Mi Pahilele Pradarshan Essay In Marathi मी पाहिलेले फुलांचे प्रदर्शन आहे. गणपती उत्सवाचा काळात मी एका शनिवारी – रविवारी बघितलेले प्रदर्शन आहे. आमचा गावातील नगरपालिकेचा जागेमध्ये भारावलेले फुलालचे प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन नगरपालिकेने भरविले होते. ह्या दिवसामध्ये विविध फुलाचा मौसम असतो त्यामुळे फुलाचे – प्रदर्शन भरवायला हा काळ अनुकूल आहे.
मी पाहिलेले प्रदर्शन मराठी निबंध Mi Pahilele Pradarshan Essay In Marathi
दूरदूरचे लोक हि स्वतः जोपासलेली, मोठया प्रेमाने वाढवलेली फुले, फुलाचा कुंड्या आणि कलात्मक पुषप रचना या प्रदर्शनात मांडतात. फार सुंदर देखावा असतो. प्रदर्शनाची तयारी चार आठ दिवसापासून चालू असते. फार सुंदर देखावा असतो ! वेगवेगळ्या आकाराचे स्टॉल उभे केलेले असतात. कोठे रंगीबेरंगी छत्री तर कुठे छोटे मांडव हि उभारलेले असतात. वेगवेगळ्या प्रदर्शनाला आकर्षक नवे दिली जातात.
प्रदर्शनाच्या आदल्या दिवसापासून प्रदर्शनात भाग घेणारी मंडळी तेथे आवरून लागतात. मग फुलाची आकर्षक मांडणी केली जाते. ठरलेल्या दिवशी उदघाटन हि केले जाते आणि प्रदर्शन पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड उडते . प्रदर्शन सर्वांसाठी खुले असते. एका विभागात वेगवेगळ्या रंगाची गुलाब मांडलेले असतात. गुलाबाची कळी , अर्थवट उमलले फुल आणि पूर्ण उमललेले गुलाब! गुलाबाचे कसे आणि किती प्रकार आहेत. पांढरा, पिवळा, गुलाबी, लाल गुलाबाबरोबर निळा, जांभळा आणि नारंगी गुलाबही तिथे दिसतो.
एकदा तर बिनकाट्याचा गुलाब पाहून आम्ही चकित झालो. दुसऱ्या विभागात जास्वंदीची विविध प्रकारची फुले होती. पूर्ण फुलल्या जास्वदीं बरोबर मुकी तेथे होती. गंमत म्हणजे तांबड्या जास्वंदीच्या शेजारी पांढरी, गुलाबी, फिकट जांभळा, नारंगी जास्वदीं हि आमचे स्वागत करत होती. पुढचा एका विभागात विविध प्रकारची पांढरी फुले मांडण्यात आली होती.
काही सुवासिक होती; तर काही बिनवासाची होती. विशेष म्हणजे या दिवसात न आढळणारी काही फुले पुष्पप्रेमींनी सांभाळून आणलेली होती. एका विभागात फुलांबरोबर दवणा व मारवा अशा सुगंधित वनस्पती ठेवलेली होती. केतकी वर्ण असलेला केवडा आपल्या रंगाने आणि गंधाने सर्वाना मोहित करत असतो.
तसेच मध्यभागी एक मोठी कुंडी ठेवलेली होती. या कुंडीत लावलेले आणि मोठे काळजीने वाढवलेले हिरव्या चाफ्याचे चिमुकले झाड होते. हे झाड सर्वांचे लक्स वेधून घेत होते. या प्रदर्शनात वेगवेगळ्या पुष्परचनाहि मांडण्यात आल्या होत्या. मोठ्या कष्टाने वाढवलेली बिन सोय झाडे प्रदर्शनासाठी ऐटीत रांगेत बसली होती. छोट्या वडाच्या झाडाला छोट्या पारंब्या होत्या.
आंब्याच्या झाडाला आंबे लागले होते. झाडापेक्षाही त्याच्यावरचा आंबा मोठा दिसत होता. खरोखर फुले हि माणसाला निसर्गाने दिलेली मोठी देणगी आहे. माणसाने फुलासारखेच आनंदी, निरागस व प्रसन्न राहावे, असाच संदेश जणू ही फुले प्रेक्षकांना देत होती.
ऑर्किड, सूर्यफूल, लीली, तुलिप, स्वीट पी, गुलाब, मोगरा, जास्वंद ह्या प्रकारची फुलं होती. रंगीबेरंगी फुलांची खरेदी, विक्री होत होती. अनेक प्रकारची फुलं बघून माझे मन खूप हर्षित झाले. फुलांची प्रदर्शन हे खास आकर्षण बनले आहे.
प्रदर्शनाला भेट देणे मला खूप आवडते. मग ते कोणतेही प्रदर्शन असो मी ते बघायला जाते. अशा प्रदर्शनाला मी माझ्या मैत्रिणी सोबत भेट द्यायला गेले होते. प्रदर्शन गावात असल्याने मोठे आणि भव्य दिव्य नव्हते. पण फार सुंदर आणि आकर्षक होते.
मी सुट्टीच्या दिवशी गेलो म्हणून त्यामुळे गर्दी बघायला मिळाली होती. तेथे सर्व वयोगटाचे लोक आलेले होते. लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत वृद्धापर्यंत सर्वजण प्रदर्शनाचा आनंद लुटत होते.
प्र्त्येकजण आपलयाला आवडतील त्या ठिकाणी जाऊन आनंद घेत होते. प्रत्येकजण एकेक स्टॉल वर जाऊन भेट देऊन माहिती गोळा करत होते आणि नवनवीन माहिती घेत होते. त्याबद्दल विचारणा करत होते. प्रदर्शनातून विविध गावातून आणि शहरातून लोक भेट द्यायला आलेले होते. दोन तास फिरून मी आणि माझी मैत्रीण दोघीही गप्पा करत घरी परतलो होतो.
आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी विविध प्रदर्शनाला भेट देणे आवश्यक आहे. तसेच राज्यातून आणि देशातून कान्याकोपरातून लोक एकत्र येतात आणि आपली भारतीय संस्कृती पाहण्याची आणि जोपासण्याची प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.