Haryana Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा राज्याची माहिती पाहणार आहोत हे भारतीय संघ राज्यातील 17 वे घटक राज्य आहे ते म्हणजे हरियाणा.हरियाणा हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे.
हरियाणा राज्याची संपूर्ण माहिती Haryana Information In Marathi
भारताच्या सर्व राज्यांमध्ये हरियाणा क्षेत्रफळानुसार 21 व्या क्रमांकावर आणि लोकसंख्येनुसार 18 व्या क्रमांकावर आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. चंदीगड ही हरियाणा व पंजाब या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे.
हरियाणाची साक्षरता ७६.६४ टक्के आहे. गहू, ज्वारी, जव, ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. महाभारत काळात कौरव व पांडव यांच्यात हरियाणा येथील कुरुक्षेत्र या ठिकाणी भीषण युद्ध झाले होते.
हरियाणाचे क्षेत्रफळ आपल्या शेजारील देश भुतान च्या बरोबर आहे. हरियाणा ची राजधानी चंदिगड The City Beautiful या नावाने ओळखली जाते.हरियाणामध्ये 93 तालुके आणि 6841 गावे आहेत.
लोकसंख्येच्या दृष्टीने हरियाणामधील सर्वात मोठा जिल्हा फरीदाबाद आहे. आणि सर्वात छोटा जिल्हा चरखी दादरी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हरियाणामधील सर्वात मोठा जिल्हा शिरसा आहे आणि सर्वात लहान जिल्हा पंचकूला आहे.
हरियाणा राज्याची स्थापना
हरियाणा ची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला पंजाब राज्य पासून वेगळे होऊन झाली होती. जेव्हा हरियाणा राज्याची स्थापना झाली होती तेव्हा तेथे फक्त सात जिल्हे होते.
हरियाणा राज्याचा इतिहास
हरयाणा राज्याचा प्रदेश पूर्वी पंजाब राज्यात होता.त्यामुळे त्याचा पूर्वेतिहास ⇨ पंजाब राज्य या नोंदीत समाविष्ट आहे. घग्गर व सरस्वती नदीकाठी झालेल्या उत्खननांत सिंधू संस्कृतीची (इ. स.पू. २७५०–१७५०) काही स्थळे ज्ञात झाली आहेत. आऱ्यांच्या आगमना-पूर्वी हरयाणात अनार्य लोकांची वस्ती होती.
आऱ्यांनी त्यांचा पराभव करून त्यांना आपल्यात सामावून घेऊन वैदिक संस्कृतीचा प्रसार केला. वेद काळात सरस्वती नदीला अनन्यसाधारण महत्त्व होते. हरयाणातील कुरुक्षेत्र ही कौरव-पांडवांची युद्धभूमी होय.
हरियाणा नावाची उत्पत्ती
हरयाणा या नावाविषयी अनेक मतमतांतरे आहेत. हरियाली (हिरवेपणा) या शब्दापासून हे नाव आले असावे, याबाबत एकमतआहे. ते ‘ग्रीन लँड ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळखले जाते. ऋग्वेदा ‘शर्यणावत’ असा या प्रदेशाचा उल्लेख येतो. त्याचेच रूपांतर होऊनहऱ्याणा-हरयाणा हे प्रादेशिक नाव रूढ झाले असावे.
काही तज्ञांच्या मते, या भागात घनदाट अरण्य असून त्यास हरिया वन म्हणत. त्या शब्दाचे हरयाणा हे रूपांतर असावे. आऱ्यांची भूमी म्हणून आऱ्याणा–हरयाणा असेही एक मत आहे. अहिरांचे स्थान अहिरायन यापासून हिरायन–हरियान–हरयाणा अशीही या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते.
हरियाणा राज्याचा भूगोल
त्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ. किमी. असून लोकसंख्या २,५३,५३,०८१ (२०११) होती. पूर्वेस दिल्ली (केंद्रशासित प्रदेश) व उत्तर प्रदेश राज्य, उत्तरेस हिमाचल प्रदेशाचा काही भाग व चंडीगढ (केंद्रशासित प्रदेश), वायव्येस पंजाब आणि दक्षिणेस व पश्चिमेस राजस्थान या राज्यांनी ते सीमित झाले आहे. उत्तर सरहद्दीवर शिवालिक पर्वतश्रेणी, पूर्वेला यमुना नदी, नैर्ऋत्येला अरवली पर्वताच्या रांगा (अलवार–अजबगढ श्रेणी) आणि पश्चिमेला काही भागांत घग्गर नदी यांच्या नैसर्गिक सीमा या राज्याला लाभल्या आहेत.
चंडीगड राज्याच्या राजधानीचे ठिकाण आहे.भूवैज्ञानिक दृष्ट्या अर्वाचीन काळात हिमालयात उगम पावलेल्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून या प्रदेशाची निर्मिती झाली आहे. हा मैदानी प्रदेश सुपीक असून सु. ९०% टक्के जमीन लागवडयोग्य आहे. येथील भूरचनेच्या दृष्टीने याचे दोन मुख्य प्राकृतिक विभाग पडतात : (१) सपाट जलोढीय प्रदेश. जो जवळजवळ सर्व राज्यभर पसरलेलाआहे.
हा जलोढीय प्रदेश सस.पासून २१०–२७० मी. उंचीवर असून तो बारमाही वाहणाऱ्या यमुना नदीमुळे सुपीक झाला आहे. त्यालाइंडो-गँगेटिक प्लेन म्हणतात. (२) वायव्येकडील अरुंद विच्छेदकशिवालिक पर्वतश्रेणी. त्याला सब हिमालयन तराई म्हणतात. यमुना वघग्गर या येथील प्रमुख नद्या असून त्यांशिवाय डांग्री, इंदोरी, मार्कंडा, सरस्वती, साहिबी, कृष्णावती, दोहन इ. नद्या प्रमुख आहेत.
यांशिवाय राज्यात अनेक जलसिंचन कालवे आहेत. त्यांपैकी पश्चिम यमुना कालवा, भाक्रा कालवा आणि गुडगाव कालवा हे मुख्य आहेत. त्यांतून शेतीस जलसिंचन होते. यमुना आणि सतलज या दोन नद्यांमधील प्रदेश घग्गर नदीच्या खोऱ्याने व्यापला आहे. सूरजकुंड, दमदमा, बदखल, हथनीकुंड ही येथील प्रमुख सरोवरे होत.
हरियाणा राज्यातील जिल्हे
अंबाला, कुरुक्षेत्र, पंचकुला, यमुनानगर, फरीदाबाद, पलवल, मेवात, गुरुग्राम, महेंद्रगढ़, रेवाड़ी, फतेहाबाद, जींद, हिसार, सिरसा, झज्जर, दादरी, रोहतक, सोनीपत, करनाल, पानीपत, कैथल, भिवानी, चरखा दादरी.
हरियाणा या राज्याची लोकसंख्या
2011 च्या जनगणनेनुसार हरियाणा राज्याची लोकसंख्या 2,53,53,081इतकीआहे.
राज्यात 1,35,05,130 पुरुष व 1,18,47,951स्त्रिया होत्या. देशातील हे एक विपरीत स्त्री-पुरुष प्रमाण असणारे राज्य असून १,००० पुरुषांमागे ८७७ स्त्रिया इतके हे प्रमाण आहे. राज्याचे साक्षरता प्रमाण ७६.६४% असून त्यामध्ये पुरुषांचे ८५.३८%, तर स्त्रियांचे ६६.७७ आहे.
हवामान
येथील हवामान विषम असून उन्हाळ्यात मे-जूनमहिन्यांत तापमान ४६° से. पर्यंत वाढते तर हिवाळ्यात नोव्हेंबर–डिसेंबर-जानेवारी यांदरम्यान पारा -२° से. पर्यंत खाली जातो.मे-जून महिन्यांत उष्ण व कोरडे वारे वाहतात त्यांना स्थानिक भाषेत ‘लू’ म्हणतात.
मैदानी प्रदेशात बहुतांश पाऊस जुलै – सप्टेंबर महिन्यांतपडतो. आग्नेय मॉन्सून अथवा बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या मॉन्सून वाऱ्यांमुळे सरासरी ७६० मिमी. पाऊस पडतो तर जानेवारी-फेब्रुवारीया काळात पश्चिमेकडून येणाऱ्या आवर्तांपासूनही अल्पवृष्टी होते. वार्षिक जलवायुमानाचा विचार करता नोव्हेंबर – फेब्रुवारीमध्ये थंड व आल्हाद-दायक हवा, एप्रिल – जूनमध्ये कडक उन्हाळा व जुलै – सप्टेंबरमध्येपावसाळा असे हवामान आढळते.
हरियाणा राज्याची भाषा
हिंदी ही राज्यातील प्रशासकीय व्यवहाराची प्रमुख भाषा असून हरियाणवी ही मातृभाषा आहे. येथे काही प्रमाणात उर्दू व पंजाबी या भाषाही बोलल्या जातात.
हरयाणात विविध बोलीभाषा बोलल्या जातात. बांगरू, जाटू (जाट), हरयानी, खारीबोली, बंजारी (बंजारा), गुज्जरी (गुज्जर) अशा काही बोलीभाषांचा उल्लेख करता येईल.
मृदा
हरयाणाची मृदा मुख्यतः जलोढीय स्वरूपाची आहे. त्यापैकी सखल नदीकाठच्या मृदेस ‘खादर’ तर उंच प्रदेशातील मृदेस ‘बांगर’ म्हणतात. येथे प्राधान्याने गाळाची मृदा आढळते. ईशान्येकडे हलकी वाळूमिश्रित भरड मृदा, तर नैर्ऋत्येला थरच्या वाळवंटानजीक चुनखडीयुक्त मृदा आढळते.
खनिज संपत्ति
या राज्याच्या दक्षिणेकडील अंतर्भागात निम्न प्रतीच्या लोहखनिजाचे साठे आहेत. अंबाला व महेंद्रगड जिल्ह्यांमध्येचुनखडी, संगमरवर, लोह धातुक, चिनी माती व पाटीचा दगड यांचेसाठे आढळतात.
वनस्पती व प्राणी
हरयाणाच्या मैदानी प्रदेशात प्रामुख्याने शुष्क, काटेरी झुडपांसह पानझडी वृक्ष व सखल भागात लहान झुडपे आढळतात. येथे निलगिरी, देवदार, किकर, शिसम, बाभूळ तसेच मोठ्या प्रमाणात अलुबुखार इ. वृक्ष आढळतात. पुष्पीय वनांच्या दृष्टीने शिवालिक भाग समृद्ध आहे.
हरयाणाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३.३% जंगल आहेएकेकाळी येथे सिंह, वाघ हे प्राणी डोंगराळ दऱ्याखोऱ्यांत आढळत होते. सांप्रत खार, रानडुक्कर, लांडगे, ससे, हरणे, कोल्हे, काळवीट, रानटीमांजरे इ. प्राणी आढळतात. यांशिवाय अंगावर मऊ लव असणारे ऊद मांजर, हॉग हरिण, बिबट्या, नीलगाय इ. प्राणी प्रसिद्ध असून नदीपात्रात मगरी आढळतात.
पक्ष्यांमध्ये सामान्यतः मोर, पारवे, क्वेल, लांब चोचीचा पक्षी (स्नाइप), सँड ग्राउझ इ. आढळतात. विषारी नाग आणि क्रेट हे सरपटणारे प्राणीही आढळतात. येथे रेशीम किडे, मधमाशा, उंट, गाय, म्हैस तसेच घोडे इ. प्राण्यांचे पालन केले जाते.
हरियाणाचा पारंपारिक पोशाख
दोलायमान आणि रंगीबेरंगी आहे जो त्यांची संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली व्यक्त करतो. पुरुषांसाठी, हरियाणाचा पारंपारिक पोशाख धोती-कुर्ता-पगडी आहे आणि राज्यातील महिला कुर्ती-घागरा-ओधनी घालतात.
हरियाणा राज्याची संस्कृती व सण
लोहरी, बैसाखी, तेज, कुरूक्षेत्र उत्सव, आंबा उत्सव, हरयाणा दिवस, महाभारत उत्सव, सुरजकुंड यात्रा, सोहना कार रॅली, पिंजोर पारंपरिक उत्सव, कार्तिक सांस्कृतिक उत्सव.
राज्यात अनेक लोकनृत्य प्रचलित आहेत. पैकी सांग, छाटी, खोरिया, रास लिला, धमाल, झुमार, लोर, गुग्गा, तेज, फाग, चौपारिया अशी काही लोकनृत्य महत्वाची आहेत. सारंगी, हार्मोनियम, चिमटा, धाड, ढोलक, मंजिरा, खारताल, डमरू, डुग्गी, डफ, बासरी, बीन, घुंगरू, ढाक, घाऱ्हा, थाली, शंख आदी लोकवाद्य हरयाणात पारंपरिक पद्धतीने वाजवली जातात.
हरयानवी हे आपल्या लोकगीतात खूप श्रीमंत भाषा आहे. रागिनी हे लोकगीत खूप लोकप्रिय असून लोकनाट्यात स्वाँग हे लोकनाट्य लोकप्रिय आहे.
हरयानवी भाषा ही विनोदाची भाषा आहे, असा समज प्रचलित व्हावा इतका विनोद या भाषेत आहे. सुरेंदर शर्मा हे अशा विनोदासाठी या राज्यात लोकप्रिय आहेत. त्यांच्या विनोदात हरयाणातील ग्रामीण भागाचे चित्र दिसते.
हरियाणातील पर्यटन स्थळे
- सुल्तानपुर राष्ट्रीय उद्यान
- बादशाहपुर चा किल्ला
- बेगम समरू पॅलेस
- फारुख चा किल्ला
- सीआरपीएफ शूटिंग रेंज
- फरीदाबाद
- सूरजकुंड
- काबुली बाग
- पानीपत संग्रहालय
धन्यवाद!!!!