केरळ राज्याची संपूर्ण माहिती Kerala Information In Marathi

Kerala Information In Marathi केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला वसलेले एक राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो.

Kerala Information In Marathi

केरळ राज्याची संपूर्ण माहिती Kerala Information In Marathi

केरळ राज्याची स्थापना

केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत.

मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने केरळ राज्याला मोठी गती मिळालेले आहे. येथील खाद्यसंस्कृती देखील वैशिष्टपूर्ण आहे .

पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये भेट देण्यास येतात.राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे.

त्यामुळे केरळात भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य म्हणून ओळखले जाते.अर्थात, केरळचा व्यक्तिविकास सूचकांक भारतात सर्वात अधिक आहे. २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे.

केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थलांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. निसर्ग साधनसंपत्ती आणि महिलाचे शिक्षणातील सर्वात जास्त प्रमाण ही वैशिष्ट्ये आहे.

नावाची उत्पत्ती

केरळ या नावाच्या स्रोताबद्दल संदिग्धता आहे. जुन्या मल्याळी भाषेतील शब्दफोडीप्रमाणे केरा (नारळाचे झाड) व आलम (परिसर) असा केरळमचा अर्थ होतो.

पारंपरिक तमिळ भाषेप्रमाणे केरळची चेरा आलम अशी फोड होते व त्याचा अर्थ डोंगरापलीकडील उतरणीचा प्रदेश असा होतो म्हणजेच चेरा आलम म्हणजेच “Land of the Cheras” ह्या नावाने देखील ओळखले जाते .

केरळच्या मूळच्या स्थानिक रहिवाशांना केरळीय अथवा मल्याळी असे म्हणतात.पुराणात केरळासबंधी अनेक संदर्भ आहेत. एका दंतकथेनुसार केरळची नि‍र्मिती विष्णूचा अवतार मानला जाणाऱ्या भगवान परशुरामांनी समुद्रात आपला परशू फेकून केली.

केरळमधील लोकांनी पारंपारिक व सांस्कृतिक परंपरा कायम राखलेले आहेत .सण-उत्सव ते मोठ्या उत्साहाने साजरी करतात पोंगल हा इथला महत्त्वाचा सण मानला जातो व अगदी धूम धडाक्यात साजरा केले जातात .यावेळी प्रत्येक जण एक दुसऱ्याला शुभेच्छा देतात.

केरळ मध्ये ख्रिश्चन धर्मीयांची संख्या मोठी आहे त्यामुळे ख्रिसमस सण याठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी येतात वर्षभरामध्ये पर्यटकांची मोठी रेलचेल या परिसरात सातत्याने दिसून येते.

केरळ या जिल्ह्याचा भूगोल

केरळची पश्चिम किनारपट्टी ही तुलनेने सपाट आहे. तसेच तेथील तलाव, परस्पर छेदणारे घळी , नद्या यांना Kerala Backwater अशी संज्ञा आहे.

वेंबनाड तलाव हा यामध्ये सर्वात प्रमुख असून अलपुझा आणि कोची यांच्या दरम्यान ते आहे.वेंबनाड तलावाचा जलसाठा हा केरळात सर्वात अधिक असून अलपुझा आणि कोची याच्या दरम्यान २०० कि.मी. पेक्षा अधिक भाग याने व्यापला आहे.

केरळच्या महत्वाच्या ४४ नद्यांमध्ये पेरियार (२४४कि.मी.), भरत पुझा ( २०९ कि.मी ), पाम्बा ( १७६ कि.मी.) चालीयार (१६९ कि.मी) कडलू दिपुझा ( १३० कि.मी) वलपत्तनम (१२९ कि.मी) अचन कोवली (१२८ कि.मी ) यांचा समावेश होतो.केरळातील नद्यांची सरासरी लांबी ६४ कि.मी आहे.

बहुतांशी नद्या या लहान असून त्या पावसाच्या पाण्यामुळेच प्रवाही होतात.केरळातील नद्यांचा आकार लहान असल्याने आणि त्यांचे त्रिभुज प्रदेशही लहान असल्याने पर्यावरणीय प्रश्न उपस्थित होतात.

वाळू उपसा आणि प्रदूषण यांच्या समस्या या नद्यांना भेडसावतात. या राज्याला त्यामुळे भूस्स्खलन , पूर यासाख्या नैसर्गिक आपत्तीना सामोरे जावे लागते.२००४ च्या सुनामी वादळाचा तडाखा या राज्याला सहन करावा लागला.

केरळ या जिल्ह्याचा इतिहास

इसवी सनापूर्वीच्या मौर्य साम्राज्यानंतरच्या काळात केरळ प्रांतावर चेरा घराण्याचे राज्य होते. ते द्रविडांतील विल्लवर या समाजातील होते. त्यांची राजभाषा मल्याळी-तमिळ मिश्रित होती. चेरांची राजधानी वांची येथे होती. केरळचा दक्षिण भाग पांड्य राज्याचा भाग होता व त्यांची राजधानी Nelcynda येथे होती.

चीन, अरबी तसेच रोमन साम्राज्यातील व्यापाऱ्याचे चेरांशी संबध होते असे दिसते. संगम साहित्यांमध्ये रोमन साम्राज्यातील सोन्यांनी भरून येणाऱ्या जहाजांचे वर्णन आहे.

ही जहाजे मसाल्यांच्या व्यापारासाठी येत. रोमन साम्राज्यातील नोंदीनुसार केरळ हे ज्ञातजगाचे पूर्वेकडचे टोक होते. 192–195, 303–307 पश्चिम आशियाई सेमेटिक , ख्रिस्ती, ज्यू आणि इस्लाम समाजगट नसरानी मप्पिला, जुदा मप्पिला इ. ठिकाणी स्थायिक झाले.

इ.स.पू. ५७३ मध्ये ज्यू समाजाचे लोक प्रथम केरळमधे आले.. येशू ख्रिस्ताचे शिष्य संत थॉमस ह्यांनी इसवी सन ००५२ साली केरळला भेट दिली असा समज आहे. परंतु या बाबतीत ठोस पुरावा उपलब्ध नाही. इस्लामी व्यापारी मलिक इब्न दिनार हे ८ व्या शतकात केरळमध्ये स्थायिक झाले व त्यांनी भारतात सर्वात प्रथम इस्लाम आणल्याचे मानले जाते.

केरळ ह्या राज्याची लोकसंख्या

2011 च्या जनगणनेच्या तपशीलानुसार, केरळची लोकसंख्या 3.34 कोटी आहे, जी 2001 च्या जनगणनेतील 3.18 कोटी इतकी वाढली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार केरळची एकूण लोकसंख्या 33,406,061 आहे ,ज्यात अनुक्रमे 16,027,412 आणि 17,378,649 पुरुष आणि महिला आहेत. 2001 मध्ये, एकूण लोकसंख्या 31,841,374 होती ज्यामध्ये पुरुष 15,468,614 तर महिलांची संख्या 16,372,760 होती. या दशकात एकूण लोकसंख्या वाढ ४.९१ टक्के होती, तर मागील दशकात ९.४२ टक्के होती. 2011 मध्ये केरळची लोकसंख्या भारताच्या 2.76 टक्के होती. 2001 मध्ये ही संख्या 3.10 टक्के होती.

अलीकडे केरळच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, 90.67% घरे मालकीची आहेत तर 7.31% भाड्याने दिली आहेत. एकूण, केरळमध्ये 68.45% जोडपी एकल कुटुंबात राहतात.

2011 मध्ये, उत्तर प्रदेशातील 74.24% लोकसंख्येला बँकिंग आणि नॉन-बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये प्रवेश होता. उत्तर प्रदेशातील केवळ 6.27% लोकसंख्येकडे इंटरनेट सुविधा होती जी 2021 मध्ये Jio मुळे सुधारण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील 10.22% कुटुंबाकडे कार आहे तर 24.07% कुटुंबाकडे दुचाकी आहे. काही महिन्यांत आम्हाला केरळच्या निवडणुकीच्या आकडेवारीचा तपशीलही मिळेल.

उत्सव

उत्सव हे या देवाच्या देशातील खरे उत्सव असतात, यांमुळं केरळच्या साध्या जीवनशैलीत भव्यता येते. मग तो राज्याचा ओणम चा उत्सव असो किंवा स्थानिक तीर्थक्षेत्रातील उत्सव, नवीन कपडे आणि शानदार मेजवान्या नक्कीच असतात.

केरळमधील उत्सव हे केवळ आनंदस साजरा करण्याचे दिवस नसून, या भूमीच्या कला आणि संस्कृतीला जतन करणारे आहेत. उत्सव सामाजिक असो वा धार्मिक, पारंपरिक असो वा आधुनिक, कलाप्रदर्शनाशिवाय तो कधीच पूर्ण होत नाही आणि ही कलासुद्धा 2000 वर्षे प्राचीन कुटियाट्टम पासून आधुनिक स्टेज शो पर्यंत.

उत्सव, त्यांची वैशिष्ट्ये आणि तारखा जाणून घेण्यासाठी, फेस्टिवल कॅलेन्डर पहा. तुम्ही फेस्टिवलविकी या केरळच्या उत्सवांवर आधारित कम्युनिटी साईटलाही भेट देऊ शकता.

खाद्य संस्कृती

केरळात शाकाहारी व मांसाहारी दोन्ही अन्न प्रकारांचा समावेश होतो.मासे,कोंबडी आणि अन्य मांसप्रकार येथे खाल्ले  जातात.मसाल्यांच्या पदार्थांचा वापर अन्न प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर केला जातो.

भात हा अन्नाचा महत्त्वाचा घटक असून दिवसाच्या कोणत्याही वेली ते खाला जातो.न्यःरीचे मुख्य पदार्थ तांदळापासून केले जातात ज्यामध्ये इडली, पुत्तू,अप्पम,इडीअप्पम ,वडा यांचा समावेश होतो.चटणी, कडल, पायसम, चिकन करी , माशांची आमटी,रस्सम यासारख्या पदार्थांचा आस्वाद या जोडीने घेतला जातो.

सध्या हा शाकाहारी भोजनाचा प्रकार असून ते केळीच्या पानावर वाढले जाते. या जेवणाच्या शेवटी गोड खीर म्हणजे पायसम खाल्ली जाते.मधल्या वेळच्या खाण्याच्या चटकदार पदार्थात केळ्याचे वेफर्स यासारखे पदार्थ येतात.मांसाहारी पदार्थांमध्येही येथे वैविध्य आढळते.चहासोबत केळीपासून तयार केलेली भजी आस्वादाने खाल्ली जातात. चहाचे मळे उत्तम प्रतीचे आहेत.

अर्थव्यवस्था

स्वातंत्र्यानंतर, लोकशाही समाजवादी कल्याण अर्थव्यवस्था म्हणून हे राज्य व्यवस्थापित केले गेले. १९९० पासून मिश्र अर्थव्यवस्था उदारीकरणामुळे भांडवलशाही, आर्थिक विस्तार, विदेशी गुंतवणूक परवाना आणि रोजगारमध्ये वाढ झाली. “केरळ इंद्रियगोचर” किंवा “विकासाचे केरळ मॉडेल” आणि तुलनेत कमी आर्थिक विकासाचा परिणाम मजबूत सेवा क्षेत्रामुळे झाला आहे.

संस्कृती

केरळची संस्कृती संमिश्र आणि विश्वव्यापी आहे आणि ती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे[३१].  हे आर्यन आणि द्रविड संस्कृतींचे संश्लेषण आहे, त्याच्या पुरातनपणामुळे आणि मलायली लोकांनी टिकवलेल्या सेंद्रिय निरंतरतेद्वारे परिभाषित.

हे शेजारच्या आणि परदेशी संस्कृतीत शतकानुशतके झालेल्या संपर्कात तपशीलवार वर्णन केले गेले होते. तथापि, उर्वरित देशातील केरळच्या भौगोलिक पृथक्करणामुळे विशिष्ट जीवनशैली, कला, वास्तुकला, भाषा, साहित्य आणि सामाजिक संस्था विकसित झाल्या आहेत. राज्यात दरवर्षी १०,०००हून अधिक सण साजरे केले जातात.

मल्याळम दिनदर्शिका, केरळमध्ये इ.स. ८२५ पासून सुरू झालेल्या सौर कॅलेंडरमध्ये  कृषी आणि धार्मिक उपक्रमांच्या नियोजनात सामान्य वापर आढळतो.मल्याळम, भारतातील शास्त्रीय भाषांपैकी एक, केरळची अधिकृत भाषा आहे. डझनभराहूनही अधिक अनुसूचित आणि अनुसूचित नसलेल्या भाषा देखील बोलल्या जातात.

वनस्पती आणि प्राणी

१८ व्या शतकापर्यंत तीन चतुर्थांश भूभाग दाट जंगलाखाली होते.[३३] २००४ पर्यंत, भारतातील १५,००० वनस्पती प्रजातींपैकी २५ % पेक्षा जास्त प्रजाती केरळमध्ये आहेत.

केरळमधील विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील प्राणिजात उच्च दरासाठी उल्लेखनीय आहे. यामध्ये सस्तन प्राण्यांच्या ११८ प्रजाती, ५०० पक्ष्यांच्या प्रजाती, १८९ प्रजातींचे मासे, सरपटण्याच्या १७३ प्रजाती आणि १५१ प्रजातींचा समावेश आहे.

राज्याचा जवळजवळ चौथा भाग वनाच्छादित आहे. पर्वतप्रदेशातील उष्ण कटिबंधीय दाट जंगलांतून शिसवी, साग, रक्तचंदन, सीडार, वेंगाई अशा वृक्षांचे मूल्यवान लाकूड मिळते. उंच डोंगरांच्या उतारावरून चहा, कॉफी व वेलदोड्याचे मळे आहेत. सखल उतारावर रबर, मिरी, सुंठ, हळद यांचे उत्पादन होते.

मध्यभागातील पठारावर टॅपिओका हे कंद आणि सपाट प्रदेशात व किनाऱ्याला भातपिके निघतात, तसेच नारळाची दाट बने आणि सुपारीच्या बागाही आहेत. येथे जमिनीला पाणी कसे द्यावे यापेक्षा पाणी काढून कसे लावावे, हा प्रश्न पडतो.

उंच बांधांमधील पाटांपेक्षा शेते खालच्या पातळीवर असतात आणि पावसाळ्यानंतर शेतांतील पाणी रहाटगाडग्यांनी किंवा आता विजेच्या पंपांनी उपसून पाटांत सोडावे लागते. जरूरीप्रमाणे हे पाणी शेतात सोडता येते. काजू, फणस व आंब्याची झाडे उंच पर्वतांखेरीज सर्वत्र दिसतात.

अरण्यातून हत्तीचे व गव्याचे कळप, अनेक जातींचे हरिण व वानर, वाघ, चित्ता, अस्वल, रानडुक्कर त्याप्रमाणे नाना रंगांचे व स्वरांचे असंख्य पक्षी अनेक जातींचे सर्प आहेत. किनाऱ्यालगतच्या समुद्रात बटरफिश, अँकोवी, सार्डिन, मॅकरल, कॅटफिश, शार्क इ. मासे विपुल मिळतात. खाऱ्या व गोड्या पाण्यांतही कोळंबी व झिंग्यांसारखे कवची जलचर उपलब्ध आहेत.

मृदा

किनाऱ्याच्या सुट्या पट्ट्यांवर रेतीमिश्रित गाळ, आतल्या किनाऱ्याला नदीगाळ, मध्य पठारावर जांभ्या खडकाची झालेली निकृष्ट जमीन आणि पर्वतभागात नीस खडकाचा भुगा व वनप्रदेशातील कुजलेला पाला पाचोळा मिळून झालेली माती, हे केरळमधील मृदांचे मुख्य प्रकार आहेत.

खनिजे

आधुनिक काळात महत्त्व पावलेली मोनाझाइट, इल्मेनाइट, रूटाइल, झिरकॉन, सिलिमनाइट व गार्नेट ही खनिजे किनाऱ्याच्या वाळूत सापडतात. पांढऱ्या चिकणमातीचे मोठाले साठे राज्यात असून अभ्रक, ग्रॅफाइट, चुनखडक, सिलिका वाळू आणि लिग्नाइट यांचाही आढळ झाला आहे.

त्याचप्रमाणे अलेप्पी व एर्नाकुलम् जिल्ह्यांत काचधंद्याला उपयोगी पांढरी वाळू आणि क्विलॉन, त्रिचूर व कननोर जिल्ह्यांत पांढरा शाडू सापडतो.

केरळ येथील पर्यटन स्थळे

हिरवेगार चहाचे मळे, शांत वळणदार बॅकवॉटर आणि मसाल्यांची लागवड ही काही वैशिष्ट्ये आहेत जी केरळला भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून परिभाषित करतात.

‘देवाचा स्वतःचा देश’ म्हणजेच “God’s own country” म्हणून प्रसिद्ध असलेले केरळ हे काँक्रीटच्या जंगलापासून दूर असलेल्या आनंददायी हवामानात आराम करण्यासाठी येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी एक आश्रयस्थान आहे.

अशा राज्यात जेथे स्थलाकृति थंड टेकड्यांपासून ते धूसर समुद्रकिनाऱ्‍यापर्यंत आहे,  केरळ  हे डोळ्यांना दुखावणारे दृश्य आहे. या उष्णकटिबंधीय नंदनवनाला भेट देणाऱ्या सर्वांसाठी ‘पाहायलाच हवी’ अशा ठिकाणांची यादी येथे आहे .

 • तिरुअनंतपुरम
 • कोची
 • मुन्नार
 • अल्पुझा
 • कोवलम
 • कन्याकुमारी
 • एर्नाकुलम
 • गुरुवायुर
 • कोझीकोडे
 • वर्कला
 • टेकडी

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment