपारिक पोशाखावरून आले आहे . ‘ पुआन ‘ हा मिझोरमच्या महिलांचा सुंदर पोशाख आहे.

तसेच, मिझोराममध्ये महिलांच्या कपड्याला पुंछी ड्रेस असेही म्हणतात. मिझोराम राज्य संग्रहालयात मिझोराममधील लोकांचे पारंपारिक पोशाख देखील प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. लोकांचे कपडे किंवा वेशभूषा येथील प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवते. येथील पुरुष लाल आणि पांढर्‍या रंगाचे साधे कपडे घालतात.

वनस्पती व प्राणी

मिझोरम मधील 33 टक्के भाग घनदाट जंगलांनी पसरलेला आहे.

मिझोराममधील ३२% क्षेत्र जंगलांनी व्यापलेले असून त्यापैकी १५,९३५ चौ. किमी. क्षेत्र राखीव जंगलांखाली आहे. डांपा वन्य प्राणी अभयारण्याखाली ५७२ चौ. किमी. आणि तावी वन्य प्राणी अभयारण्याखाली २१० चौ. किमी. क्षेत्र आहे.

मिझोरम राज्यात पक्ष्यांच्या सुमारे 640 प्रजाती ओळखल्या गेल्या आहेत, त्यापैकी अनेक हिमालयाच्या पायथ्याशी आणि आग्नेय आशियामध्ये स्थानिक आहेत. मिझोरामच्या जंगलात आढळणाऱ्या पक्ष्यांपैकी 27 पक्षी जगभरातील धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीत आहेत आणि आठ गंभीरपणे धोक्यात असलेल्या यादीत आहेत.

या प्रदेशात समृद्ध वनस्पतिजीवन आढळते. विविध प्रकारची झाडे, झुडपे व गवत तसेच बाबूंची वने सर्वत्र आहेत. डोंगराळ प्रदेशातील टेकड्या नेहमी हिरव्यागार दिसतात. अलीकडे पाइन वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

वन्य प्राणी अभयारण्याच्या दृष्टीने येथील वनस्पतिजीवन व हवामान फारच अनुकूल आहे, परंतु मोठ्या प्रमाणावरील शिकारीमुळे प्राण्यांचे व पक्ष्यांचे प्रमाण खूप घटले आहे. अलीकडे मात्र त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने बंदुकीच्या वापरावर, प्राणी-पक्षी यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने बंदुकीच्या वापरावर, प्राणी-पक्षी यांच्या शिकारीवर कडक निर्बंध घातले आहेत.

हत्ती, वाघ, बिबळ्या, अस्वल, रानटी कुत्रे, शेळ्या, विविध प्रकारची माकडे, रानगवा, हरिण, रानडुक्कर इ. प्राणी येथे पुष्कळ प्रमाणात आहेत. यांचा पिकांना मात्र उपद्रव होतो. जंगली फाउल,धनेश,फेझंट, होले इ. पक्षी या प्रदेशात सर्वत्र दिसतात.

उद्योगधंदे

या केंद्रशासित प्रदेशात मोठे उद्योगधंदे नाहीत. बहुतेक लोक पारंपरिक कुटिरोद्योग करतात. यांत प्रामुख्याने हातमाग व हस्तव्यवसाय यांचा समावेश असतो. मिझो हे मुळचे कुशल विणकर असून ते उत्तम प्रतीचे गालिचे तयार करतात परंतु हे काम हाताने अत्यंत हळू होते व आर्थिक दृष्ट्या तोट्याचे ठरते.

येथील टोपल्या व हॅट प्रसिद्ध आहेत. या उद्योगांशिवाय रेशीम उत्पादन, भाताच्या गिरण्या,छापखाने,रेडिओ दुरूस्ती,फळांवर प्रक्रिया करून ती डबाबंद करणे,आल्याचा उपयोग करून पेये तयार करणे,साबण, विटा तयार करणे इ. व्यवसाय चालतात

संपूर्ण मिझोराम मागासक्षेत्र म्हणून अधिसुचित असून हे राज्य उद्योगविहिन जिल्हा म्हणून सुद्धा नोंदविले गेले. हातमाग व हस्तकला, इलेक्ट्रॉनिक्स जीवनावश्यक वस्तू उद्योग, रेशीम उद्योग असे काही उद्योग आता सुरू झाले आहेत.

वाहतूक

अपुऱ्या वाहतूक सुविधेमुळे राज्यात जाणे सोपे नाही. राज्यातील ९० टक्के क्षेत्र अरुंद डोंगरांनी वेढलेले असल्याने रस्ते बांधणे प्रशासनासाठी सोपे काम नाही. राज्यात सुमारे साडेआठ हजार कि.मी. यात रस्त्यांचे जाळे आहे जे राष्ट्रीय महामार्गाशी जोडलेले आहे.

राज्याचा बहुतांश भाग राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गांनी व्यापलेला आहे. राज्याची राजधानी आयझॉलमध्ये लेंगपुई विमानतळ आहे जो कोलकाता विमानतळाशी जोडलेला आहे. हे आसाममधील सिलचर विमानतळाशी देखील जोडलेले आहे, जे आयझॉलपासून 200 किमी अंतरावर आहे. लांब आहे.

आसाममधील सिलचरचे रेल्वे स्टेशन मिझोरामचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे राजधानीपासून 180 किमी अंतरावर आहे. लांब आहे. राजधानी आयझॉल येथून लुंगलेई, सेरछिप, कोलासिब, चव्हांगटे इत्यादी राज्यातील इतर शहरांसाठी हेलिकॉप्टर सेवा देखील आहे.

अभयारण्य

राज्यात दोन राष्ट्रीय उद्याने आणि सहा वन्यजीव अभयारण्ये आहेत ब्लू माउंटन (फवंगपुई) राष्ट्रीय उद्यान, डंपा व्याघ्र प्रकल्प ही दोन राष्ट्रीय उद्याने आहेत तर लेंगटेंग वन्यजीव अभयारण्य, मुरलेन राष्ट्रीय उद्यान, न्गेंगपुई वन्यजीव अभयारण्य, तवी वन्यजीव अभयारण्य, खवंगलुंग वन्यजीव अभयारण्य, थांगपुई आणि वन्यजीव अभयारण्य ही मिझोरम मधील अभयारण्य आहेत.

धन्यवाद!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment