Mi Pakshi Aste Tar Essay In Marathi आज सुट्टीचा दिवस रविवार! मुले घरी होती.रविवार म्हंटले की आईला खूप कामे! सर्व कामे संपल्यानंतर खूप दमल्यासारखे झाले होते.म्हणून म्हंटले थोडावेळ आराम करावा तेवढ्यात ,माझ्या हाताला एक कवितेचे पुस्तक लागले.
मी पक्षी असते तर…मराठी निबंध Mi Pakshi Aste Tar Essay In Marathi
ते हातात घेतले व उघडले तर त्यात एक कविता होती, मी पक्षी झाले तर ? “वाटे मजला पक्षी व्हावे ,स्वच्छंद आकाशी उडावे | नको चिंता व्यक्त कशाची, आनंदी नवासी भरावे” ही ओळ वाचल्यानंतर मनात एकच गोंधळ उडाला होता.
खरंच मी पक्षी झाले तर या मोकळ्या आकाशात आपले पंख पसरून स्वच्छंदपणे उडू शकेल. मला आभाळही ठेंगणे होईल. रोज सकाळी लवकर उठून सर्व कामे लगबगीने करावी लागतात .
सकाळी मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार करणे. सगळ्यांचा डबा करणे, घरची साफसफाई करता करता पूर्ण दिवस कुठे निघून जातो हे कळत नाही .मी पक्षी झाले तर ..आकाशात मोठी भरारी घेईल.
मला आवडेल त्या झाडावर माझे घर बांधेल.हिरवे गवत,पाने यांच्या साहाय्याने मला आवडेल तसे कलाकुसर करून मी माझे घरटे बांधेल. व सकाळपासून संध्याकाळपर्यंत हिरव्यागार पर्वतावर प्रवास करून दमून आल्यानंतर माझ्या घरट्यात हिरव्यागार गवतावर शांत झोपेल.
सकाळ झाल्यावर माझ्या गोड व मधुर आवाजाने सर्वांना जागे करीन. इतर पक्षांच्या बरोबर मी सुद्धा सातासमुद्रापलीकडे दूर दूर सर्व देश पाहून येईल.उडत-उडत निसर्गाचा आनंद घेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडत जाईल .पांढरे शुभ्र आकाश, उंच पर्वत, दऱ्या, मोठी मोठी झाडे, थंडगार जोरात येणारा वारा हे अनुभवायला मिळेल. उंच फांदीवर बसून मी झोका घेईल. जेव्हा भूक लागेल तेव्हा मला आवडेल त्या झाडावरील मधुर मधुर फळे खाली.
नद्या व पर्वतातून वाहणाऱ्या मधले गोड पाण्याचा आस्वाद घेईल. त्या नदीच्या पाण्यात आनंदाने उड्या मारत अंघोळ करेल.मनुष्याला जसे कुठेही जाण्यासाठी बस, गाडी या वाहतुकीच्या साधनांचा उपयोग करावा लागतो.
तसेच मी पक्षी असेल तर मला कोणत्याच वाहनाची गरज भासणार नाही. माझ्या पंखा मुळे मी कोठेही जाऊ शकेल. हे तेवढेच खरे की मला पिंजर्यात राहायला आवडणार नाही.
मला पिंजऱ्यात टाकले तर माझ्या जीवनाला काही अर्थच राहणार नाही. स्वतंत्रपणे उडण्याचे पक्षांचे खरे जीवन आहे. म्हणून मी पक्षी असताना मनुष्यापासून दूर राहणे पसंत करेल. कारण मनुष्य हा पक्ष्यांना पकडून पिंजऱ्यात बंद करतात. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणत आहेत.
त्यांची शिकार करतात. पाऊस आला की त्याच्या रिमझिम धारांमध्ये मला भिजायला खूप आवडेल. इंद्रधनुष्याच्या जवळ जायला मला जास्त आवडेल. परंतु आज आपल्या देशाची स्थिती अशी आहे की भरपूर प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे पक्ष्यांना त्यांचा खूप त्रास उद्भवत आहे.
मोठमोठ्या कंपन्या या वायुप्रदूषण करत आहेत. त्या कंपन्यांमधून निघणारा धूर यामुळे पक्ष्याना श्वास घेण्यास त्रास होत आहे .त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. मानवाच्या प्रगतीसाठी मानवाने मोठे मोठे टॉवर उभारलेले आहेत. पण ते टॉवर पक्ष्यांचा जीव घेत आहेत.
त्यामुळे बऱ्याच प्रमाणात पक्षी हे हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत मानवाने आपल्या प्रगतीसाठी झाडे तोडली आहेत. जर ही झाडे अशीच सतत तोडली जाऊ लागली .तर पक्षी खाणार काय ? पक्ष्यांना जर खायला मिळाले नाही तर ते भुकेने मरून जातील.
ती राहणार कोठे ? पक्षांसाठी झाडे ही खूप महत्त्वाची आहेत. त्या झाडांमुळे पक्षांना आहार व निवारा या दोन्ही गोष्टी मिळतात. जर या दोन्ही गोष्टी पक्ष्यांना मिळाल्या नाही तर, पक्षी जगणार कशे? मी पक्षी झाले तर पक्ष्यांचे जीवन मला अनुभवता येईल.
त्यांच्या जीवनात येणाऱ्या सुखाची व दुःखांची मला जाणीव होईल. प्रत्येक अडचणीवर मात करून वेळीच मार्ग काढून सुटका करायचा मी प्रयत्न करेल. निसर्गातील संकटांचा व वातावरणात होणाऱ्या बदलांचा मी सामना करीन. मी माझ्या कल्पनेत पूर्णपणे रमून गेले होते.
तेवढ्यात आवाज आला, आई मला भूक लागली आहे. मी माझ्या कल्पनेच्या विश्वातून बाहेर आले. पक्षी होणे ही कल्पना चांगली होती. पण, कल्पना ही कल्पनाच असते ते अस्तित्वात कधीच घडणार नाही हे खरे! तेव्हा मी स्वतःशीच म्हणाले आपले जीवन हे पक्ष्यांनपेक्षा खूप वेगळे आहे.