माझा बस प्रवास मराठी निबंध Mazha Bus Pravas Essay In Marathi

Mazha Bus Pravas Essay In Marathi नमस्कार मित्रांनो माझं नाव सुरेश आहे. मी आपल्या पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड या शहरात राहतो. माझ्या आजीचे गाव अहमदाबाद जिल्ह्यामध्ये कुळगाव आहे. वडील नोकरीला असल्यामुळे मुळगाव येथे राहत नाही. त्या गावापासून दीडशे ते दोनशे किलोमीटरवर असलेल्या पुण्याला आम्ही राहतो.

Mazha Bus Pravas Essay In Marathi

माझा बस प्रवास मराठी निबंध Mazha Bus Pravas Essay In Marathi

ज्यावेळेस आम्हाला गावी जायचे असते तेव्हा आम्ही दुचाकीवर गाडीने जातो. गाडीवर मोकळ्या हवेमध्ये प्रवास करताना खूप मजा येते. वाऱ्यामुळे आमचे  केस भरपूर उडत होते. डोळ्यांना गार हवा लागल्यामुळे डोळ्यांमधून पाणी येते.

त्यामुळे डोळ्यातून पाणी येऊन सुकून गेले. सुकलेल्या पाण्यामुळे पांढऱ्या रेषा दिसत होत्या. त्यापाहून आजी म्हणायची, बाळा आज चष्मा घालून आलास मग मला समजायचे आणि मग मी चेहरा धुवायचो.

रस्त्याने जाताना भरपूर वाहनाही गर्दी दिसायची. त्यामुळे भरपूर गाड्या त्यामध्ये ट्रक, ट्रॅक्टर ,मालगाड्या, जीप्स, रिक्षा अशा अनेक गाड्या बघून फार मज्जा वाटायची. मी वडिलांनासारखे प्रश्न विचारत होतो कि,  “पप्पा ही गाडी कोणती आहे ? या गाडीला काय म्हणायचे ? ह्या गाडीचे नाव काय आहे?” असे मी बाबाना प्रश्न विचारून वेड केले होते. वडिल ही मला त्या प्रश्नांची उत्तरे देत होते.

या सर्व गाड्या बघून मला सर्वात जास्त आकर्षण वाटायचे ते सरकारी बसचे जिला आपण प्रेमाने एसटी बस म्हणतो. एसटीचा लाल रंग असायचे त्यामुळे ती लक्ष वेधून घ्यायची. समोरून एसटी येताना बघून तिचा रुबाब नजरेत भरायचा. मोटरसायकलच्यासमोर एसटी मोठी वाटत होती. मला सारखा मनामध्ये विचार यायचा एसटीमधून आपण कधी प्रवास केला पाहिजे.

मी पप्पांना सांगितले ,”आपण कधीतरी बसणे गावाला जाऊया पप्पांनी सांगितले,” आणि हा योगायोग लवकरच पुढच्या रविवारी आला. मी संपूर्ण आठवडाभर रविवारची वाट बघत होतो.

रविवारी गावाला जाण्यासाठी आम्ही बस स्टॅण्डवर गेलो. तेथे मी पहिल्यांदाच बसस्थानक बघितले. सर्वत्र लोकांची गर्दी दिसत होती प्रत्येकजण व्यस्त होता पण प्रवासासाठी होणारी धावपळ आणि लगबग सर्व प्रवाशांमध्ये दिसून येत होती.

गाडी पुढे दिसत असतात.काहीजण बस स्टँडवर असलेल्या गाड्यांचे वेळापत्रक बघत होते.  कुणी मोबाईलचे तर कुणी वेळापत्रकाचे फोटोही काढत होते. फोनवर घरच्यांना निरोप देत होते, तर काहीजण खुशाली विचारत होते.

बसस्थानक म्हणजे मला एकमेकांना न ओळखणाऱ्या लोकांचे कुटुंबच वाटत होते.  तरुण  तरुणी गप्पा मारण्यात मग्न होते तर कुणी अभ्यासाची तयारी करत होते. तसेच काहीजण वर्गातील मुलामुलीसोबत गप्पा मारत होते. प्रत्येकाच्या गप्पामधला रंग वेगळा होता .

ते बघून फार छान वाटत होते कारण एक नवीन अनुभव मला बघायला मिळाले होते. लोकांना हवी ती गाडी आल्यानंतर पळत जाऊन पकडत होते गाडी पकडणे म्हणजे हे तेव्हा बघितल्यावर समजले. आई-वडील आपल्या लहान मुलांना गप्पागोष्टी सांगत होते.

काही आगाव मुले गाडी आल्यानंतर तिकडे धावत त्यांच्या आया हात धरून त्यांना जोराने ओढून नेत .त्यांना रागवत .काही स्त्रिया मात्र मुलांना कडेवर घेऊन गाड्यांविषयी छान माहिती सांगतानाही दिसल्या. त्यांना बघून मला माझ्या आईची आठवण आली. माझी आई मला सर्व गोष्टी समजावून सांगते पण कधी रागवत नाही.

विचारांच्या तंद्रीत असतानाच आईने सांगितले ,”विजय चल आपल्याला जायचे ती बस आली.” मी पटकन आईचा हात धरला आणि आईच्या मागे जाऊ  लागलो. आई-वडिलांच्या मागे चालत बस मध्ये शिरलो. पहिल्यांदाच मी आतून बस बघितली होती. इतकी लांब आणि इतके  सीट असलेली बस बघून मला आश्चर्यच वाटलं.

आम्ही गाडीत बसलो तसेच बरेच लोक गाडीमध्ये आले. सगळे लोकं जागा पकडण्यासाठी पळापळ करत होते. पप्पांनी माझ्यासाठी खिडकीची जागा मिळवली होती. मी खिडकीजवळ जाऊन बसलो आणि बाहेरची गंमत बघत होतो. खिडकीतून बाहेर बघताना मला धाव चित्रपट बघतो आहे असे वाटायचे. बसच्या खाली असताना उंची आपली एसटीची अधिक लांब वाटत होती.

बसच्या ह्या प्रवासामध्ये मला आनंद येत होता. आजूबाजूचे दृश्य बघून मी डोळ्यामध्ये साठवत होतो. सर्व चित्रे बघून जणू मी माझ्या मनाच्या कागदावर चित्र काढत होतो. गाडीमध्ये गोळ्या,  शीतपेये विकणारे आले होते. ते सर्वाना घेण्यासाठी प्रवृत्त करत होते.

या सर्वांमध्ये माझे लक्ष उसाचा रस घेऊन येणाऱ्या एका दादाने वेधले होते. तसा अनेक वेळा मी उसाचा रस पिलेला आहे, पण गाडीत रस बघून मला रस पिण्याची खूप इच्छा झाली. मी उसाच्या रसाकडे बघत होतो हे वडिलांना कळाले त्यांनी माझ्यासाठी एक रसाचा ग्लास घेतला आणि मी पटकन पिऊन घेतला. पण या रसाची चव आज मला वेगळीच  लागत होती.

रस पिऊन झाल्यानंतर वडिलांनी त्यांना पैसे दिले मग बसचे वाहक म्हणजेच कंडक्टर काका  बसमध्ये आले .त्यांनी सर्व विक्रेत्यांना बाहेर जाण्यासाठी सांगितले .सर्व विक्रेते वाहकाला राम राम म्हणून खाली उतरले.

गाडीवाल्याकाकांनी मोठा आवाज दिला आणि तिकिटाचे सुट्टे पैसे द्या असे सांगितले असे म्हणून वाहकाने एका बाजूने सर्वांना तिकीट द्यायला सुरुवात केली. अनेक लोकं सुट्टे नाहीत म्हणून सांगत होते वाहक रागानेच का होईना सुटे पैसे देत होता. त्याबरोबर बसमध्ये प्रवास करताना सुटे पैसे बरोबर ठेवावे असेही ते सांगत होते.

वाहकाकाकाकडे बघून पोलीस काकांची आठवण आली. अगदी पोलिसांच्या सारखाच पोशाखासारखाच होता. काकाकडे हातात काठीऐवजी तिकीट काढण्याचे मशीन होते. मग ते आमच्याजवळ आले त्यांना वडिलांनी दोन फुल आणि एक अर्धे असे तिकीट घेतले. अर्धे तिकीट म्हणजे फाडून दिले जाईल असे मला वाटले नाही त्यांनी सांगितले की अर्धे तिकीट म्हणजे काय?  त्यावेळी मला कळाले आणि हसू आले .

गाडी सुरु झाली. गाडी पुढे जाऊ लागली. सर्वांना तिकीटे दिल्यानंतर कंडक्टर काका पहिल्या आसनावर जाऊन बसले. मधेच कुणाला बसमधून उतरायचे असेल किंवा नवीन प्रवासी आज घ्यायचा असेल तर वाहक त्यांच्या डोक्यावरच असलेल्या एका दोरीला ओढायचे ,मग चालकाच्याजवळच असलेले घंटी वाजायची आणि मग गाडी थांबत असे .

हा घंटे वाजवण्याचा खेळ बघून मला खूपच मजा येत होती न राहवुन मीसुद्धा ती दोरी ओढली आणि  वाहकाकाकांनी मागे बघित. रागानेच त्यांनी मला सांगितले कि, दोरी उडू नको मी लगेच दोरी सोडून खाली बसलो.

गाडीतील सर्व प्रवासी आता शांतपणे बसले होते कुणी मोबाईलवर गाणे ऐकत होते कोणी फोनवर बोलण्यात व्यस्त होते काही लहान मुले खिडकी बाहेर दृश्य बघून आपल्या आई-वडिलांशी गप्पा मारून अनेक प्रश्न विचारत होते त्यांचे आई-वडीलही त्यांच्या प्रश्नांचेहि उत्साहाने उत्तरे देत होती. काही खादाड मंडळी घरून आणलेल्या पदार्थाचा चिवड्याच्या, चकलीच्या पिशव्या सोडून आनंद  घेत होते गाडीतील एकंदरीत दृश्य चित्रकाराने  रेखाटावे इतके छान वाटत होते.

आता गाडी गावापासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर आली होती डोंगर, हिरवीगार झाडे डोलत होते मधूनच फुले हि आमच्याकडे बघत असल्याचा भास होत होता ते निसर्ग दृश्य बघून मला खूप आनंद झाला होता.

गाडीने प्रवास करून इतके मन भरून आले होते कि,  हे बाहेरील चित्र डोळ्यांमध्ये साठवता येत नव्हते तो अनुभव खूपच छान होता या सगळ्या विचारामध्ये मला कधी झोप लागली कळलेच नाही. आणि ज्या वेळेस आजचे गाव आले त्यावेळेस आईच्या कुशीत शांत झोपलेला होतो मी हे आईने उठल्यावर मला कळले खरोखर अगदी आनंददायी आणि माझ्या आजन्म लक्षात राहील असा माझा बसप्रवास होता तो.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment