फुले बोलू लागली तर…मराठी निबंध Phule Bolu Lagli Tar Marathi Nibandh

Phule Bolu Lagli Tar Marathi Nibandh प्र या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. माणसाप्रमाणे जर फुले देखील एखादी भाषा बोलू लागली तर काय होईल? अशा आशयाचे स्पष्टीकरण या निबंधात केलेले आहे.

Phule Bolu Lagli Tar Marathi Nibandh

फुले बोलू लागली तर…मराठी निबंध Phule Bolu Lagli Tar Marathi

Nibandh

नेहमीप्रमाणे आज मी घरा-समोर असलेल्या फुलांच्या बागेत फिरण्यासाठी गेले असता बागेतील रंगीबिरंगी फुले रोज पेक्षा आज जरा जास्तच उमललेली होती आणि आनंदाने डोलत होती .तेव्हा ते लहान लहान मुले आली व झाडावर लागलेली ही रंगी-बिरंगी फुले तोडू लागली.

तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज आला आई ग !सोडलंस ना मला  किती बरं दुखलं !पण तुला काय त्याचं !आम्ही मुके बिचारे!आम्हाला तोडा, मोडा तेव्हा पायी तुडवा त्याने तुम्हाला काही इजा होणार नाही.

आम्ही आपली मुकी बिचारी !तुम्ही मनुष्याने कितीही आम्हाला त्रास दिला तरी सुद्धा आम्ही मात्र आपले सुगंध देण्याचे काम करीतच राहणार !

तेवढ्यात मी ओरडलं कोण आहे ?काय म्हणलास ?कोण बोलतोय ?पुन्हा एक आवाज आला अरे आम्ही फुलं बोलतोय ,फुलं !

दिवसभर सर्वत्र सुगंध देऊन संध्याकाळी कोमल तो तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी  आम्हाला तोडता .कधी आमच्यापासून पुष्पगुच्छ बनवितात .तर कधी आमच्यापासून हार  तयार करतात ,तर बायका आमचा गजरा करून केसात घालतात .सकाळी दिवस सुरू होताच प्रत्येकाच्या घरात देवपूजा साठी आम्हाला मान मिळतो .

आम्ही धर्म -जाती भेद  -भाव कधीच करत नाही.सर्वांना समान समजतो कोण गरीब किंवा श्रीमंत असो आम्ही प्रत्येकाला एक सारखा सुगंध देतो .

आम्ही बोलू शकत नाही म्हणून कोणी ही आम्हाला  कसेही तोडता ,आम्हाला आज  आम्हीबोलू शकतो म्हणून तुम्हाला हे सगळं सांगते ?”कधी फुलांचा  बागा पाहिलात का ?”

कधी फुलांच्या बागा पाहिल्यात का?” नसतील पाहिल्यात तर जरूर पाहा. आमचे विविध आकार आणि रंग तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण जरूर घेऊन येतील. सणासुदीला, लग्नसमारंभाला आमचे खास महत्त्व असते हे तुम्ही जाणताच.

आम्हांला सगळ्यांत जास्त बोलायला आवडेल ते त्या माळीदादाशी; कारण ते आमच्या वेलींसाठी वाफे तयार करतात. पाणी घालतात. खत घालतात.

आम्हांला सूर्यप्रकाश मिळावा म्हणून आमच्या वेलींना हळुवारपणे मांडवावर चढवतात.

आमचे आयुष्य फार तर एक-दोन दिवसांचे असते. त्या एखाद-दुसऱ्या दिवसांत पक्षी, भुंगा, मधमाशी यांनाही आनंद दयायचा असतो.

त्यामुळे आमच्यातील काहीजणांना तरी वेलीवर तसेच राहू दया. परिसराची शोभा अशीच सुंदर राहू द्या.

फुले बोलू लागली तर ते आपल्याला सांगितलं की त्यांच्या पाकळ्या तोडून आपण जेव्हा एखाद्या समारंभात फुलांच्या पायघड्या म्हणून जमिनीवर टाकतो आणि त्यावर पाय ठेऊन लोक ये जा करतात त्यावेळी त्या फुलांना खूप त्रास होतो.

सर्वात महत्वाचे म्हणजेच फुले जर बोलू लागली तर मी रोज दिवसभर माझ्या घरच्या कुंडीतील फुलांकडे खूप गप्पा गोष्टी करीत राहीन. त्यांना काय हवे नको ते विचारपूसही करेन. खरंच किती मज्जा येईल ना !

फुले बोलू लागली तर कदाचित गुलाबाचे फुल बाकीच्या सर्व फुलांना बोलले की बघा! मी किती सुंदर आहे. मी लाल, पिवळा, गुलाबी आणि सफेद अशा वेगवेगळ्या रंगामध्ये असतो.

सगळ्या फुलांमध्ये सर्वात जास्त मलाच लोकांची पसंती असते. अगदी चाचा नेहरूनच्या कोटावरही उठून दिसण्याचा मान मीच पटकवला. लग्नसमारंभाताही आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी ही मलाच म्हणजेच लाल गुलाबाच्या फुलालाच पसंती दिली जाते. माझ्यापासून बनलेले गुलाबजल लोक आवर्जून वापरात आणतात. मीच सर्वांचा लाडका आहे.

कदाचित ती फुले आपल्याला बोलतील की तुमच्यातील काही लोक आम्हा फुलांना तोडता आणि थोड्या वेळाने सुंगध घेऊन झाला की कुठेही फेकुन देता तसें करू नका.

फुले जर बोलू लागली तर ती आपल्याला सांगितील की पूजा झाल्यावर फुलांना नदी तलावाच्या पाण्यात टाकू नका नाही तर पाण्याचे प्रदूषण होऊ शकते तर फुलांना व्यवस्थित निर्माल्य कुंडीत टाका.

फुले आपल्याकडे जर बोलू लागली तर ती नक्की आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगतील की आम्ही फुले ही झाडावरच खूप उठून दिसतो. हवेची छोटीशी झुळूक आम्हाला धक्का देऊन गेली की आम्ही किती छान डोलतो.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment