पोलो खेळाची संपूर्ण माहिती Polo Game Information In Marathi

Polo Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण ‘पोलो’ या खेळाची सविस्तर पणे माहिती पाहणार आहोत. पोलो हा एक सांघिक खेळ असून 8 खेळाडूंमध्ये संघ करून हा खेळ खेळला जातो. पोलो हा खेळ थोडाफार हॉकी सारखाच असतो. परंतु यात फरक आहे. म्हणजे हा खेळ घोड्यावरून काठीने चेंडू मारून खेळला जातो.

Polo Game Information In Marathi

पोलो खेळाची संपूर्ण माहिती Polo Game Information In Marathi

पोलो हा खूप वर्षापासून खेळला जाणारा खेळ आहे .या खेळातील डावपेच इतर खेळांत प्रमाणे असले तरी घोडदौडीमुळे हा खेळ अति वेगवान असा आहे. हॉर्स पोलो, एलिफंट पोलो, वॉटर पोलो,बाईक पोलो,स्नो पोलो हे पोलो या खेळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु हॉर्स पोलो हा सर्व जगभरामध्ये लोकप्रिय असा खेळ आहे

.एलिफंट पोलो हा खेळ हत्तीवर बसून खेळला जातो. वॉटर पोलो हा पाण्यात खेळला जातो व हा खेळ हंगेरी देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. बाईक पोलो हा खेळ सायकलच्या मदतीने खेळला जातो. सायकल पोलो या खेळाची सुरुवात भारतातच पहिल्या महायुद्धानंतर झाली.

बरियाचा राजकुमार सुबक सिंग याने 1926 मध्ये सायकल पोलो चा संघ तयार केला होता. 1955 साली हैदराबाद येथे सेना दलातर्फे अखिल भारतीय सायकल पोलो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

‘सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडिया’ ही संघटना 1966 मध्ये हैदराबाद येथे स्थापना स्थापन झाली. या संघटनेने या खेळाच्या काही नियमात सुधारणा केली. स्नो पोलो हा खेळ बर्फाच्या मैदानावर खेळला जातो. आता, आपण या खेळाचा इतिहास पाहणार आहोत. राजे महाराजे यांच्या काळात जर सैनिक म्हणून काम करायचे असेल तर पोलो हा खेळ खेळवला जात होता.

त्या काळातील पोलो मध्ये व आधुनिक पोलो मध्ये खूप फरक आहे .हा खेळ त्यावेळी 100 – 100 सैनिकांमध्ये खेळला जात होता. आधुनिक पोलोची सर्वात ही आशिया खंडातील झाल्याचे कळते व येथूनच हा खेळ सर्व जगभर प्रसिद्ध झाला.

2500 वर्षांपूर्वी या खळाची सुरुवात पर्शिया म्हणजे इराणमध्ये झाली. कालांतराने पोलो हा खेळ या देशाचा राष्ट्रीय खेळ बनला .राजघराण्यात जास्त प्रमाणात हा खेळ खेळला जात होता. राजपुत्रांना या खेळाचे खास प्रशिक्षण दिले जात होते.

त्या काळात स्त्रिया सुद्धा हा खेळ खेळत होते. त्या काळात खेळल्या जाणाऱ्या पोलो या खेळाची लघुचित्रे आजही इराण मध्ये पहावयास मिळतात. त्या काळी इराणमध्ये या खेळाला ‘चौगान’ या नावाने ओळखले जात होते. कालांतराने इराणमधून हा खेळ तिबेट अरबस्थान, चीन, जपान या देशांमध्ये पसरला गेला.

चीनमध्ये या खेळाला जास्त लोकप्रियता मिळाली. भारतामध्ये खेळाची सुरुवात मणिपूर येथील सिलचर याठिकाणी झाली. व चहाच्या व्यापारासाठी आलेले इंग्रज देखील येथूनच हा खेळ शिकले असेही म्हणले जाते. 1800 च्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये हा खेळ खेळला गेला.

1969मध्ये इंग्लंडमध्ये हा खेळ खूप गाजला. पूल (चेंडू) या तिबेटी शब्दापासून पोलो या शब्दाची उत्पत्ती झाली. सर अँथोनी शर्लि यांनी 1913 मध्ये त्यांच्या ट्रॅव्हल्स टू पारशी या या पुस्तकात पोलो या खेळाचे वर्णन केलेले आहे. 1859 मध्ये सिल्वर येथे पहिला ब्रिटिश क्लब स्थापन केला.

नंतर 1960 मध्ये कलकत्ता पोलो क्लब ची स्थापना झाली 1890 मध्ये ‘युनायटेड स्टेट्स पोलो असोसिएशन’ ही संघटना स्थापना झाली व त्या संघटनेने अमेरिकेतील खेळांच्या नियमांना अधिकृत स्वरूप प्राप्त करून दिले.

‘हॅलिमहॅम पोलो असोसिएशन’ ही संघटना अमेरिकेच्या बाहेर पोलो या खेळाचे नियंत्रण करते. ‘गेम ऑफ किंग्ज ‘म्हणून ओळखले जाणारे टॅमर लेनचे पोलो मैदान अजून समरकंद मध्ये आहे. बर्लिन मध्ये 1936 मध्ये पोलो हा खेळ ऑलम्पिक मध्ये समाविष्ट करण्यात आला.

या खेळात पोलो स्टिक व बॉल हे मुख्य साधने वापरली जातात. तसेच खेळाडूंच्या सुरक्षितेसाठी हेल्मेट व कनी गार्ड या प्रकाराच्या वस्तू वापरतात. या खेळातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे घोडा ! ज्याला ‘पोलो पोनी’ असे म्हणतात .पोलो साठी पूर्वी लहान आकाराच्या घोडयचा वापर केला जात असे परंतु 1919 पासून घोड्यांच्या आकारावर नियंत्रण केलेले नियम बंद करण्यात आले.

अधिक शक्तिशाली व आकाराने मोठे असलेले घोडे पोलो खेळात वापरण्यात येऊ लागले .त्यामुळे घोडे निवडताना वेगवान, तगडे व स्वारांच्या ताब्यात राहणारे घोडे या गोष्टी विचारात घेतल्या जात होत्या. अर्जेंटिना,आयलँड व ऑस्ट्रेलिया या देशातील जातिवंत घोड्यांना जास्त मागणी होती.

पोलो हा खेळ गवताच्या मैदानावर खेळला जातो .मैदानाची लांबी 274.32 मीटर असून रूंदी 146.3 मीटर असते. मैदानाच्या सीमेवर 29.9 सेंटी मीटर उंचीच्या फळ्या लावलेल्या असतात. मैदानावर 3 फूट उंच व 7.3 मीटर लांब अंतरावर खांब उभे केलेले असतात . घोड्याचा धक्का लागल्यावर घोड्याला इजा होणार नाही. या कारणामुळे हे खांब ठिसूळ लाकडांनी बनवलेले असतात. पोलो या खेळात

वापरण्यात येणारा चेंडू विलो झाडाच्या मुळापासून बनवलेला असतो .त्याचे वजन 120 ते 135 ग्रॅम असून बॉलचा व्यास 8.25 से.मी.असतो. खेळात वापरली जाणारी स्टिक म्हणजे काठी ही वेताची असते. तिची लांबी 1.2 ते 1.4 मीटर असते. या काठीच्या टोकाला एक आडवी दांडी असते. तिची लांबी 22.8 सेंटीमीटर असून दुसर्‍या टोकाला स्टिक पकडण्यासाठी जाळीदार गपडा गुंडाळलेला असतो. मुठीत अडकवण्यासाठी एक पट्टा असतो .

पोलो या खेळात 2 संघ असतात. प्रत्येक संघामध्ये 4 खेळाडू असतात. प्रत्येक खेळाडूला नंबर दिले जातात. तो नंबर त्यांच्या पोशाखावर दर्शवलेला असतो .प्रत्येक खेळाडूला क्रमांक देताना त्यांच्या स्थानानुसार दिला जातो .पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे खेळाडू हे सर्वात पुढे असतात .प्रथम क्रमांकाचा खेळाडू हल्ला करण्यासाठी पुढे असतो.

बॉलला अचूकपणे हिट करणे हे त्याचे मुख्य लक्ष असते. दुसरा खेळाडू हा पहिल्या खेळाडूला बरोबरीने पाठिंबा देत असतो. सर्वोत्तम खेळणाऱ्या खेळाडूला तिसऱ्या क्रमांकाचे स्थान दिले जाते. तिसऱ्या खेळाडूला हाफ बॅक म्हणजेच हॉकीतील सेंटर हाफ सारखा असतो.

तिसरा खेळाडू हा चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूला मदत करत असतो. चौथ्या खेळाडूची भूमिका ही एका बचावकर्त्या सारखी असते. त्याला प्रतिस्पर्धा कडून येणाऱ्या गोलांना अडवायचे असते. त्यामुळे या खेळाला गतिमान स्वरूप प्राप्त होते .त्यामुळे खेळाडूंच्या जागा झपाट्याने बदलत राहतात. प्रत्येक क्रमांकाच्या खेळाडूला वेगवेगळ्या  स्थानावर खेळावे लागते.

पोलो या खेळात 7.30 मिनिटाचे 8 राऊंड असतात. काही वेळा ते 4 व 5 राउंड असतात. प्रत्येक राउंड नंतर 3 मिनिटांची व मध्यंतरी  5  मिनिटांची विश्रांती असते. प्रत्येक गोल झाल्यानंतर संघ बाजू बदलतात. सामना सुरू होताना चेंडू मैदानाच्या मध्यभागी घेऊन सर्व खेळाडू आपल्या आपापल्या गोलखांबांच्या मागे एका रांगेत उभे राहतात.

निशाण खाली घेतल्यानंतर दोन्ही संघातील क्रमांक 1 वर आघाडीवर असलेले खेळाडू घौडदौड करून चेंडूचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करतात आणि खेळास सुरुवात होते. या खेळात समतोल  पद्धतीचा म्हणजेच हंडीकॅप सिस्टिम अवलंब करण्यात येतो.

1988 मध्ये अमेरिकेच्या एच.एल. हर्बर्ट. याने ही पद्धत अमलात आणली होती. बॉलला फटका मारल्यानंतर चेंडू विरुद्ध संघाच्या गोल पोस्टमध्ये मारावा लागतो असे केल्यास त्या संघाला गुण मिळतात. एखाद्या खेळाडूची काठी मोडली तरी त्याला स्वतःला मैदानाबाहेर जाऊनच की काठी बदलून आणावी लागते.

काठी हातातून निसटली तरी त्याला घोड्यावरून खाली उतरून ती उचलून घ्यावी लागते.घोड्यावरून खाली उतरलेल्या खेळाडूला परत घोड्यावर स्वर होसतोपर्यंत खेळत भाग घेत येत नाही. संघातील चारही खेळाडूंची गुणांची सरासरी म्हणजे संघाची एकूण संख्या असते. त्याला ‘टीम हॅंडीकॅप’ असे म्हणतात. ज्या संघाचे गुण संख्या कमी असते तो संघ हरतो.सर्वाधिक गोल असणाऱ्या संघाला विजयी घोषित केले जाते.

आपल्या भारतातील खेळाडूही पोलो या खेळांमध्ये खूप पारंगत आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे:-

कर्नल रवी राठोड

२. अभिमन्यू पाठक

३. सिमरन सिंह शेरगिल

४. धृवपाल गोधरा

५. सैय्यद शमशीर अली इ.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment