टेबल टेनिस खेळाची संपूर्ण माहिती Table Tennis Game Information In Marathi

Table Tennis Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात. त्यामधील एक लोकप्रिय खेळ म्हणजे टेबल टेनिस. टेबल टेनिस हा एक कठीण खेळ आहे. या खेळात चांगला खेळाडू होण्यासाठी बराच वेळ लागतो. जर या खेळांमध्ये तुमची प्रगती मंद असेल तर घाबरून जाऊ नका. नियमित सराव व योग्य मार्गदर्शन असेल तर कठीण असलेला खेळ सुद्धा खूप सोपा होतो.

Table Tennis Game Information In Marathi

टेबल टेनिस खेळाची संपूर्ण माहिती Table Tennis Game Information In Marathi

टेबल टेनिस बद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा खेळ असा आहे जो आपण आपले संपूर्ण आयुष्य खेळू शकता. म्हणजे हा खेळ सर्व वयातले लोक खेळू शकतात .टेबल टेनिस हा मेंदूसाठी चांगला खेळ आहे हे अभ्यासात आढळून आलेले आहे. या खेळामुळे वृद्ध खेळाडूंच्या मेंदूच्या पुढच्या भागाचे कार्य सुधारण्यास मदत होते.

ज्यामुळे निर्णय घेणे, समस्या सोडवणे व स्वैच्छिक हालचाली नियंत्रित करण्याचे काम हा खेळ करतो. टेबल टेनिस या खेळापेक्षा टेनिस खूप सोपा खेळ आहे. हा खेळ 2  ते 4 खेळाडूंमध्ये खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी रॅकेट आणि चेंडू लागतो.

हा खेळ इनडोर खेळला जातो कारण या खेळायला मैदानाची गरज नसते. एका विशिष्ट प्रकारच्या टेबलाची गरज असते ज्याला  टेनिस कोर्ट असे म्हणले जाते. समान दोन भागांमध्ये जाळी लावून विभागलेले असते.

हा खेळ एकेरी आणि दुहेरी असा खेळला जातो. एकेरी खेळामध्ये दोन खेळाडू असतात तर दुहेरी खेळामध्ये चार खेळाडू असतात. टेबल टेनिस मॅचेस म्हणजे डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे अशा विजेच्या वेगाने होणाऱ्या हालचाली पाहणे.

इतक्या जलद गतीने चालणारा हा एकमेव खेळ आहे. ब्रिटनमध्ये उगम पावलेल्या या खेळावर आता चीनची पकड बसलेली आहे. सध्या जास्तीत जास्त टेबल टेनिस खेळाडू हे चीनचेच आहेत.

प्रत्येक खेळाचा काहीतरी इतिहास हा असतो. तर आता आपण पाहूयात टेबल टेनिस या खेळाचा इतिहास.

1890 च्या सुमारास हा खेळ सुरू झाला. प्रथम या खेळाचे नाव “पिंगपॉंग” असे होते. पिंगपॉंग याचा लॅटिन भाषेत टेबल असा अर्थ होतो. म्हणून तेच नाव या खेळाला पडले असावे असे म्हणतात.’गॉसीमा’ असेही दुसरे नाव या खेळाला आहे. ‘दिवाणखानी टेनिस’ हा खेळ पारकर बंधूंनी अमेरिकेत सुरू केला व नंतर त्यांनी या खेळाला इंग्लंडमध्ये नेले.  इंग्लडने हा  खेळ आत्मसात केला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्येच हा खेळ सुरू झाला असेही म्हटले जाते. हा खेळ इंग्लंड मधील श्रीमंत कुटुंब लोक रात्रीचे जेवण झाल्यानंतर खेळत होते. त्यामुळे एकोणिसाव्या शतकापासून खेळल्या जाणाऱ्या या टेबल टेनिस खेळाला राजाश्रय मिळाला तो उच्चभृच्या After-Dinner मुळे. तेव्हा या खेळाला ‘व्हीपव्हॅप’ हे नाव होते.

1902 मध्ये इंग्लंड मध्ये ‘पिंगपॉंग असोसिएशन’ची स्थापना झाली . पारकर ब्रदर्सने 1901 मध्ये या खेळाचा ट्रेडमार्क विकत घेऊन त्यात बदल केले व 1920 मध्ये याला “टेबल-टेनिस” असे नाव देण्यात आले. नंतर हेच नाव अस्तित्वात आले. हा खेळ भारतात 1860 ते 1870 या काळात ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी विकसित केला होता.

त्यावेळी पुस्तके नेट च्या स्वरूपात एका लाईन मध्ये टेबलाच्या मध्यभागी उभी केली जात होती व नंतर दोन पुस्तकांचा वापर रॅकेट म्हणून केला जात होता आणि गोल्फ बॉल पिंग पॉंग म्हणून वापरला जायचा. नंतर गिब्ज या  खेळाडूने सेल्युलॉइड बॉल बनवला आणि गुडे याने रॅकेट बनवली.

1905 नंतर हा खेळ लंडनच्या बाहेरील भागातही खेळला जाऊ लागला व नंतर 1950 मध्ये अनेक देशांमध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला. इंग्लंड, जर्मनी आणि हंगेरी या देशांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनची स्थापना 1926 मध्ये करण्यात आली.

1966 मध्ये युरोपियन टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये 33 देशांनी भाग घेतला. इंग्लंड, स्वीडन, हंगेरी ,भारत ,डेन्मार्क ,जर्मनी, ऑस्ट्रेलिया व वेल्स हे त्या फेडरेशन संस्थापक सभासद आहेत. 1970 पर्यंत 90 राष्ट्रीय संघटनांनी सभासदत्व स्वीकारले आहे.

युरोप ,आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि ओशीअँनिया  अशा सहा मोठ्या संघटना स्थापन झाल्या आहेत. 1980 मध्ये टेबल टेनिस चा पहिला वर्ल्ड कप झाला त्यामध्ये चीनचा गुओ युएहुअ याने हे बक्षीस जिंकले. त्यानंतर लगेचच 1988 मध्ये हा खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळला जाऊ लागला.

टेबल टेनिस या खेळाचा टेबलाची लांबी 9 फूट (274 सें.मी.) व रुंदी 5 फूट (152.5 सें.मी.) असते.उंची 2 फूट 6 इंच (76 से.मी.) असते. टेबलाचा पृष्ठभाग असा असावा ही त्यावर 12 इंच उंचीवरून सोडलेला चेंडू 8-3/4 इंच ते9-3/4 इंच उडेल.टेबलाचा रंग गडद हिरवा किंवा आकाशी असतो.

टेबलाच्या 5 फूट रुंदीच्या बाजूला असणाऱ्या 2 सेंटीमीटर जाडीच्या पांढऱ्या रंगाच्या रेषा याला अंतिम रेषा असे म्हणतात. टेबलाच्या 9 फूट लांबीच्या बाजूला असणाऱ्या इंच जाडीच्या पांढऱ्या रंगाच्या रेशांना बाजूकडील रेशा असे म्हणतात. बाजूकडील रेषांपासून समान अंतरावर समांतर असणारी आणि खेळण्याच्या पृष्ठभागाचे दोन समान उभे भाग करणारी पांढऱ्या रंगाची रेषा म्हणजे मध्यरेषा तिची जाडी 3 मी.मी. असते.

अंतिम रेषांची समांतर व समान अंतरावर एक जाळी असते. या जाळीची लांबी 6 फूट असते व उंची 6 इंच असते. जाळी बांधण्यासाठी बाजूकडील अंतिम रेषेच्या बाहेर 6 इंच अंतरावर आधार असतो. जाळे व आधार यांच्यामध्ये मोकळी जागा नसते. जाळीमुळे खेळण्याच्या पृष्ठभागाचे दोन समान भाग होतात त्याच्या प्रत्येक भागात कोर्ट असे म्हणतात.

टेबल टेनिस बॉल त्याचे वजन 2.7 ग्रॅम व व्यास 40 मिलीमीटर असतो व आकार गोल व रंग पांढरा किंवा पिवळसर असतो. टेनिस खेळण्यासाठी ज्या रॅकेटचा वापर केला जातो. त्या रॅकेटच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळे रंग असतात. एका बाजूला फक्त लाल आणि दुसऱ्या बाजूला फक्त काळा रंग असतो. रॅकेटचा पृष्ठभाग लाकडी व समान जाडीचा असतो.

चेंडू खेळण्याच्या पुर्ण पृष्ठभागावर काटेरी रबराचे आवरण असते व त्याची जाडी 2 मि.मी. पेक्षा जास्त नसते .सॅंडविच प्रकारची रॅकेट असेल तर आवरणाची जाडी 4 मि.मी. पेक्षा अधिक नसते.

आता आपण या खेळाचे नियम पाहुयात या खेळाचे नियम टेनिस फेडरेशन बनवते. हा खेळ एकेरी व दुहेरी सामना असा खेळला जातो. एकेरी सामन्यात विरुद्ध बाजूला एकच खेळाडू असतो तर दुहेरी मध्ये परस्पर विरुद्ध बाजूला दोन खेळाडू असतात. दुहेरी मध्ये टेबलाचे चार भाग पाडलेले असतात व प्रत्येक खेळाडूचे क्षेत्र ठरवले जाते. पूर्ण एक सामना 3 किंवा 5 गेम साठी खेळला जातो. प्रथम 11 गुणांवर पोचणारा खेळाडू गेम जिंकतो

.खेळाची सुरुवात ही नाणेफेक करुन किंवा चेंडू लपून तो ओळखून सर्विस कोणाकडे येते हे ठरवले जाते. सर्विस करणारा खेळाडुने प्रथम बॉल निदान 16 सेंटीमीटर तरी हवेत उडवायचा असतो आणि त्याला टोलवून प्रथम त्याच्या कोर्ट मध्ये एक टप्पा पडून प्रतिस्पर्ध्याच्या कोर्ट मध्ये दुसरा टप्पा पडला पाहिजे आणि हे करताना बॉल मधील जाळीला स्पर्श होता कामा नये. टेनिस टेबल टेनिस खेळताना बॉल जाळीच्या वरूनच गेला पाहिजे.

बॉल इतका जोरात मारावा लागतो की समोरच्याच्या  कोर्ट मधील एंड लाईन च्या आत पडला पाहिजे हे जर चुकले तर समोरच्या खेळाडूला पॉईंट मिळतो. सर्विस बरोबर झाली तर लगेच तो बॉल टोलवायचा असतो ते जमलं नाही तर सर्विस करणाऱ्याला पॉईंट मिळतो.

चेंडू जाळीला स्पर्श करून गेला किंवा फाऊल सर्विस मध्ये काही अपरिहार्य कारणाने समोरच्याला बॉलला प्रतिटोला मारता आला नाही तर त्याला लेट म्हणतात. चेंडू तळहातावरून वर उडवल्या पासून तो चेंडू खेळात आहे असे मानले जाते.

सर्विस केल्यानंतर चेंडू जाळ्याला लागून पलीकडील बाजूच्या योग्य कोर्ट मध्ये पडला तर पुन्हा सर्विस करावी. चेंडू जाळ्याला लागून सर्विस करणार्याच्या कोर्ट मध्ये पडला किंवा प्रतिस्पर्ध्याच्या कोर्ट ला स्पर्श होण्याऐवजी टेबलाच्या बाहेर पडला तर तो सर्विस करण्याचा फाऊल मानला जातो. प्रत्येक 2  गुणानंतर सर्विस मध्ये बदल होतो.

जर गेम मध्ये दहा दहा ची बरोबरी झाली तर प्रत्येक गुण घेतल्यानंतर सर्विस बदलते व्हेरी सामन्यात बरोबरी झाली तर प्रत्येक कुणाल नंतर प्रत्येक खेळाडूला सर्विस करावी लागते एकेरी सामन्यात सर्व्हिस करणारा योग्य सर्व्हिस करत असतो सर्व्हिस स्वीकारणारा योग्य प्रकारे चेंडू परत टोलवितो आणि नंतर आलटून पालटून त्यांनी जाळ्या वरून प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टमध्ये चेंडू टोलवत खेळ सुरू  ठेवायचा असतो.

दुहेरी मध्ये पहिली सर्व्हिस कोण करणार आणि ती कोण स्वीकारणार हे खेळाडू परस्पर ठरवतात. दुहेरीतील सर्व्हिस करणारा खेळाडू आपल्या कोर्टच्या  उजव्या भागातून प्रतिस्पर्ध्याच्या  उजव्या भागात योग्य सर्विस करेल. हातातून सुटलेल्या  रॅकेटने चेंडू मारला गेला तर तो फाऊल आहे. तसेच हातात रॅकेट नसतानाही हाताने चेंडू मारणे हा ही एक फाऊल आहे.

आखे 15 मिनिटाचा असतो. प्रत्येक खेळानंतर खेळाडूंची टेबलची बाजू बदलली जाते. खेळाडू जर बॉलला दोन वेळा मारत असेल तर त्या खेळाडूचे गुण कमी होतात .जर बॉल एका खेळाडूच्या कोर्ट मध्ये दोन वेळा टप्पा खात असेल तर त्याला खेळाडूला गुण कमी होतात. 11 गुण मिळवणारा खेळाडू किंवा जोडी या गेममध्ये विजयी होते.

दोघांचे 10-10 गुण झाले असतील तर खेल संपे पर्यंत खेळाडूला अलटुन पालटून एकेकदा सर्व्हिस मिळेल. दोन गुणांचे अधिक्य मिळवणारा खेळाडू किंवा जोडी विजयी होईल. दुहेरी मध्ये सर्व्हिस करताना किंवा स्वीकारताना क्रम बदलण्याची चूक लक्षात येताच पंच खेळ थांबवतील आणि योग्य क्रम राखण्याची कार्यवाही करतील. खेळ थांबेवेपर्यंत झालेले गुण तसेच राहतील.

अंतिम खेळामध्ये कोणत्याही खेळाडूचे प्रथम 5 गुन झाल्यानंतर बाजू बदलावी. दोन खेळामध्ये 20 सेकंदाची विश्रांती असते. सामान्याचा निकाल हा सामना सात खेळांचा असेल. सात पैकी चार किंवा पाच पैकी तीन खेळ जिंकणारा खेळाडू किंवा जोडी विजयी होते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment