Mi Anubhavlela Paus Essay In Marathi पावसाळा हा सर्व हंगामातील सर्वोत्तम हंगाम मानला जातो. पावसाळ्याच्या दिवसाची वाट पहात असते आणि अशाच दिवशी हवामान आनंददायी असते. पावसाळ्याचा दिवस हा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि त्याबरोबर राहण्यासाठी एक परिपूर्ण दिवस आहे. पावसाळ्याच्या दिवशी संपूर्ण वातावरण आनंदाने भरुन जाते. प्रत्येकाला हा दिवस खूप आवडतो.
मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध | Mi Anubhavlela Paus Essay In Marathi
पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो लहान मुलां पासून ते वृद्ध व्यक्ती पर्यंत सगळ्यांना आवडतो. पावसाळा आल्यावर माणसानं सोबतच प्राण्यांना व पक्षांना देखील आनंद होतो कारण त्यांना खाण्यासाठी हिरवे गावात व पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळते.
पावसाळा आला कि लहान मुलं कागदाच्या होड्या बनवून पावसाच्या पाण्यामध्ये सोडतात, सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. उन्हापासून त्रासलेल्या लोकांना पावसामुळे थंडकता मिळते.
प्रत्येक वर्षी येणार पाऊस हा काहीतरी एक वेगळा अनुभव देऊनच जातो. बाहेर हवामान गडद आणि अंधुक होते.
काल पहिला पाऊस पडला. पाऊस पडण्यापूर्वी आभाळात अचानक अंधारून आले होते. आकाश ढगांनी भरून गेले होते. आणि मग पावसाला सुरुवात झाली.
पावसाचे टपोरे थेंब खाली येत होते. नंतर सरीवर सरी बरसू लागल्या. आम्ही त्या सरी कितीतरी वेळ नुसते पाहत होतो. पावसाने पृथ्वीला केलेला तो अभिषेक मोठा विलोभनीय होता.
तेवढ्यात आजोबा म्हणाले, चल बाळ, आपण स्लॅबवर जाऊ. मस्तपैकी पावसात भिजू. खूप मजा येते. पावसात भिजण्याची मजा काही औरच.’ मला तर तेच हव होतं. लगेच मी आणि आजोबा दोघही वर मोकळ्या स्लॅबवर गेलो. पावसात उभे राहिलो.
पावसाचे टपोरे थेंब अंगावर पडत होते. एक मिनिटात मी पूर्ण भिजून गेलो. किती थंडगार होते ते थेब. उन्हाळ्यात तीन महिने सहन केलेला उकाडा मिनिटा दोन मिनिटातच पूर्ण नाहीसा झाला होता.
अंगात विलक्षण उत्साह व नवा हुरूप चढला होता. आजोबा तर सिनेमातल्या हिरोसारखे बेभान होऊन नाचत होते. त्यांचं पाहून मीही मस्त नाचलो. जवळजवळ अर्धा तास तरी आम्ही पावसाची अशी मजा लुटली.
नंतर माझे ढगांकडे लक्ष गेलं. ढगांकडे पाहून मला एक वेगळाच साक्षात्कार झाला. माझ्या मनात असा एक न्यूनगंड होता की मी सावळा आहे म्हणून गो्-या मुलांपेक्षा कमी सुंदर आहे.
पण त्या दिवशी मला जाणवलं की सर्वांचा दाह शांत करणारा हा काळा ढगच पांढऱ्या ढगांपेक्षा श्रेष्ठ आहे. कृष्णाला मेघश्याम का म्हणतात त्याचा खरा अर्थ मला त्या दिवशी कळला. मी यावर विचार करू लागलो की आपणही पावसाप्रमाणे सर्वांची मनं शांत करावी. हेच आपलं जीवनध्येय असाव.
काल संध्याकाळी गच्च ढग दाटून आले होते. दिवसभर ते मळभ मनावर दाटलेलं. घरात एरवी कोणी नसताना मला सहसा कंटाळा येत नाही, पण काल खरच खूप उदास वाटत होतं.
आणि थोड्याच वेळात तो आला… सगळ्यांचा जिवलग पाउस… तो आला ते “मी आलोय, मी आलोय” अशी गर्जना करतच. शेवटी बराच वेळ नुसतच हातात धरलेलं पुस्तक खाली ठेवलं आणि बाहेर गेले.
पाऊस मनमुराद पडत होता…. त्याच्या सरी अंगणातल्या झाडांना शाही स्नान घालत होत्या. अर्थात झाडांना खूप आनंद होत असणार.. कारण रोजरोज अशी संधी त्यांना कुठे मिळते म्हणा ??? काल खूप दिवसांनी असा मस्त पाऊस पडताना इतकं निवांत पहाता येत होतं मला…
काही शाळकरी मुली छान भिजत चालल्या होत्या. आपणही असच भिजायचो हे आठवून हसू आलं… त्या त्या वयाची ती ती मज्जा असते म्हणा..तेंव्हा आईने हजारवेळा सांगूनही मुद्दाम रेनकोट विसरून शाळेला जायचो आपण… आणि मग संध्याकाळी भिजून आल्यावर आई रागवायची… पण नंतर छान गरमागरम चहाही करून द्यायची, आलं टाकून.. त्या चहानं पावसाचा गारवा कुठल्याकुठे पळून जायचा..
मी थोडासा ओला झाल्यामुळे माझी आई माझ्यावर रागावली पण तिने अद्रक आणि तुळशीचे पाने टाकून गरमागरम चहा बनविला तो चहा पिऊन मला खूप आरामदायी वाटले.
आत्ताही मी बाहेर उभी पाहून आईची हाक… “अगं, काय करतीयेस बाहेर??? केव्हढा पाऊस पडतोय!! ” आणि इतक्यात एक चिमुकला पक्षी समोरच्या सीताफळाच्या झाडावर येउन बसला. बिचारा भिजून अंग चोरून बसला होता.
नीट लक्ष देऊन पाहिलं तर त्याच्या तोंडात काहितरी होतं, ते त्यानं गट्टम केलं, त्यामुळे त्याला थोडी हुशारी वाटली असावी. मग मस्त शीळ घालत स्वारी उडून गेली. काल खूप दिवसांनी नारळाच्या पानांवरून पाण्याचे चिमुकले थेंब पडताना पाहिले.. किती लयीत पडत होते ते… झाडाच्या पानावर ऐटीत बसलेले पाण्याचे थेंब… जणू काही मोतीच… कदाचित म्हणूनच मोत्यांना ‘पाणिदार’ म्हणत असतील….
एकदम आठवण आली माझ्या बांबू ट्री ची….. ते बिचारं नेहमी आपलं त्याच्या काचेच्या भांड्यात बसलेलं असायचं…. हसायचं नाही.. म्हटलं त्यालाही काळायला हवं ना??? खरा पाऊस कसा असतो ते??? मग त्याला जरा अंगणात आणून ठेवलं… बहुतेक त्याला ते आवडलेलं असावं… खुश झालं(असं मला वाटलं..) पण कालच्या पावसानं मला खूप आनंद दिला, एव्हढं मात्र खरं….”देणारयाचे हात हजारो, दुबळी माझी झोळी “…… खरं आहे… एकदम पटलं….. माझ्या आयुष्यातील हा एक उत्तम दिवस होता. पावसाळ्याचे दिवस खरोखरच प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणतात. मी अनुभवलेल्या पावसानं मला नवं जीवन दिलं होतं.