Autobiography Of A Computer Essay In Marathi नमस्कार मित्रांनो ,ओळखलं का मला? मी तुमचा एक मित्र आहे. तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनलेलो आहे. तुम्ही मला दररोज तुमच्या कामासाठी वापरता, गेम खेळण्यासाठी, मनोरंजनासाठी माझा वापर करतात. मग ओळखलं का मला? नाही ना ,मी तुमचा मित्र संगणक बोलतोय !आज मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत.
संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A Computer Essay In
Marath
आज माझे मन मोकळे करायचे आहे, बरच काही बोलायचे आहे! माझा जन्म पश्चिमात्य देशात फार वर्षापूर्वी झाला आहे. ‘चार्जर बॅबेज’ हे माझे जन्मदाते आहेत. इ.वी.1832 मध्ये म्हणजे सुमारे 150 वर्षांपूर्वी माझा जन्म झाला. तेव्हा मी सुरुवातीला आकाराने खूप मोठा होतो. परंतु कालांतराने माझ्यात हळूहळू बदल होत गेले.
आता माझा पहिल्यापेक्षा आकार छोटा झाला आहे. त्यात बरेच बदल घडून आलेले आहेत. आज मी जसा तुमच्यासमोर आहे तसा आज आहे. आज काही जण मला ‘कॉम्प्युटर’ म्हणतात तर काही जण मला ‘डेस्कटॉप’ अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. काही ना काही कामासाठी प्रत्येक व्यक्ती माझा वापर करत असतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मी सगळ्यांच्या उपयोगी पडत असतो.
एकविसाव्या शतकात मानवाने मला एवढे सामर्थ्यशाली केले आहे की, मला अशक्य असे काही नाही. माझ्यावर एकेकाळी फक्त शास्त्रज्ञांची मक्तेदारी होती पण आता सर्वसामान्य माणूसही माझा योग्य रीतीने वापर करू शकतो. इंटरनेट मुळे मी तुम्हाला जगभरातील सर्व माहिती उपलब्ध करून देतो.
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मी खूप महत्त्वाचा आहे. त्यांना लागणारी सर्व शैक्षणिक माहिती, शाळेत दिलेली प्रोजेक्ट बनवण्यासाठी माझा उपयोग होतो. एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल तर एका चुटकीसरशी मी त्यांना उत्तर सापडून देतो. रेल्वेचे किंवा विमानाचे तिकीट काढण्यासाठी आपल्याला तासनतास लाईन मध्ये उभे राहावे लागत होते. परंतु आता या तिकिटांचे आरक्षण माझ्या द्वारे केले जाते.
दर महिन्याला येणारी विजेची बिले, दूरध्वनी बीले, विम्याचे हप्ते देणारे स्मरणपत्रे तयार केली जातात. मोठमोठ्या संस्था, कारखाने व ऑफिसेस येथे बिले तयार करण्यासाठी, कामगारांचे पगार बिल बनवण्यासाठी, प्रत्येक व्यवहाराची गोष्ट अपडेट ठेवण्यासाठी माझा उपयोग केला जातो.
मे माझ्यात खूप माहिती साठवून ठेवू शकतो .शाळेत सुद्धा भरपूर वेगवेगळ्या गोष्टींसाठी माझा उपयोग केला जातो म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या परीक्षांचे निकाल चुटकीसरशी तयार करतो. सर्व विद्यार्थ्यांची माहिती माझ्यात अपडेट केली जाते.
मोठी मोठी पुस्तके, ग्रंथ अगदी सहजपणे एका चुटकीसरशी माझ्या द्वारे छापली जातात. माझा सर्वात महत्त्वाचा उपयोग बँकेत, शेअर्स कंपन्या व विमा कंपन्यांमध्ये जास्त होतो. बँकेत प्रथम लेजर पद्धती होती. त्यामुळे प्रत्येक कामाला वेळ लागत होता व कर्मचाऱ्यांना ही खूप शारीरिक व मानसिक त्रास होत होता.
पण आता प्रत्येक बँकेत लेझर ची जागा संगणकाने घेतल्यामुळे आता बँकेतील कामे जलद गतीने होऊ लागली आहेत. सर्व खातेदारांची माहिती अतिशय संरक्षित पणे ठेवली जाऊ शकते. नजरचुकीने काही चूक झाली तर ती आपल्याला लगेच लक्षात येते. असे कोणते क्षेत्र नाही जेथे माझ्या उपयोग होत नाही .प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात मी खूप उपयोगी आहे.
मी तुमच्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असून मी तुम्हाला सतत उपयोगी पडत आहे. याचा मला खूप आनंद आहे व अभिमान सुद्धा!! मी माणसाच्या महत्वाच्या भरपूर गोष्टी माझ्या पर्यंतच मर्यादित ठेवतो. परंतु माझे चांगले फायदे असले तरी काही लोक माझा दुरुपयोग करु लागले आहेत. चुकीच्या कामासाठी व चुकीच्या मार्गाने माझा वापर होऊ लागला आहे .
माझा जन्म हा माणसाच्या प्रगतीसाठी झाला होता परंतु काही लोक माझा दुरुपयोग करून अकाउंट हॅक करणे, वेबसाईट हॅक करणे, बँकेतून कोणाच्याही खात्यातून पैसे काढणे, अश्लील फोटो, व्हिडिओ पोस्ट करणे यासाठी माझा उपयोग करू लागले आहेत.
मला तुम्हाला सर्वांना एकच विनंती करायची आहे ,मी जरी तुमच्या एवढ्या उपयोगी पडत असलो तरी मला निर्माण करणारा तूच आहेस! मला माहिती देणारा व आज्ञा देणारा तूच आहेस! अंतिम आधीराज्याचा दुरस्थ नियंत्रक माणूसच आहे. तेव्हा माझ्या चांगल्या कामासाठी उपयोग करा. माझा उपयोग वाईट गोष्टींसाठी करू नका, ही एकच हात जोडून विनंती आहे माझी सर्वांना !!!