Latur Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आजच्या पोस्ट मध्ये आपण लातूर या जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या आग्नेय आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ वसलेला लातुर जिल्हा! महाराष्ट्रातील सर्वात मोठया जिल्हयातील १६ व्या क्रमांकाचा जिल्हा लातुर मराठवाडयातील एक महत्वाचा जिल्हा लातुर!
लातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Latur Information In Marathi
शिक्षणाकरता लातुर पॅटर्न हे नाव प्रसिध्दच आहे. महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद विभागात लातुर हा एक महत्वाचा जिल्हा! या जिल्हयाला नांदेड, बीड, उस्मानाबाद आणि कर्नाटक राज्यातला बिदर हा जिल्हा जोडलेला आहे.
पुर्वी राज्य करणारा राष्ट्रकुट राजा दंतीदुर्ग लट्टालुर त्यावरूनच आजचे नाव लातुर असावे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख लातुरचेच, भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील देखील लातुरचे.
कै.केशवराव सोनवणे हे नवनिर्वाचीत महाराष्ट्र राज्यातले लातुरचे पहिले आमदार शिवाय त्यांच्या रूपानं लातुरला प्रथमच सहकारमंत्रीपद मिळालं.
लातुर पॅटर्न संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असुन विशेष प्रशिक्षण आणि व्यवस्थीत कोचिंग यामुळे नावारूपाला आले. गेल्या काही वर्षांमधे लातुर शिक्षणाच्या नवनवीन क्षेत्रामुळे विध्यार्थ्यांना आकर्षीत करते आहे.
१९९३ साली आलेल्या विनाशकारी भुकंपाने नेस्तनाबुत झालेले लातुर, हादरलेले लातुर त्या भयावह आठवणी आज विसरू पाहात आहे.
मध्यरात्री साधारण ०३:५६ वाजता आलेल्या त्या विनाशकारी भुकंपात जवळपास ३०,००० लोक मृत्युमुखी पडले होते.
मध्यरात्री भुकंप आल्याने लोक झोपेत असल्याने मृतांचा आकडा वाढला.
लातूर जिल्ह्याची स्थापना
या शहराला प्राचीन इतिहास देखील लाभला आहे पुर्वी हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी असल्याचे सांगितल्या जाते. दक्षिणेवर राज्य करणाऱ्या राष्ट्रकूट राज्यांच्या राजधानीचे हे शहर होते .
पहिला राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग या शहरात राहत असे .या शहराचे तात्कालीन नाव कत्तलूर असे होते पुढे अपभ्रंश होत त्याचे सामर्थ्य सध्याचे लातूर हे नाव पडले. पुढे अनेक राज्यकत्र्यांच्या ताब्यात जाऊन साधारण 19 व्या शतकात हैदराबाद संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ ला हा भाग देखील स्वतंत्र झाला आणि पुढे १९६० दरम्यान महाराष्ट्रात आला. पुढे १६ ऑगस्ट १९८२ ला लातुर उस्मानाबाद जिल्हयाच्या विभाजनानंतर जिल्हा म्हणुन अस्तित्वात आला.
लातूर जिल्ह्याचा इतिहास
लातूर जिल्हयाला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. जिल्हा मुख्यालय लातूर हे “लट्टा” वा राष्ट्रकुट राजांचे मुळ निवासस्थान होते. राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष पहिला हा लट्टालूट नगरचा अधिपती “स्वामी” असल्याचे नमूद आहे व त्यानेच हे शहर निर्माण केले. इ.स. ७५३ मध्ये बदामीच्या चालुक्यानंतर आलेले राष्ट्रकुट राजे स्वतःला लट्टालूट पूर्वाशिष म्हणजे लट्टालूट निवासी असेच म्हणवून घेत.
चालुक्य घराण्यातील “विक्रमादित्य” ६ व्या नंतर त्याचा पुत्र सोमेश्वर तिसरा हा गादीवर आला. त्याने “अभिलाषीतीर्थ” हा ग्रंथ लिहिला, त्यामुळे त्याला “सर्वज्ञ चक्रवर्ती” असे म्हणत. लातूर जिल्ह्यात त्याचे राज्य असल्याचा व त्याच्या कारकिर्दीची नोंद असलेला कोरीव लेख सापडला आहे. त्यामध्ये लातूर येथील पापविनाशन देवीचे मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे.
सदर कोरीव लेख शके १०४९ (इ.स.११२९) मध्ये कोरल्याचा उल्लेख आहे. चालुक्यानंतर हा भाग देवगिरीच्या यादवाच्या अधिपत्याखाली आला.इ.स. १३३७ मध्ये यादवांचे राज्य दिल्लीच्या सुलतानाच्या ताब्यात आले व दक्षिणेत मुस्लिम सत्तेचा अंमल सुरु झाला. इ. स. १३५१ मध्ये दिल्लीच्या सुलतानाच्या साम्राज्यातील हा भाग बहामणी साम्राज्यात आला.
बहामणी साम्राज्याची राजधानी गुलबर्गा होती. तदनंतर बहामणी राज्याची शकले होऊन शेवटी निजामशाही मध्ये हा भाग आला. निजामाचे हैद्राबाद राज्य १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात सामील झाल्यानंतर हा भाग महाराष्ट्र राज्यात आला.
या नवनिर्मित लातूर जिल्ह्यात पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा व औसा अशा पाच तालुक्यांचा तसेच १५ ऑगस्ट, १९९२ रोजी पूर्वीच्या तालुक्याची पुनर्रचना करण्यात येऊन रेणापूर व चाकूर हे दोन तालुके अस्तित्वात आले.
तसेच २३ जून, १९९९ रोजी पुर्वीच्या तालुक्यांची पुनर्रचना करण्यात येऊन देवणी, जळकोट व शिरूर अनंतपाळ हे तीन तालुके अस्तित्वात आले. सद्या लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत.
त्याचा पश्चिमेस उस्मनाबाद, वायव्येस बीड, उत्तरेस परभणी, ईशान्येस नांदेड हे जिल्हे आणि आग्नेयीस कर्नाटक राज्य आहे. हा प्रदेश पूर्वीचा हैदराबाद संस्थानचा भाग असून स्वांतंत्र्योत्तर काळात तालुक्यांची पुर्नरचना करण्यात आली.
भूवर्णन
या जिल्ह्याचे सर्वसाधारण दोन नैसर्गिक भाग पडतात. तेरणा नदीच्या उत्तरेकडील बालाघाट पर्वतश्रेणीने व्यापलेला पठरी प्रदेश आणि नदीच्या दक्षिणेकडील सखल मैदानी प्रदेश. यांत अहमदपूर – उदगीर भागातील मन्याड – लेंडी नद्यांचा मैदानी प्रदेश, मांजरा व तावरजा नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश आणि तेरणा व तिच्या उपनद्यांचा प्रदेश अंतर्भूत होतो.
बालघाटची एक शाखा अहमदनगर जिल्ह्यातून येथे येते. तिने लातूर, निलंगा व औसा तालुक्यांचा उत्तरेकडील काही भाग व्यापला असून बालाघाटची दुसरी शाखा अहमदपूर व उदगीर तालुक्यातील दक्षिण भागात
वायव्येकडून आग्नेयीकडे जाते. उदगीर तालुक्यात पर्वतरांगांना विभागणारी खोरी असून पठारी प्रदेश सस.पासून सरासरी ६०९ मी. उंच आहे.
मांजरा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी असून तेरणा, तावरजा व धरणी या उपनद्यांसह ती बालाघाट पठारावरून जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहते. तेरणा ही उपनदी औसातालुक्यातून जिल्ह्याच्या दक्षिणेकडील सरहद्दीवरून वाहत जाते आणि पुढे निलंगा तालुक्यात पूर्व सरहद्दीवर मांजरा नदीस मिळते.
मन्याड व लेंडी या लहान उपनद्या असून मन्याडअहमदपूर तालुक्यात उगम पावते व उत्तरेकडे नांदेड जिल्ह्यात जाते, तर लेंडी अहमदपूर व उदगीर तालुक्यांतून वाहते. धरणी नदी वडवळ-राजूरच्या उत्तरेकडे तीन किमी. वर उगमपावून दक्षिणेकडे राजूरा, धरणी, नळेगाव या गावावरून वाहत जाऊन पुढे जळगावजवळ मांजरा नदीस मिळते.
तालुका गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. नगरात येणारे पाणी मांजरा नदीतून येते. २०व्या व २१व्या शतकांत प्रदूषणाचा सामना केला. तावरजा, तिरू, घरणी, मनार, रेणा या इतर प्रमुख नद्या आहेत.
सिंचनासठी व पिण्यासाठी या नद्यांवर धरणे बांधली आहेत. देनरगण, घरणी, मसलगा, सोलवरील साकोळ, तावरजा व तिरू यांचा मोठ्या धरणांत समावेश होतो. मन्याड, लेंडी व तिरू या उत्तर पठारावरील ३ प्रमुख नद्या आहे.
हवामान
जिल्ह्याचे हवामान सौम्य व कोरडे आहे. साधारणतः डिसेंबर-जानेवारी हे थंड महिने तर मे व जून हे सर्वात उष्ण महिने असतात. मात्र विदर्भातील अति-उष्ण हवमान येथेआढळत नाही. उन्हाळ्यात दैनिक सरासरी कमाल तापमान ४०° से. व किमान २५° से. एवढे असते. काही वेळा उन्हाळ्यातील तापमान ४५° से. पर्यंत जाते. तर हिवाळ्यात ते १३° से.पर्यंत उतरते. या जिल्ह्यात ९०° टक्के पाऊस नैॠत्य मॉन्सूनचा पडतो.
उत्तर भारताच्या पश्चिम व्यत्ययाच्या पूर्व प्रवाहासोबत आलेल्या थंड लाटांमुळे काही वेळेस हिवाळ्यात क्षेत्र प्रभावित होते व न्यूनतम तापमान 2 डिग्री ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होते.
जूनच्या मध्यास पर्जन्यवृष्टीस प्रारंभ होऊन पावसाळा ऑक्टोबरअखेर संपतो. औसा व निलंगा तालुक्यांतसरासरी पर्जन्यमान ८० सेंमी. असून लातूर, अहमदपूर आणि उदगीर तालुक्यांत ते सरासरी ९० सेंमी. आहे. एकूण जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ७४ सेंमी. आढळते. उन्हाळ्यातचक्रवात आणि नैॠत्य मोसमी वाऱ्यांच्या सुरूवातीच्या काळात झंझावत येतात.
लोकसंख्या
लातूर जिल्ह्याची लोकसंख्या २४,५५,५४३ एवढी आहे जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७,१५७ वर्ग कि.मी.असून साक्षरतेचे प्रमाण ७९.०३% एवढे आहे. लिंग गुणोत्तर १००० पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९२४ असे आहे.
जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याच्या २·४० टक्के आणि लोकसंख्या राज्याच्या जवळजवळ २·०६ टक्के आहे. जिल्ह्यात पाच तालुके आणि ९०४ गावे आहेत. त्यांपैकी ८८५ गावांत वस्ती असून १९ गावे निर्जन आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय लातूर येथे आहे.
भाषा
लातूर जिल्ह्याची अधिकृत भाषा मराठी आहे.
लातूर हे महाराष्ट्राच्या,आंध्र प्रदेशाच्या आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक परंपरा व रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. लातूर जिल्हा व त्या लगतचे कित्येक लोक मराठी व्यतिरिक्त कन्नड आणि तेलुगू भाषा सहज बोलतात.
शेती
लातूर जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान असून सु. ८० % टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात ते घेतले जाते. दुसोट्याचे क्षेत्र सु. ८ ,८९९ हेक्टर असून त्याची सर्वसाधारण टक्केवारी ३० ·४१ आहे.
खरीप हंगामात ज्वारी, कापूस, मूग, तूर, भात, भुईमूग इ. पिके घेतली जातात. रब्बी हंगामात प्रामुख्याने रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, यांची पिके घेतात. जिल्ह्यात एकूण ६ ·६७ लाख हेक्टर जमीन लागवडीखाली असून त्यापैकी ९४ टक्के क्षेत्रात १९८८मध्ये पीक लागवड झाली होती. त्यांपैकी ८०% जमीन कोरडवाहू आहे.
जिल्ह्यात अहमदपूर तालुका वगळता प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे चार कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. अहमदपूर तालुक्यात मात्र दोन समित्या आहेत. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी-विक्री करण्यात येते.लातूर व औसा येथील बाजारपेठा मोठ्या असून धान्याची फार मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते.
मृदा आणि जमीन
जिल्ह्यातील जमिनीचे मुख्यतः दोन भाग पडतात. एका भागात सर्वसाधारण हलकी व मध्यम हलकी जमीन असून ती कमी आर्दता शोषणारी आहे. याच भागात काही ठिकाणी तांबड्या रंगाची जांभा मृदा आढळते. दुसऱ्या भागातील जमीन काळी व कसदार असून काही ठिकाणी हलक्या प्रतीची आहे. तीत काळी कन्हार व थोडे क्षारयुक्त पातळ थर असलेले मृदा प्रकार आढळतात.
कन्हार जमिनीचे, (गाळाची सुपीक जमिन) प्रमाण नदीखोऱ्यात आढळते. मृदा चिकट, चांगल्या पोताची व आर्द्रता टिकवून धरणारी असल्याने तीत वर्षातून दोन पिके घेतली जातात. नद्यांपासून थोड्या उंचवट्याच्या भागात भरड पोताची जमीन आहे. यमृदेत वाळू, चुना किंवा दोन्हीं चे मिश्रण आढळते. कन्हार व भरड पोताची जमीन मुख्यतः तेरणा, मांजरा व तावरजा नद्यांच्या परिसरात आढळते. डोंगर पायथ्याच्या व डोंगर – उताराच्या भागांत कमी प्रतीची वाळू मिश्रित रेताड जमीन आहे.
वने आणि प्राणी
निकृष्ट जमीन व कमी पर्जन्य यांमुळे जिल्ह्यात जंगलाखालील क्षेत्र अगदीच नगण्य म्हणजे ० ·१६ टक्के अवर्गीकृत जंगलक्षेत्र (१ ,१४० हेक्टर) असून जो काही जंगलाचा प्रदेश आहे तो प्रामुख्याने वनाच्छिदित डोंगररांगां वर आढळतो. त्यात बाभूळ, पळस, कडुनिंब, जांभूळ, डिकेमाली इ. वनस्पती प्रकार आढळतात मात्र झाडे विखुरलेली आहेत आणि पठारी भागात डोंगर – उतारावर गवत उगवते.
अहमदपुर तालुक्यात वडवळ गावाजवळ बेट नावाच्या डों गरावर अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. जंगलात हरीण, मुंगूस, तरस, कोल्हा, वानर, माकड इ. प्राणी व विविध पक्षी आहेत. एकू ण वन्य प्राणी कमी आहेत. वनक्षेत्र नसल्यामुळे वनउत्पादनसुध्दा अगदी अल्पच आहे तथापि तेंदूच्या पानांपासून १९८८ -८९ या आर्थिक वर्षात २२० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले.
उद्योगधंदे
सांप्रत जिल्ह्यात लातूर, अहमदपूर आणि औसा या तालुक्यात सहकारी तत्वावर चाललेले साखर कारखाने आहेत. लातूर येथील औद्योगिक वसाहतीत तेल गाळण्याचे बरेच कारखाने असून भूईमु गाच्या तेलापासून वनस्पती तूप करण्याचा मोठा कारखाना आहे. याच वसाहतीत हातकागद तयार करण्याचा आणि पोलादाची, पितळी भांडी बनविण्याचे कारखाने आढळतात.
लातूर, उदगीर व अहमदपूर येथे कापसाचे कारखाने असून लातूर येथे सूत काढयाचा मोठा कारखाना आहे. तसेच सुती व लोकरी कापड विणण्याचे काम लातूर, औसा, उदगीर व मुरूड येथे चालते. लातूर, उदगीर व लामजना येथे कातडी कमवण्याचा उद्योग असून मोठ्या प्रमाणावर पादत्राणे तयार होतात. यांशिवाय येथे इतर १२७ औद्योगिक संस्था आहेत.