Gondiya Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आज आपण या पोस्टमध्ये गोंदिया जिल्ह्याविषयी माहिती पाहणार आहोत.
गोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondiya Information In Marathi
विदर्भात निसर्गरम्य अशी अनेक ठिकाणे आहेत. या लेखातून आपण पूर्व विदर्भातील पर्यटनाबाबतची माहिती देणार आहोत. पूर्व विदर्भातील ‘तलावांचा जिल्हा’ म्हणून गोंदिया ओळखला जातो.
तसेच या जिल्ह्याची ‘धानाचे कोठार’ म्हणून देखील ख्याती आहे. या जिल्ह्यातील धानाची शेती ही विशेषत्वाने ओळखली जाते ती विदेशात निर्यात होणाऱ्या उच्च प्रतीच्या तांदुळाकरिता!
महाराष्ट्रातील गोंदिया जिल्हा! गोंदिया मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्याच्या अगदी जवळचा जिल्हा आहे. मोठया प्रमाणात तांदळाचे उत्पादन होत असल्याने गोंदियाला तांदुळाचे शहर म्हणुन देखील ओळख आहे.
गोंदिया जिल्हाहा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे.
गोंदिया’ शहर हे गोंदिया जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात अनेक भातसडीचे उद्योग (इंग्लिश: Rice mills) व काही तंबाखूचे छोटे उद्योगधंदे आहेत. गोंदियाच्या आवतीभोवती १०० भात गिरण्या आहेत. गोंदिया हे मध्य भारतातून आणि पूर्वेकडून महाराष्ट्रात येण्याचे प्रवेशद्वार आहे.
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती
१ मे १९९९ रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन गोंदिया जिल्हा अस्तित्वातया शहराचे नाव आदिवासी गोंड समुदाय मोठया प्रमाणात असल्याने गोंदिया असे ठेवण्यात आले आहे. पुर्वी इथे मोगलांचे साम्राज्य असल्याचे पुरावे मिळतात.
इतिहास
गोंदिया जिल्ह्यात वाकाटकालीन वसाहतीचे अवशेष आढळले असून, महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खनन करून इस.१व्या शतकातटित वीट मंदिर प्रकाशात आणले.
महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य या भागात होते, असा उल्लेख आहे. १ मे १९९८ रोजी महाराष्ट्र शासनाने भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागूनच गजबजलेले हे शहर आधी वेगळ्याच धाटणीचे होते. प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते.
गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग गोंद (डिंक) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या शहराचे नाव गोंदिया पडले, असा उल्लेख इंग्रज काळात आर.व्ही. रसेल यांनी ‘गॅझेटियर’ मध्ये केला आहे.[ संदर्भ हवा ] त्या काळात आजसारखी राज्ये आणि त्यांच्या सीमाही नव्हत्या पण, ठरावीक अंतरावर बदलत जाणारी भाषा होती. त्यामुळे या शहराची ओळख शेजारी राज्यातील सावलीतच वाढत गेली.
महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यापूर्वी हा परिसर सी.पी.ॲॅंड बेरारमध्ये येत होते. त्या काळापासूनच गोंदिया शहरचे संबंध शेजारच्या छत्तीसगड व मध्य प्रदेशशी वाढत गेले. ते आजतागायत सुरू आहेत. त्यामुळे या शहराला हिंदी भाषेने ग्रासले असून या शहराची ओळखही महाराष्ट्रातील हिंदीभाषक शहर म्हणूनच आजही कायम आहे.
पूर्वी भोसले साम्राज्याच्या कारकिर्दीत कामठा, फुलचूर व किरणापूरला जमीनदारी होती. प्रशासकीय दृष्टिकोनातून इंग्रजांनी गोंदियाला तालुक्याचे स्थान दिले. आदिवासी जंगलातून डिंक, लाख, सागवन, बीजा, मोहफूल, बेहडा, करंजी बीज, चिंच, आवळा, एरंडी आणि हातांनी कुटलेले तांदूळ बनवून गोंदियाला विकण्यासाठी आणत.
त्यावेळी या परिसरात लाखेचे ३२ कारखाने होते. काळाच्या ओघात त्याला अवकळा आली. जुना गोंदिया, फुलचूर व र्मुी येथे ग्रामीण वसाहत झाल्यानंतर इंग्रजांनी शहरापर्यंत वसाहत करून व्यवसाय वाढवण्याकरिता लोकांना प्रोत्साहित केले. लोकसंख्या वाढल्यानंतर गोंदियात वॉर्डाची रचना आली.
परप्रांतातील लोक घनदाट जंगलातून रस्त्याच्या कडेला वास्तव्य करू लागले. या परिसराचा विकास झाल्यावर इंग्रजांनी गोंदियाला नगराचे स्थान दिले. त्यावेळी डाकघर, तार, टेलिफोनच्या सोयी उपलब्ध झाल्यावर गोंदियाची लोकसंख्या वाढत गेली. या भागात परप्रांतीय वसाहत करू लागल्याने मूळ निवासी आदिवासी हळूहळू जंगल डोंगराळ भागात जाऊन वस्तीला गेले.
लोकसंख्या
जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 1322635 आहे. पुरुष आणि महिलांची लोकसंख्या अनुक्रमे 662656 आणि 659964 आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि जमाती लोकसंख्या 355484 आणि 30922 आहे. जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण 84.95% आहे. गोंदिया जिल्ह्याचेक्षेत्रफळ 5,234 वर्ग कि.मी. एवढे आहे.
गोंदिया जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर
1000 पुरूषामागे स्त्रियांचे प्रमाण 991 एवढे आहे.गोंदिया जिल्हयात आजही आदिवासींचे मोठया प्रमाणात वास्तव्य असुन जंगल आणि अरण्यात त्यांचा अधिवास आहे.
गोंदिया जिल्ह्याची भूरचना
गोंदिया जिल्ह्याचे अक्षांश 20.39 ते 21.38 उत्तर आणि रेखांश 79.27 ते 80.42 पूर्वेकडे आहे.
जिल्हा मुख्यालय हे मुंबई-कलकत्ता रेल्वे मार्गावरील गोंदिया तालुका येथे आहे. गोंदिया हा मुंबईपासून 1060 किलोमीटर अंतरावर आहे.
भौगोलिक स्थान
गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेस मध्यप्रदेश व पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. तसेच जिल्ह्याच्या दक्षिणेस गडचिरोली व पश्चिमेस भंडारा हे जिल्हा आहेत.
नद्या व धरणे
गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा, वाघ, बावनवडी, पांगोली, चुलबंद व गाढवी या नद्या आहेत. या जिल्ह्यात गाढवी नदीवर इटियाडोह हा सर्वात मोठा प्रकल्प व शरपूर, पुजारीटोला, कालिसराड ही धरणे आहेत. याशिवाय मानगड, संग्रामपूर, बोदलकसा इत्यादी ठिकाणी छोटी धरणे आहेत.
गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून, नवेगाव बांध हा या जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा तलाव आहे. तसेच माजागड, रेंगोपार, चुलबंद, उमरझरी, रिसपार, बोदलकसा, संग्रामपूर, खळबंदा, चोरखमारा इत्यादी छोटे-मोठे तलाव जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालतात.
गोंदीया जिल्हयातील तालुके
गोंदीया जिल्हयात एकुण 8 तालुके आहेत.
गोंदिया,तिरोरा,गोरेगांव,देवरी,आमगांव,सेल्कासा,अर्जुनी मोरगांव,सदाक अर्जुनी हा जिल्हा 4 उपविभागांमध्ये गोंदिया, देवरी, तिरोडा आणि मोरगांव अर्जुनी विभागलेला आहे.
गोंदिया उपविभागांत 1 तालुका आहे, देवळी उपविभागामध्ये 3 तालुके आहेत, तिरोडा उपविभागांमध्ये दोन तालुके आहेत आणि मोरगाव अर्जुनी उपविभागामध्ये 2 तालुके आहेत.एकुण 556 ग्रामपंचायती व 954 गावे आहेत.
जिल्ह्याचे क्षेत्र गोंदिया, तिरोडा, गोरेगांव, आमगाव, लाखांदूर आणि साकोली या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागले आहे.मुळात या जिल्ह्यात 8 तालुके व 8 पंचायत समित्या आहेत. गोंदिया आणि तिरोडा असे दोन नगर परीषद आहेत.
हवामान
जास्त उष्णता आणि जास्त थंडी असे दोन्ही ऋतु या जिल्हयात अनुभवायला मिळतात.गोंदिया जिल्ह्याचे तपमानात तिव्र स्वरुपाचा बदल आढळुन येतो.
उन्हाळा अतिशय गरम आणि हिवाळा अतिशय थंड असणारा अनुभव आहे. सरासरी सापेक्ष आर्द्रता 62 टक्के असुन वर्ष 2011 मध्ये किमान तापमान 7.4 डीसी आणि कमाल तापमान 47.5 डीसी नोंदविण्यात आले आहे.
पाऊस
गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने दक्षिण-पश्चिमी वा-या पासुन पाऊस येतो.
पावसाळी हंगाम हे जून ते सप्टेंबर महिन्या पर्यन्त असुन माहे जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये सातत्याने आणी सर्वाधिक पाऊस पडतो.
शेती
हा जिल्हा अविकसीत असुन बहुतेक जमीन जंगलाने व्यापलेली आहे. शेतीचे मुख्य पिक भात आहे.
गोंदिया जिल्ह्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गोंदिया जिल्हा हा तांदूळ उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्यात उत्पादित होणारा सुवर्णा, जया इत्यादी जातींचा तांदूळ परदेशात निर्यातही केला जातो.
जिल्ह्यातील अन्य कृषी उत्पादन ज्वारी, अळशी, गहू आणि तूर आहे. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
हा जिल्हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला असुन संपूर्ण जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग नाहीत. भात हे शेतीचे मुख्य पिक असल्यामुळे जिल्ह्यात तांदळाच्या ब-याच गिरण्या आहेत. गोंदिया जिल्हा ‘राईस सिटी’ म्हणून ओळखले जाते.तांदुळाचे शहर असल्याने शहराच्या अवतीभवती 250 तांदळाच्या मिल्स आहेत.
भाषा
येथील बोली भाषेला झाडीबोली या नावाने संबोधले जाते. गोंदिया जिल्ह्यात मराठी व हिंदी या दोन भाषा बोलल्या जातात.
खनिज संपत्ती
खनिज संपत्तीच्या दृष्टिकोनातून गोंदिया जिल्हा समृद्ध समजला जातो. येथे ग्रेनाईट, मँगनीज, लोह खनिज, क्रोमाईट, कायनाईट, क्वार्टझाईट, सिझियम, व्हॅनडियम ही खनिजे सापडतात.
संस्कृती
जिल्ह्यातील आदिवासी समुदायाची स्वतःची संस्कृती आहे. ते “पर्सा पेन” या देवाची उपासना करतात. ते शुभ प्रसंगी आणि नवीन पिके येतात तेव्हा “रेला” हे नृत्य करतात.
“रेला” हे नृत्य आदिवासी समुदायात लोकप्रिय नृत्य आहे. “ढोल” नृत्य हे सुद्धा लोकप्रिय नृत्य आहे . आदिवासींचे मुख्य उत्सव होळी, दशहरा आणि दिवाळी हे मुख्य उत्सव आहेत. आदिवासी घनदाट जंगलात राहतात.
इतर समाजातील लोक गणपती, दसरा, दिवाळी आणि होळी हे सण प्रामुख्याने साजरा करतात. जिल्ह्याच्या काही भागात, लोक नाटकांंमध्ये भूमिका बजावण्यास इच्छुक असतात. दिवाळीनंतर किंवा इतर सणा निमीत्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
उद्योग व व्यवसाय
गोंदिया जिल्ह्यात माडगी (तालुका तिरोडा) येथे मँगनीज शुद्धीकरण कारखाना, गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, मुंडिकोटा येथे धान (तांदूळ) गिरण्या आणि चंगेरी (तालुका गोदिया) येथे कागद कारखाना आहे. गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या जास्त असल्याने येथे मत्स्यशेती आणि गोड्या पाण्यातील (तलावातील) मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. इटियाडोह व आंभोरा येथे मत्स्यबीज प्रजनन केंद्रे आहेत.
वनसंपदेमुळे तेंदूपत्ता संकलन व बिडी उद्योग हा भरभराटीस आलेला मुख्य व्यवसाय.या शहराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, रोजगार व व्यापारासाठी आलेल्या समूहांना या शहराने कायम आपलेसे केले. त्यांना आश्रयही दिला. म्हणूनच आज या शहराच्या बहुतांश आर्थिक नाडय़ा याच स्थलांतरितांच्या हातात सामावलेल्या आहेत.शहरात तांदळाच्या मिल्स तर आहेतच शिवाय छोटया स्तरावर तंबाखु उद्योग देखील आहे.
दळणवळण
मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या शहराजवळून जात असल्यामुळे दळणवळणाच्या पुष्कळ सोयी गोंदिया शहरात उपलब्ध झाल्या. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या विकासाला चालना मिळत असली तरी अद्यापही हे शहर मागासलेलेच गणले जाते.
गोंदियाजवळील भाग वन आणि निसर्गसंपदेने परिपूर्ण नटलेला आहे. या शहराचे वैशिष्टय म्हणजे, हे शहर इंग्रजांनी सुरू केलेल्या मुंबई-कोलकाता या पश्चिम-पूर्व महत्त्वाच्या रेल्वे लाईनवर आहे. त्यामुळे या शहराची दोन भागात विभागणी होते.