Carrom Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा बैठा खेळाबद्दल माहिती पाहणार आहोत. जो आपण सर्वजण एकत्र पणे घरातही खेळू शकतो. तो म्हणजे कॅरम !!! कॅरम हा जगातील सर्वात लोकप्रिय असा बैठा खेळ आहे. कॅरम हा खेळ भारतात खूप खेळला जातो. मुख्य म्हणजे महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्यप्रदेश मध्ये खेळला जाणारा हा खेळ आहे.
कॅरम खेळाची संपूर्ण माहिती Carrom Game Information In Marathi
हा खेळ एकदम साधा सोपा असून मनोरंजनासाठी हा खेळ खेळला जातो. कॅरम हा खेळ लहान मुलं, महिला, वयोवृद्ध ,तरुण अशा कोणत्याही वयातील लोक खेळू शकतात. या खेळाला कोणत्याही मैदानाची गरज नसते .हा खेळ एकदम सोप्या पद्धतीने ही खेळला जाऊ शकतो.
खेळाचे हा खेळ खेळताना ताकदीची गरज नसते परंतु थोडासा सराव व बुद्धीची गरज असते .हा खेळ दोन तीन किंवा चार खेळाडूंमध्ये खेळता येतो. कॅरम बोर्ड हा लाकडा पासून बनवलेला एक चौरस आकृती पृष्ठभाग असून त्याच्या चार कोपऱ्यांजवळ मोठी गोल छिद्रे असतात. स्ट्रायकर नावाची जड सोंगटी वापरून इतर हलक्या गोल सोंगट्या ह्या गोल छिद्रांमध्ये ढकलणे हे या खेळाचे उद्दिष्ट असते.
आता या खेळाच्या इतिहासाबद्दल आपण थोडी माहिती पाहूयात.
या खेळाची सुरुवात भारतीय उपमहाद्वीप येथे झाल्याचे बोलले जाते. सुरुवातीच्या काळात अनेक कॅरमच्या स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या.पहिल्या महायुद्धानंतर हा खेळ अत्यंत लोकप्रिय झाला. 1935 च्या सुमारास हा खेळ भारताव्यतिरिक्त श्रीलंकेमध्ये देखील खेळला जाऊ लागला.
अधिकृत रित्या कॅरम या खेळकरता स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. 1988 मध्ये आंतरराष्ट्रीय स्वरूपात कॅरम या खेळाचा विकास झाला. याच काळात आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाची स्थापना भारतात चेन्नई या राज्यांमध्ये करण्यात आली व तेव्हाच या खेळा संबंधी चे नियम देखील प्रकाशित करण्यात आले व त्यानंतर हळूहळू कॅरम हा सर्व देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला. जसे भारतात आपण या खेळायला कॅरम या नावाने ओळखतो.
तसेच फिजी येथे विंडी- विंडी व इस्रायल येथे जी-जी या नावाने हा खेळ ओळखला जातो. भारतातील पटियाला येथे एका राजवाड्यात असा एक कॅरम बोर्ड आहे ज्याचा पृष्ठभाग हा काचेचा बनलेला आहे त्यामुळे हा खेळ किती जुना आहे यावरून आपल्या लक्षात येत आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतातील विविध राज्यांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या “ऑल इंडिया कॅरम फेडरेशन” या संस्थेची स्थापना 19 व्या शतकात झाली.
ही संस्था भारतात कार्यरत आहे .या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष सरबजीत सिंह हे आहेत. ही संस्था आय.सी.एफ. म्हणजेच आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनची निगडित आहे. 1958 मध्ये भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी कॅरम क्लब असे अधिकृत फेडरेशन तयार केले व त्यानुसार वेगवेगळे स्पर्धांचे प्रायोजकत्व केले आणि त्यानुसार बक्षिसे देण्यात आली. संपूर्ण दक्षिण आशिया मध्ये प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि मालदीव मध्ये हा खेळ खूप लोकप्रिय आहे.
कॅरम बोर्ड हा लाकडा पासून बनवलेला एक चौरसाकृती बोर्ड असतो .याचा पृष्ठभाग सपाट व गुळगुळीत असतो. त्याच्याखाली एक लाकडी प्रेम लावलेली असते त्यामुळे या कॅरम बोर्डाला मजबुती मिळते. या कॅरम बोर्डच्या चारही कोपऱ्यांना चार छिद्रे असतात .कॅरम बोर्डाच्या मध्ये खूप मोठे वर्तुळ असते. त्या वर्तुळात सोंगट्या मांडल्या जातात व त्याचा परीघ 15 सेंटीमीटर पर्यंत असतो. कॅरम बोर्डाच्या चारी बाजूंना अर्धा इंच उंचीची लाकडी बोर्डर असते.
त्यामुळे त्यातील स्ट्रायकर व सोंगट्या बोर्डाच्या बाहेर जाणार नाही. कॅरम च्या खेळात एकूण 19 संख्या असतात.9 सोंगट्या काळ्या रंगाच्या तर 9 सोंगट्या पिवळ्या रंगाच्या असतात. सोंगट्यांचा आकार गोल व चपटा असतो .त्यात एक लाल रंगाची सोंगटी असते तिला आपण ‘राणी’ असे म्हणतात.
या खेळातील राणी ही सर्वात महत्त्वाची सोंगटी असते. एक सोंगटी मिळाल्यानंतर एक गुण मिळतो तर रानी ही सोंगटी मिळाल्यानंतर 5 गुण मिळतात. या खेळात त्यांना मारण्यासाठी स्ट्रायकर चा उपयोग केला जातो. हा स्ट्रायकर प्लॅस्टिकचा किंवा राबिनाईट चा बनवलेला असतो. या स्ट्रायकर चे वजन इतर सोंगटि पेक्षा जास्त असते.
स्ट्रायकर गोलाई की 4 ते 6 सेंटीमीटर च्या मढे असायला हवी. या खेळामध्ये पातळ बोरिक पावडर वापरली जाते त्यामुळे सोंगट्या व स्ट्रायकर यांचे कॅरम बोर्ड वर होणारे घर्षण कमी होते. त्यामुळे कॅरमचापृष्ठभाग गुळगुळीत होतो. व सोंगट्या भरभर पुढे सरकतात.
कॅरम हा खेळ 29 गुणांचा असतो. एका मॅच मध्ये 29 गुणांचे तीन खेळ असतात .जो खेळाडू तीन पैकी दोन खेळ जिंकतो तोच खेळाडू स्पर्धा जिंकतो.
हा खेळ जर चार खेळाडू खेळत असतील तर दोन खेळाडूंची मिळून एक टीम असते.अशा तऱ्हेने हे खेळाडू समोरासमोर बसतात .प्रत्येक संघाचे गुण हे वेगवेगळे मोजले जातात. ज्या संघातील दोन्ही खेळाडूंचे गुण जास्त असतात तो संघ घोषित केला जातो.
तसेच हा खेळ दोन खेळाडू खेळत असतील तर प्रत्येक प्रतिस्पर्धी हा सोंगट्या अडवण्याचा प्रयत्न करत असतो. खेळाडू जेव्हा स्ट्राइकने शॉट मारत असतो .तेव्हा त्याच्या हाताचा किंवा बोटाचा स्पर्श कॅरमला होता कामा नये .
असे झाल्यास खेळाडूची शॉर्ट मारण्याची संधी हुकते. तसेच स्ट्राइक ठेवताना सुद्धा खेळाडूने काळजी घेतली पाहिजे स्ट्राइकर बरोबर दोन रेषांच्या मधोमध ठेवायला लागतो. जर चुकून तो केवळ एकाच रेषेला स्पर्श करत असेल तर तो चुकीचा मानण्यात येतो.
शॉट मारताना जर स्ट्राइक कर छिद्रात गेला तर पेनल्टी म्हणून खेळाडूला छिद्रात गेलेल्या दोन सोंगट्या पुन्हा कॅरम बोर्डावर ठेवाव्या लागतात. जर त्या वेळेस त्या खेळाडूकडे सोंगट्या नसतील तर तो ज्यावेळेस त्याच्याकडे सोंगट्या येतील त्यावेळी त्याच्याकडून पेनल्टी वसूल करण्यात येते.
खेळताना जर खेळाडूचा सोंगटीला बोटाचा स्पर्श जरी झाला तरी ती सोंगटी पुन्हा बोर्डवर ठेवावी लागते. खेळाच्या अखेरीस बोर्डवर जर एक काळी, एक पिवळी आणि एक लाल अशा सोंगट्या शिल्लक राहिल्या तर सर्वात आधी खेळाडूला लाल सोंगटि म्हणजे राणी घेऊन त्याचे कव्हर घ्यावे लागते. जर कव्हर घेतले नाही तर पुन्हा लाल सोंगटी बोर्ड वर ठेवावी लागते.
आपल्या भारतात अनेक नामवंत खेळाडू झाले आहेत. भारतातील मारिया इरूदयुम 2 वेळेस विश्वविजेता झाले आहेत. 1996 मध्ये अर्जुन पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे. भारतातील तरुणांकरता मारिया एक प्रेरणा स्त्रोत आहे.
हा खेळ आता राज्यस्तरीय झालेला आहे परंतु हा खेळ पहिल्यांदा वेगवेगळ्या पद्धतीने खेळला जात होता.म्हणजे आपल्या लहानपणी आपण कॅरम हा खेळ वेगवेगळ्या पद्धतीने खेळलो आहे.
पहिला प्रकार म्हणजे काळ्यापांढर्या सोंगट्यांचा खेळ एका खेळाडूच्या जर काळ्या सोंगट्या असतील तर दुसऱ्या खेळाडूच्या पांढऱ्या सोंगट्या असतात .त्यामुळे ज्याच्या काळ्या सोंगट्या आहेत तो काल्या सोंगट्या घेण्याचा प्रयत्न करतो व ज्याच्या पांढरा सोंगट्या आहेत तो पांढरा सोंगट्या घेण्याचा प्रयत्न करत असतो व सवदोघांमध्ये राणी घेण्यासाठी स्पर्धा लागलेली असते.
दुसरा प्रकार म्हणजे गुण क्रीडा या प्रकारात सोंगट्या फक्त छिद्रात घालायच्या असतात. काळ्या सोंगत्यंकारात1 गुण व पांढऱ्या सोंगटी करता 2 गुण आणि राणी करिता 5 गुण असतात. ज्यांचे गुण अधिक असतात तो विजयी ठरतो.
तिसरा प्रकार म्हणजे भिकारि जोपर्यंत प्रतिस्पर्धाकडे एकही सोंगटी शिल्लक राहत नाही तोपर्यंत हा खेळ खेळला जातो.
आत्ता आपण सध्या लॉक डाऊन च्या अशा भीषण परिस्थिती मधून गेलेलो आहोत .लॉक डाऊन मध्ये आपण सर्वजण एकत्र घरात होतो. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना घरातून बाहेर पडण्यास सक्त मनाई होती.
सर्व क्रीडांगणे बंद होती. तेव्हा वेगवेगळ्या बैठ्या खेळांचे आकर्षण वाढले तेव्हा कंटाळा घालवण्यासाठी कॅरम या खेळाचा उपयोग सर्वांनी करून घेतलेला आहे. तसेच कॅरम हा खेळ आता मोबाईल ॲप वर सुद्धा खेळता येतो .