तामिळनाडू राज्याची संपूर्ण माहिती Tamil Nadu Information In Marathi

Tamil Nadu Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आज आपण तामिळनाडू या राज्याची माहिती पाहणार आहोत.

Tamil Nadu Information In Marathi

तामिळनाडू राज्याची संपूर्ण माहिती Tamil Nadu Information In Marathi

हे भारतातील २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. चेन्नई (पूर्वीचे नाव:मद्रास) हे सर्वात मोठे शहर तसेच राज्याची राजधानी आहे. तमिळनाडू भारताच्या सर्वात दक्षिणटोकावरील द्वीपकल्पावर वसले आहे.

भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये(१०.५६ टक्के)असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. सुत, साखर व सिमेंट हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत.

सर्वांगीण विकासात तमिळनाडू हे भारतातील एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. तामिळनाडू आपल्या सर्वाेत्तम परिवहन सुविधेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

तामिळनाडू राज्याचे नामकरण व स्थापना

तमिळनाडू हा शब्द तामिळ भाषेतून आला आहे तमिळ आणि नाडू (நாடு) ज्याचा शाब्दिक अर्थ घर किंवा निवासस्थान, जागा, ज्याचा अर्थ तामिळ लोकांचे घर किंवा तामिळ लोकांचा देश असा होतो.

ब्रिटिश राजवटीत हा प्रांत मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग होता. स्वातंत्र्यानंतर, मद्रास प्रेसिडेन्सी अनेक भागांमध्ये विभागली गेली, ज्यामुळे मद्रास आणि इतर राज्यांचा उदय झाला. 1968 मध्ये मद्रास प्रांताचे नाव बदलून तामिळनाडू करण्यात आले.

तामिळनाडू राज्याचा इतिहास

प्राचिन काळापासून तामिळनाडूचा प्रदेश कायम मानवी वस्तीत आहे आणि तामिळनाडूचा इतिहास आणि तामिळ लोकांची संस्कृती जगातील सर्वात प्राचीन आहे. त्याच्या संपूर्ण इतिहासामध्ये, पॅलीओलिथिक युगाच्या सुरुवातीच्या काळापासून आधुनिक काळापर्यंत हा प्रदेश विविध बाह्य संस्कृतींसह अस्तित्वात आहे.

पुराणाश्मयुगापासून नवाश्मयुगापयर्यंतच्या काळातील अवशेष तमिळनाडूत आढळतात. अगस्त्य ऋषींना तमिळ देशाचा पिता आणि तमिळ व्याकरणाचा पहिला लेखक मानतात. दंतकथेप्रमाणे चेर, चोल व पांड्य ही राज्ये कोरकाई येथे राहणाऱ्या तीन भावांनी स्थापन केली.

अशोकाच्या कोरीव लेखात पांड्य, चोल व चेर यांचा उल्लेख मौर्य राज्याच्या शेजारची मित्र राज्ये म्हणून आढळतो. चोल राजा पहिला आदित्य याने पल्लव राजा अपराजित याचा पराभव करून दक्षिण अर्काटचा प्रदेश चोलांच्या सत्तेखाली आणला. आदित्याचे वडील विजयालय हा तंजावर येथील चोल घराण्याचा संस्थापक होता.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या होमरूल चळवळीपासून तमिळनाडूत राजकीय आंदोलने सुरू झाली. सर्व चळवळीत मद्रासच्या रहिवाशांनी भाग घेतला. ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मद्रासचा गव्हर्नर मद्रास इलाख्याचा राज्यकारभार कौन्सिलच्या मदतीने करी. या काळात रयतवारीचे एक मोठे बंड झाले आणि ब्रिटिश सरकारने रयतांवरील कराचा बोजा सकृतदर्शनी कमी केला.

विसाव्या शतकात लो. टिळक व म. गांधी यांच्या चळवळींस इथे काहीसा प्रतिसाद मिळाला, तरी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत तमिळनाडू राज्याने विशेष अशी काहीच भरीव कामगिरी केली नाही.

राजाजी, कामराज, सुब्रह्मण्यम् वगैरे काही थोड्या व्यक्ती सोडल्या असता नाव घेण्यासारख्या व्यक्ती तमिळनाडू राज्यात झाल्या नाहीत. तथापि मद्रास इलाख्यामधील आंध्र प्रदेशाने व विशेषतः रामानंदतीर्थ यांनी सिंहांचा वाटा उचलला.

तामिळनाडू राज्याचा भुगोल

पश्चिमेस केरळ, वायव्येला कर्नाटक, दक्षिणेस भारतीय महासागर व श्रीलंका, पूर्वेस बंगालचा उपसागर, तसेच केंद्रशासित प्रदेश पॉन्डिचरी (पुदुच्चेरी) आणि उत्तरेस आंध्र प्रदेश अशा त्याच्या चतुःसीमा आहेत.

राज्याच्या वायव्येस निलगिरी पर्वतरांगा, अण्णामालै टेकड्या, पश्चिमेस पालक्काड, तर उत्तरेस पूर्वघाट आणि पूर्वदिशेला असलेला बंगालचा उपसागर दक्षिणेस पाल्कची समुद्रधुनी ओलांडून भारतीय महासागरात मिसळतो.

राज्याचा पश्चिम, दक्षिण आणि उत्तर-पूर्व भाग डोंगराळ आहे. तामिळनाडू हे देशातील एकमेव राज्य आहे ज्यामध्ये पूर्व आणि पश्चिम घाट निलगिरीला जोडलेले आहेत.

केरळच्या सीमेला लागून असलेला पश्चिम घाट आहे, जो नैऋत्य मोसमी पावसाला रोखतो. राज्याचा पूर्व भाग सुपीक आहे, तर उत्तरेकडील भागात डोंगर आणि सपाट जमीन आहे. राज्याचा मध्य भाग कोरडा आहे आणि राज्याच्या इतर भागांपेक्षा कमी पाऊस पडतो.

तामिळनाडूची किनारपट्टी ९१० किमी आहे. या राज्याचे १५० मी. च्या समोच्चरेषेने पूर्वेचा सखल मैदानी प्रदेश व पश्चिमेचा पठारी, डोंगराळ प्रदेश असे दोन स्पष्ट भाग पडतात. पूर्वेकडील समुद्रकिनारा अगदी सरळ असून त्यावर त्याच्या लांबीच्या मानाने बंदरे थोडीच आहेत.

त्यावर मद्रासची प्रसिद्ध मरीना बीच व इतर पुळणी तयार झालेल्या आहेत. सामान्यतः हा किनारा उद्‌गमनाचा आहे तथापि त्यावर महाबलीपुर, तंजावरचा काही भाग इ. ठिकाणी अधोगमनाने काही प्रदेश समुद्रात बुडल्याचाही पुरावा आढळतो. बऱ्याच ठिकाणी नदीमुखाजवळ वालुकाभित्ती निर्माण झालेल्या दिसतात.

रामेश्वर द्वीप हे याचेच उदाहरण होय. मानारचे आखात आणि पाल्कची सामुद्रधुनी यांदरम्यान छोटीछोटी प्रवाळ द्वीपे बनलेली दिसतात. रामेश्वरच्या टोकाशी असलेले धनुष्कोडी आणि त्यासमोरचे श्रीलंकेचे तलाई मानार यांना जोडणारी जलांतर्गत खडकांची रांग म्हणजेच सुप्रसिद्ध रामाचा सेतू होय.

यालाच ॲडम्स ब्रिज असेही नाव आहे. रामनाथपुरम् व तिरुनेलवेली जिल्ह्यांत समुद्रकाठी सु. ३० ते ६५ मी. उंचीचे छोटे वालुकागिरी निर्माण झालेले दिसतात. त्यांना ‘तेरी’ म्हणतात. त्यांवरील ताडाच्या झाडांमुळे वाळू व माती धरून ठेवली जाते. किनाऱ्यावर खारकच्छही निर्माण झाले आहेत.

मद्रासपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या मैदानी प्रदेशाची भूमी मुख्यतः कावेरीने व इतर नद्यांनी आणलेल्या जलोढाने तयार झाली आहे. कावेरीचा १०,४०० चौ.किमी. विस्ताराचा त्रिभुज प्रदेश हा एक अतिविस्तृत, सुपीक व समृद्ध प्रदेश आहे. मैदानी प्रदेशात विखुरलेले विशेषतः पालार आणि आड्यार नद्यांदरम्यान काही अवशिष्ट शैल दिसून येतात.

तामिळनाडूतील कावेरी नदी, पालर नदी व वैगई नदी या प्रमुख नद्या आहेत.

तमिळनाडू राज्यात एकूण 32 जिल्हे आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे

अरियालूर, चेन्नई, कोइंबतूर, कडलूर, धर्मपुरी, दिंडुक्कल, इरोड, कांचीपुरम, कन्याकुमारी जिल्हा, करुर, कृष्णगिरी, मदुरै, नामक्कल, नामक्कल, निलगिरी, पेरंबळूर, पुदुकट्टै, रामनाथपुरम, सेलम, शिवगंगै, तंजावुर, तेनी, तूतुकुडी, तिरुचिरापल्ली, तिरुनलवेली, तिरुपूर, तिरूवल्लूर, तिरुवनमलाई, तिरुवरुर, वेल्लूर, विलुप्पुरम, विरुधु नगर.लोकसंख्या तामिळनाडू हे भारतातील सातवे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे.

लोकसंख्या 7,21,38,958 एवढी आहे. राज्याची 48.4% लोकसंख्या शहरी भागात राहते .ही भारतातील मोठ्या राज्यांमध्ये तिसरी उच्च टक्केवारी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार तामिळनाडू चे लिंग गुणोत्तर प्रमाण 1000 पुरुषांमागे 995 स्त्रियाआहे.

तमिळ ही येथील प्रमुख भाषा आहे. तामिळनाडू राज्यात 51,837,507 साक्षर असून  साक्षरता दर 80.33 % आहे.त्यामानाने देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोक तमिळनाडूत राहतात.

हवामान

विषुववृत्तापासून जवळ असल्याने हवामान उष्ण आहे. उन्हाळ्यात मे महिन्याचे सरासरी तापमान 21° से. व जास्तीत जास्त तपमान 43° सें. आणि हिवाळ्यात जानेवारी महिन्याचे सरासरी तपमान 24° सें. व कमीत कमी तपमान 18° से. असते. किमान मासिक सरासरी तपमान डिसेंबर वेल्लोरला 13.4° सें. व सेलमला 16°सें. असते.

वार्षिक पर्जन्यमान स्थलपरत्वे 70 सेंमी ते 150 सेंमी असून किनारी प्रदेशात परतीच्या मोसमी वाऱ्यांपासून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे पावसाचे प्रमाण जून ते सप्टेंबरच्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसापेक्षा जास्त असते.

तमिळनाडू डोंगरांवर 60 सेंमीपर्यंत तर पालघाट खिंडीजवळच्या प्रदेशात 120 सेंमी. पाऊस पडतो. राज्याचा मध्य भाग कोरडा आहे आणि राज्याच्या इतर भागांपेक्षा कमी पाऊस पडतो .रामनाथपुरम् व तिरुनेलवेली जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अगदी कमी असते.

केरळच्या सीमेला लागून असलेला पश्चिम घाट आहे, जो नैऋत्य मोसमी पावसाला रोखतो. राज्याचा मध्य भाग कोरडा आहे आणि राज्याच्या इतर भागांपेक्षा कमी पाऊस पडतो.

तामिळनाडूची किनारपट्टी ९१० किमी आहे. 2004 मध्ये त्सुनामीच्या लाटाही या राज्याच्या किनारपट्टीवर आदळल्या होत्या, त्यामुळे येथे खूप नुकसान झाले होते.

तामिळनाडूमध्ये आलेल्या त्सुनामीत सुमारे 7,790 लोकांचा मृत्यू झाला होता. या राज्याचे हवामान मान्सूनवर अवलंबून असून अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. राज्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान 945 मिमी आहे.

तामिळनाडू राज्याची भाषा

एकूण लोकसंख्येपैकी बहुतांशी लोक तमिळ भाषा बोलणारे आहेत. तमिळ ही राज्यभाषा आहे. याशिवाय तेलुगू, मल्याळम्, कन्नड, उर्दू आणि इंग्रजी या भाषाही या राज्यात प्रचलित आहेत.

तामिळ तामिळनाडुची अधिकृत भाषा आहे. जेव्हा भारत राष्ट्रीय मानदंड स्वीकारला तेव्हा तामिळ ही भारताची शास्त्रीय भाषा म्हणून ओळखली जाणारी पहिली भाषा होती. २००१ च्या जनगणनेनुसार,तामिळनाडूमध्ये एकूण लोकसंख्येच्या ८९.४३ टक्के लोकांद्वारे तामिळ ही पहिली भाषा म्हणून बोलली जाते.

पोशाख

महिला ड्रेसिंग शैली:

तामिळनाडूमध्ये साड्या खूप प्रसिद्ध आहेत. साड्या विणण्यासाठी अनेक साहित्य वापरले जाते. ते कापूस, रेशीम, क्रेप सिल्क, ऑर्गेन्झा, जॉर्जेट आणि पटोला सिल्कसारखे आहेत.

तामिळनाडूतील महिला समृद्ध संस्कृतीच्या साड्या नेसतात. तरुण मुली पूर्ण लांबीचे शॉर्ट ब्लाउज आणि शाल घालतात, या परिधान करण्याच्या शैलीला पावडा म्हणतात, ज्याला अर्धी साडी देखील म्हणतात.

आता शहरातील बहुतेक महिला सलवार कमीज, जीन्स आणि पॅन्ट घालतात. पुरुष टी-शर्ट, कॉटन शर्ट आणि लुंगी परिधान करतात. तामिळनाडूतील स्त्रिया जरी वर्कसह साडीचा पारंपारिक पोशाख परिधान करतात.

तामिळनाडूतील पुरुषांची पारंपारिक पोशाख शैली:·  पुरुषांना त्यांच्या परंपरेनुसार अधिक वैविध्यपूर्ण पोशाख नाहीत. साधारणपणे ते पांढरा शर्ट आणि अंगवस्त्रासोबत लुंगी वापरतात. लुंगी वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहेत, परंतु शुद्ध पांढऱ्या लुंगी हे तमिळनाडूतील पुरुषांचे पारंपारिक पोशाख आणि लग्नाचे पोशाख आहेत.

लहान मुले विविध रंगांची लुंगी घालतात. पुरुषांना अंगवस्त्रम घालण्याची आवड आहे. जे सर्वात तामिळ ड्रेसिंग शैली आहे आणि खांद्यावर गुंडाळलेला कापडाचा तुकडा आहे. सध्या पुरुष चहा शर्ट, जीन्स आणि इतर आधुनिक पोशाख वापरत आहेत

मृदा

तमिळनाडूच्या मैदानी प्रदेशाचा बराचसा भाग नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने निर्माण झाला आहे. कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशातील मृदा सुपीक गाळाची असून अतिशय उपजाऊ आहे. उत्तर भागात रेती आणि गाळमिश्रित लोम प्रकारची मृदा सापडते.

या मृदेच्या प्रदेशात नारळाची झाडे चांगली येतात. मध्यवर्ती भागात तांबडी मृदा आढळते. ही शेतीच्या दृष्टीने विशेष उपजाऊ नाही. मदुराई, रामनाथपुरम् व तिरुनेलवेली जिल्ह्यांत काही भागात काळी मृदा आहे. ही मृदा कापसाच्या पिकासाठी उत्तम असते. चिंगलपुट, तंजावर वगैरे भागांत लॅटेराइट–जांभा दगडाची मृदा आहे.

शेती

राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. तामिळनाडूचे तांदूळ उत्पादन देशात पाचव्या क्रमांकावर आहे. हे राज्य भारताच्या एकूण फळ उत्पादनापैकी 10% आणि भाजीपाला उत्पादनाच्या 6% उत्पादन करते. येथे असलेल्या कावेरी नदीच्या खोऱ्याला “दक्षिण भारताचा तांदूळ वाडगा” असे म्हणतात.

तामिळनाडू हे केळी आणि फुलांचे सर्वात मोठे उत्पादक, आंबा, रबर, भुईमूग, नारळ यांचे दुसरे सर्वात मोठे उत्पादक आणि कॉफीचे तिसरे सर्वात मोठे उत्पादक आहे. राज्यातील 2% लागवडीखालील जमीन ऊस उत्पादनासाठी वापरली जाते. तमिळनाडू हा दुधाचाही मोठा उत्पादक आहे.

कापसाच्या उत्पादनात भारतात हे महत्त्वाचे राज्य मानले जाते. नगदी पीक म्हणून ओलितावर उच्च प्रतीच्या कापसाची विस्तृत प्रमाणावर लागवड केली जाते. रामनाथपुरम्, मदुराई, सेलम, तिरुनेलवेली आणि तिरुचिरापल्ली हे जिल्हे कापसाच्या उत्पादनात महत्त्वाचे आहेत.

या राज्यात नैर्ऋत्य भागात असलेल्या डोंगर उतारावरील भागात कॉफीची लागवड केली आहे. निलगिरी पर्वत कॉफीच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

भुईमूग आणि तीळ या तेलबियांची लागवड आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. तिळाच्या उत्पादनात भारतात हे राज्य महत्त्वाचे आहे. तेलबियांच्या लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी ५% जमीन तिळाच्या लागवडीखाली आणि ८४% जमीन भुईमुगाच्या लागवडीखाली आहे. यांशिवाय ज्वारी, रागी आणि बाजरी ह्यांची शेती थोड्याफार प्रमाणात होते.

खनिजे

खनिज संपत्ती : या राज्यात अनेक प्रकारचे खनिज पदार्थ सापडतात. मॅग्नेसाइटच्या उत्पादनात या राज्याचा भारतात पहिला क्रमांक लागतो. एकणू उत्पादनाच्या ८० ते ९०% मॅग्नेसाइटचे उत्पादन तमिळनाडूतूनच येते.

सेलम जिल्ह्यात उच्च प्रतीच्या मॅग्नेसाइट धातूचे भरपूर साठे आहेत, तसेच या जिल्ह्यात लोहधातुकाचे विपुल साठे आहेत. परंतु उच्च प्रतीच्या लोहधातुकाचे साठे कमी आहेत. तिरुचिरापल्ली, द. अर्काट, निलगिरी, एरोड या भागांतही लोहधातुक सापडते.

जिप्समच्या उत्पादनात हे राज्य भारतात महत्त्वाचे आहे. भारताच्या जिप्समच्या एकूण उत्पादनाच्या ३०% जिप्समचे उत्पादन या राज्यातूनच मिळते. कोईमतूर, तिरुनेलवेली, तिरुचिरापल्ली हे जिल्हे जिप्समच्या उत्पादनात महत्त्वाचे आहेत.

या राज्याच्या पूर्व किनारपट्टीवर मीठ तयार करण्याचा व्यवसाय चालतो. मिठाचे वार्षिक सरासरी उत्पादन ७ लाख टन असून कर्नाटक, प. बंगाल, ओरिसा व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मीठ पाठविले जाते.

भारतातील चुनखडीच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास १२% उत्पादन तमिळनाडूतून मिळते व तेही प्रामुख्याने कोईमतूर, सेलम, तिरुनेलवेली आणि तिरुचिरापल्ली येथून मिळते.

सेलम जिल्ह्यात बॉक्साइट, तिरुचिरापल्ली जिल्ह्यात फॉस्फेट, कन्याकुमारी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशातून, नेयवेलीजवळ लिग्नाइट प्रकारच्या कोळशाचे भरपूर साठे आहेत.

नेयवेली प्रकल्पानुसार दरवर्षी या भागातून ३५,००,००० टन कोळशाचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे. यातील १५,००,००० टन कोळसा नेयवेलीजवळ उभारण्यात आलेल्या औष्णिक विद्युत् केंद्रात वापरण्यात येईल.

या केंद्रापासून २·५ लक्ष किवॉ. विद्युत् शक्तीचे उत्पादन होईल. याशिवाय ५,००,००० टन कोळसा युरिया खत कारखान्यात वापरण्यात येईल व त्यापासून १,५२,००० टन युरिया खताचे उत्पादन होईल.

उद्योगधंदे

भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये(१०.५६ टक्के)असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो.

वस्तुनिर्माण उद्योगांचा बराच विकास झाला आहे. सुतीवस्त्र उद्योग, साखर उद्योग, सिमेंट उद्योग आणि यांत्रिक उद्योग, काड्यापेट्या तयार करण्याचा उद्योग हे प्रमुख उद्योग आहेत. यांशिवाय हस्तव्यवसायावर आधारित बरेच उद्योग या राज्यात चालतात.

सुतीवस्त्र उद्योगाचा या राज्यात बराच विकास झाला आहे. लहानमोठ्या एकूण २१० कापडगिरण्या आहेत. यांत कोईमतूर, मद्रास व मदुराई या ठिकाणी सुतीवस्त्र गिरण्यांचे स्थानिकीकरण झाले आहे. एकट्या कोईमतूर येथे ११५ गिरण्या आहेत.

सु १४,००,००,००० किग्रॅ. सुती धाग्याचे व १५,००,००,००० मी. सुती कापडाचे उत्पादन होते. येथील हातमागावरील कापड प्रसिद्ध आहे. मद्रासला कृत्रिम धाग्याचे उत्पादन होते. कोईमतूर, सेलम, निलगिरी, तिरुनेलवेली, धर्मपुरी जिल्ह्यांत रेशमाचे उत्पादन होते.

साखर कारखाने : या राज्यात उ. अर्काट, द. अर्काट. तिरुचिरापल्ली आणि मदुराई या जिल्ह्यांत साखर कारखाने स्थापन झाले आहेत. १९७३–७४ मध्ये ३,३२,४०३ मे. टन साखरेचे उत्पादन झाले.

सिमेंट उद्योग : सिमेंट तयार करण्याचे या राज्यात तीन कारखाने आहेत. उत्पादनक्षमता १८,००,००० मे. टन कोईमतूर जिल्ह्यात मदुक्कराई, तिरुचिरापल्ली जिल्ह्यात दालमियापुरम् आणि तिरुनेलवेली भागात तिलाईउर या ठिकाणी सिमेंटचे कारखाने स्थापन झाले आहेत. या उत्पादनात राज्याचा देशात दुसरा क्रमांक आहे.

काड्यापेट्या कारखाने : काड्यापेट्या तयार करण्याचे एकूण आठ कारखाने आहेत. रामनाथपुरम्, चिंगलपुट, तिरुनेलवेली व उ. अर्काट जिल्ह्यांत हे कारखाने स्थापन झाले आहेत. दरवर्षी ६०,००,००० काडेपेट्या तयार होतात.

याशिवाय मद्रास, कोईमतूर व मदुराई या ठिकाणी लोकरी कापड, कोईमतूर येथे काच, मद्रास आणि सेलम येथे वनस्पती तूप, मेत्तूर व मद्रास येथे रासायनिक पदार्थ, मद्रासला मोटारगाड्या, कोईमतूर येथे सायकली तयार करने.

तामिळनाडू, भारताचा महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठे औद्योगिक राज्य आहे . हे भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य आहे जिथे 47% लोकसंख्या शहरी भागात राहते. तामिळनाडूमधील औद्योगिक उत्पादन क्षेत्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत समान प्रमाणात पसरलेले आहे.

तामिळनाडू हे कर्नाटकानंतर देशातील सर्वात मोठे माहिती तंत्रज्ञान (आयटी) विकास क्षेत्र आहे, विशेषत: चेन्नई जे कर्नाटकची राजधानी बेंगळुरू आहे .

हे देशातील सर्वात मोठे आयटी शहर आहे आणि देशातील सर्वात मोठे आयटी पार्क येथे आहे. याशिवाय जैवतंत्रज्ञान विकास (चेन्नई आणि मदुराई), फेरस मेटलर्जी (सालेम), अणुऊर्जा (कल्पक्कम आणि कुंदनकुलम) ही केंद्रे आहेत.

येथे एक यांत्रिक अभियांत्रिकी केंद्र देखील आहे आणि देशातील 40% वाहने येथे तयार केली जातात. याशिवाय वस्त्रोद्योग हा देखील येथील एक प्रमुख उद्योग असून त्याचे केंद्र तिरुपूर येथे आहे.

तामिळनाडूचा पर्यटन उद्योग देखील विकसित झाला आहे आणि पर्यटनाची प्रमुख केंद्रे कांचीपुरम, ममल्लापुरम (किंवा महाबलीपुरम), तिरुचिरापल्ली, कन्याकुमारी आणि रामेश्वरम आहेत. चेन्नईचा मरीना बीच हा जगातील दुसरा सर्वात लांब बीच आहे.

वनस्पती

राज्याचा १९७३-७४ मध्ये १५·५% प्रदेश वनाच्छादित होता. पर्वतीय प्रदेशात दाट अरण्ये आहेत. सागवान, रोझवुड, निलगिरी व चंदनाची झाडे जास्त आढळतात. कोईमतूर व निलगिरी पर्वत भागांत सागवानाची दाट जंगले आहेत.

तसेच पर्वत भागात बांबूची वने आढळतात. रबराची झाडेही येऊ शकतात. नेली, एली, अगस्ती, नारळ, सुपारी, ताड, आंबा, फणस, वड, पिंपळ. इ. झाडे तमिळनाडूत आढळतात.

१९७१-७२ मध्ये येथील अरण्यातून ३०,८१० घ. मी. इमारती लाकूड ३,२०,३३२ घ. मी. जळाऊ लाकूड १·५ कोटी रुपये किंमतीचा रबराचा चीक व १,३७० टन चंदनी लाकूड असे उत्पादन झाले. किनाऱ्यालगतच्या भागात नारळाची व ताडाची झाडे आहेत. आग्नेय किनारी प्रदेशात बाभळीची बने व इतर काटेरी वनस्पती आढळतात.

प्राणी

निलगिरी भागात व पर्वतप्रदेशात रानटी हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इ. वन्य प्राणी आढळतात. त्यांच्यासाठी मदुमलई अभयारण्य राखून ठेवलेले आहे. तसेच कावेरी त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिण टोकावरील पॉइंट कॅलिमियर येथे पाणपक्ष्यांचे आश्रयस्थान आहे.

तेथे स्थलांतरी हंसक येतात. गिंडी येथील राजभवनात काळवीट, चितळ व इतर छोट्या प्राण्यांसाठी राखीव उद्यान आहे. पुलिकत सरोवरावरही स्थलांतरी हंसक, बगळे, क्वाक, बदके, करकोचे इ. पाणपक्षी दिसतात.

मद्रासच्या दक्षिणेस वेडंतंगल येथे पक्ष्यांसाठी अभयारण्ये आहे. तेथे पांढरा आयबेक्स क्वाक, स्पूनबिल, उघड्या चोचीचा बलाक, पाणबुडा, ढोक, बगळा, पाणकावळा इ. पक्षी विशेष आढळतात. इतरत्र नेहमीचे भारतीय पशुपक्षी, सर्प, कीटक वगैरे आढळतात.

वाहतूक

तामिळनाडूची वाहतूक व्यवस्था तुलनेने विकसित आहे. राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी 1,99,040 किमी असून त्यापैकी 4,873 किमी राष्ट्रीय महामार्ग आहेत. रस्ते नेटवर्कची घनता 153 ते 100 किमी 2 पर्यंत आहे, जी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

राज्यातील रेल्वे व्यवस्था अतिशय विकसित आहे आणि येथील रेल्वेची एकूण लांबी ५,९५२ किमी आहे. तामिळनाडू हे भारतीय रेल्वेच्या दक्षिणेकडील भागात येते .

राज्याची राजधानी चेन्नई येथे मेट्रो रेल्वे आणि शहराची जलद रेल्वे व्यवस्था आहे. राज्याचे मुख्य बस सेवा ऑपरेटर तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळ आहे जे राज्यभर बस सेवा पुरवते.

राज्याचे प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई येथे आहे आणि देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. इतर दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरुचिरापल्ली आणि कोईम्बतूर येथे आहेत.

तामिळनाडू राज्याचा मुख्य आहार

तामिळनाडू हे नेहमीच फूड हब म्हणून ओळखले जाते. जे भारतातील प्रसिद्ध खाद्य राज्यांपैकी एक आहे.

इथले जेवण अगदी पारंपारिक पद्धतीने तयार केले जाते. सांबर, वडा, इडली, उत्तपम आणि डोसा व्यतिरिक्त इतर अनेक पारंपारिक पदार्थ असतात.

हे प्रदेश शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. ज्यामध्ये प्यासम, बिर्याणी, चेट्टीनाड चिकन, रसम, मटन करी विथ कोकोनट चटणी, पराठा, दही भात, उत्तपम, लेमन राईस आणि इतर अनेक पदार्थ आहेत. याशिवाय, समुद्रकिनारी असलेल्या भागात स्वादिष्ट सीफूड देखील असते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment