जम्मू काश्मीर राज्याची संपूर्ण माहिती Jammu Kashmir Information In Marathi

Jammu Kashmir Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आज आपण  अशा राज्या बद्द्ल माहिति पाहानार आहोत ज्याला आपण स्वर्ग म्हणतो ते म्हणजे जम्मू काश्मीर.

Jammu Kashmir Information In Marathi

जम्मू काश्मीर राज्याची संपूर्ण माहिती Jammu Kashmir Information In Marathi

जम्मू आणि काश्मीर हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. जम्मू आणि काश्मीरचे भौगोलिक क्षेत्रफळ 2,22,236 चौरस किलोमीटर इतके आहे. हा २०१९ पर्यंत भारताचे एक राज्य होता.

भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३१ ऑक्टोबर २०१९ पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे. त्याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे केले गेले आहे आणि लडाखला सुद्धा केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले आहे.

२० जिल्हे असलेला जम्मू व काश्मीर, आणि २ जिल्हे असलेला लडाख असे दोन संघराज्यीय प्रदेश निर्माण करण्यात आले. कलम ३७०, ३५अ रद्द केल्याने देशात सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश लडाख ठरला आहेजम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेश आणि पंजाब या भारतीय राज्यांच्या उत्तरेस आणि लडाखच्या पश्चिमेस आहे.

जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि उपराजधानी जम्मू आहे. सर्वात मोठे शहर श्रीनगर आहे.26 ऑक्टोबर 1947 ला काश्मीर राज्य भारतात विलीन झाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 22 जिल्हे असून काश्मीर, जम्मू व लडाख हे राज्याचे प्रशासकीय तीन विभाग आहेत.

जम्मू काश्मीर चा इतिहास

राजतरंगिनी आणि निलमन पुराणातील आख्यानानुसार काश्मीर हे एक मोठे सरोवर होते. कश्यप – ऋषींनी त्यातील पाणी उपसून तयार केलेले निवासस्थान.

परंतु भूगर्भ शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या भौगोलिक परिवर्तनाचे कारण म्हणजे खडियानगर व बारामुल्ला येथील पर्वतांच्या खचण्यामुळे पाणी निघायला मोकळा मार्ग तयार झाला. अशा प्रकारे पृथ्वीवरील स्वर्ग असणाऱ्या काश्मीरची उत्पत्ती इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सापडते.

हिंदू आणि बौद्ध संस्कृतीची सरमिसळ

काश्मीरमध्ये अशोकाद्वारे बौद्ध धर्माचा परिचय झाला. कनिष्काद्वारे त्याचा प्रसार करण्यात आला. इसवी सन 530 मध्ये स्वातंत्र्यप्राप्ती. परंतु उज्जैनमधील सम्राटांचे पुन्हा वर्चस्व सिद्ध झाले. विक्रमादित्य घराण्याच्या अस्तानंतर काश्मीर खोऱ्याला स्वत:चे शासक मिळाले. हिंदू आणि बौद्ध संस्कृतीची सरमिसळ झाली.

इसवी सन 697 ते 738 काळात प्रसिद्ध हिंदू राजा ललितादित्य याचे पूर्वेकडील बंगालपर्यंत, दक्षिणेकडील कोकणपर्यंत, वायव्यकडील तुर्कीस्तानपर्यंत आणि ईशान्यकडील तिबेटपर्यंत अशा चोहोबाजूंकडे राज्याचा विस्तार झाला.

राजा ललितादित्य

राजा ललितादित्य हा घरे बांधण्याकरीता फार प्रसिद्ध होता. तेराव्या व चौदाव्या शतकाच्या दरम्यान मुस्लीमांचे काश्मीरमध्ये आगमन झाले. इसवी सन 1440 -77 काळात झैनुल अबीहित तातारच्या हल्ल्यापूर्वी हिंदू राजा सिंहदेव यांचे पलायन.

नंतर चकांचे झैन-उल-अबेदिनचा मुलगा हैदरशहावर आक्रमण झाले. त्यांचे राज्य कायम. इसवी सन 1586 मध्ये अकबराने काश्मीर जिंकले. इसवी सन 1572 मध्ये मोगलांच्या हातातून अफगाणिस्तानच्या अहमदशहा अब्दाली यांच्याकडे काश्मीरची सत्ता गेली. या पठाणांचे सदुसष्ट वर्षापर्यंत काश्मीरमध्ये राज्य होते. महाभारतात देखील जम्मूचे नाव नमूद आहे.

हडप्पा

हडप्पा मधील वस्तू आणि अखनूर येथील मौर्य, कुशान व गुप्त कालखंडातील प्राचीन वस्तू यांच्या नवीन शोधामुळे प्राचीन माहितीला नवीन दिशा मिळते. जम्मूचा प्रदेश बावीस वेगळ्या छोट्या टेकड्यांमध्ये विभाजीत आहे.

डोगरा राजा मालदेव याने अनेक प्रांत काबीज केले. इसवी सन 1733 पासून इसवी सन 1782 पर्यंत राजा रणजित देव यांची जम्मूवर सत्ता होती. महाराणा रणजित सिंह यांनी हा प्रदेश पंजाबला जोडला. नंतर राजा गुलाबसिंगकडे हस्तांतरण झाले.

लोकसंख्या

2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 1,25,48,926 इतकी असून साक्षरता 68.74 टक्के आहे.

भूरचना

याच्या सीमांवर पूर्वेस तिबेट, ईशान्येस सिंक्यांग, उत्तरेस सिंक्यांग व अफगाणिस्तान, पश्चिमेस पाकिस्तान आणि दक्षिणेस पंजाब व हिमाचल प्रदेश ही राज्ये आहेत. या अधिकृत सीमांवर पश्चिमेकडून आणि वायव्येकडून १९४७ साली झालेल्या पाकिस्तानच्या आक्रमणानंतर १९४८ साली संयुक्त राष्ट्रसंघाकडे काश्मीर तंटा गेला व १९४९ पासून जी युद्धबंदी रेषा ठरली, ती पश्चिम सीमेच्या आत दक्षिणेच्या मीरपूर जिल्ह्यापासून उत्तरेकडे मुझफरपूर जिल्ह्याच्या मध्यापर्यंत व तेथून पूर्वेस लडाखच्या सीमेपर्यंत जाते.

या रेषेच्या पश्चिमेकडील व उत्तरेकडील प्रदेश पाकच्या ताब्यात असून उरलेला काश्मीर भारतात, त्यातही १९६२ मध्ये चीनने ईशान्य भागावर आक्रमण करून सु. ४२·७३५ चौ. किमी. प्रदेश बळकावला आहे. काश्मिरची भूमी एखाद्या अनेक मजली घराप्रमाणे दक्षिणेकडून उत्तरेकडे पायर्‍या पायर्‍यांनी चढत गेली आहे असे पुष्कळदा म्हटले जाते.

त्याच्या उत्तरेस शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याचा “कंडी” नावाचा निर्जल, दगडधोंड्यांचा प्रदेश नंतर शिवालिक किंवा जम्मू व पुंछ टेकडया मग हिमाचल किंवा मध्य हिमालय त्यांच्या धौल धार व पीर पंजाल शाखा त्यानंतर हिमाद्री या दोहोंच्या दरम्यान सुप्रसिद्ध काश्मीरची दरी, हेमाद्री तील नंगापर्वत ,त्यापलीकडे देव सई व झास्कर पर्वतांची रांग व त्याच्याही पलीकडे लडाख पर्वतरांगा व मग उत्तुंग काराकोरम पर्वत अशी रचना आहे .

तसेच चिनाब, झेलम, सिंधू व तिची मोठी उपनदी श्योक व इतर लहान मोठ्या नद्या व प्रवाह यांच्या दऱ्या व खोरी आहेत. जम्मू-काश्मीरची उत्तुंग पर्वत शिखरे ,पर्वतरांगा ,पठारे ,दऱ्या खोरी, त्यामधील छोटी-छोटी मैदानी प्रदेश, हिमनद्या, नद्या यांनी भरलेल्या अत्यंत डोंगराळ व दुर्गम प्रदेशाचे हे अगदी स्थूल स्वरूप आहे.

जम्मू काश्मीर राज्याच्या ईशान्य भारतातील सर्वात जास्त सुमारे 5,300 मीटर उंचीचे लडाख पठार आहे. हे इतके रुक्ष आहे की भटके लोकही त्याच्याकडे फिरकत नाही. या भागात अनेक खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत .सोड मैदानावरील पाणी करकाश  नदी उत्तरेकडे वाहून नेते.

उंचसखलपणा, दुर्गमता, हवामान, मृदा, अरण्ये, प्राणिजीवन या दृष्टींनी त्याच्या वेगवेगळ्या भागांत विविधता आहे. हिमालय विभागतील सर्वांत जास्त हिम व हिमनद्या याच राज्यात आढळून येतात.

मृदा

सामान्यतः हिमालयातील मृदांवर प्रदेशाची उंची, वनाच्छादन, उतार, प्रदेशाचा मोहरा, हिमानी क्रिया यांचा परिणाम झालेला असतो. अगदी तळभागी जेथे डोंगर सुरू होतात तेथे खडे, माती व जाड वाळू आढळते. नद्यांच्या खोऱ्यात गाळमाती व काही ठिकाणी तांबूस दुमट मृदा दिसते.

उष्णकटिबंधीय जंगलात मृदांचे अपक्षालन होते. त्यामुळे क्षारादी द्रव्ये खालच्या थरांत जातात किंवा वाहून जातात. तथापि या मृदांत कुजलेले सेंद्रिय अवशेष-ह्यूमस पुष्कळ असतात. वरच्या थरात ऑक्सिडीकरण पुष्कळच झालेले असते. मध्यम उंचीच्या पर्वतरांगांपर्यंत नद्यांच्या खोऱ्यात गाळमातीचे पट्टे आढळतात.

नद्यांकाठच्या उंच प्रदेशात चांगली जलोढ मृदा असते. सूचिपर्णी वृक्षांच्या व पाइनच्या अरण्यांत अम्लधर्मी व पॉडसॉल (पडझोल) मृदा तयार होतात. ओक वृक्षांच्या अरण्यांत पिंगट वन्यमुद्रा असतात. दलदलीच्या प्रदेशांत पीट जातीच्या मृदा असतात. तीव्र उतारांवर अपक्क, पातळ, खडकाळ मृदा असते. उंच पर्वतीय भागांत प्रवाहांमुळे व हिमानी क्रियेमुळे झालेली, तर हिमनद्यांच्या व हिमक्षेत्रांच्या प्रदेशांत धोंडेमाती व उत्खालित मृदा असते.

हवामान

वाढत गेलेली उंची,  इराण-अफगाणिस्तानकडून येणारी सौम्य आवर्ते, नैर्ऋत्य मोसमी वारे व लडाख पठारावरील वेगवान वारे यांमुळे जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या भागांत हवामानाचे तीव्र स्वरुपाचे बदल जाणवतात, जम्मू भागात सु. १११·६ सेंमी. पाऊस व उष्णकटिबंधीय हवामान, तर लडाखमध्ये अवघा ९·३ सेंमी. पाऊस व उप-आर्क्टिकसारखे हवामान असा फार मोठा फरक आहे. भूमध्य समुद्राकडून इराण-अफगाणिस्तानमार्गे येणाऱ्या सौम्य आवर्तांमुळे झेलमच्या खोऱ्याचा व आजूबाजूचा प्रदेश सु. पाच महीने हिमाच्छादित राहतो.

काश्मीर खोऱ्यात पीर पंजाल श्रेणीच्या अडथळ्यामुळे नैर्ऋत्य मोसमी वारे क्वचितच पोहोचतात. तेथे वायव्येकडून येणाऱ्या सौम्य आवर्तांचा परिणाम अधिक जाणवतो. डिसेंबरपासून मार्चपर्यंत प्रदेश हिमाच्छादित असतो. मोसमी वारे फारतर उटी निदरीपर्यंत जातात.

मार्चमध्ये सुरू झालेला वसंतऋतू मे महिन्यापर्यंत टिकतो व त्याच काळात सर्वांत जास्त पाऊस पडतो. जुलै आणि ऑगस्ट हे उन्हाळ्याचे महिने बहुतेक कोरडेच जातात. तथापि एका वेळी हवेची आर्द्रता पुष्कळच असते. त्यामुळे या महिन्यात काश्मीर खोऱ्यातील हवा उत्साहवर्धक नसते. ऑक्टोबर हा येथील सर्वोत्तम महिना होय. श्रीनगर येथे हिवाळा चांगलाच कडक असतो.

जानेवारीचे सरासरी तपमान -०·७° से. असते ते जुलैमध्ये २२·८° से पर्यंत च़ढते. वर्षाच्या एकूण ६५·३ सेंमी. पावसापैकी ३८ सेंमी. पाऊस जानेवारी ते मे या काळात बराचसा हिमरूपाने पडतो. जुलै-ऑगस्टमध्ये तो सु. १२ सेंमी. पडतो. श्रीनगरची उंची १,५८५ मी. तर झेलमच्या तीरावरील करेवांची व डोंगरांची उंची ३,६०० मी. पेक्षाही जास्त होत जाते. ईशान्येकडील पर्वतांमुळे लडाख पठारावरून येणारे अतिथंड वारे खोऱ्यात शिरत नाहीत.

यामुळे काश्मीर खोऱ्याचे हवामान समशीतोष्ण, भूमध्यसामुद्रिक हवामानासारखे आहे. लडाखचे हवामान अगदी कोरडे व विषम आहे. लेह येथे सर्व वर्षात ८·५ सेंमी. पाऊस पडतो. उन्हाळ्यात व दिवसा जमीन व हवा फार तापते व हिवाळ्यात आणि रात्री अत्यंत थंड होते. वारे विलक्षण वेगाने वाहत असतात.

लेह येथे जानेवारीचे सरासरी तपमान -८·२°. से व जुलैत १७° से. असते. प्रत्यक्ष किमान तपमान -२८·३°. से. पर्यंत उतरते. पश्चिमेस स्कार्डू येथे हवा यापेक्षा थोडी सौम्य आहे. तीन हजार मी. पेक्षा अधिक उंचीच्या या भागात वातावरणाच्या विरळतेमुळे सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णतेचा (सौरतापमानाचा) व निघून जाणाऱ्या उष्णतेचा वेग फार मोठा असतो.

जम्मूकाश्मीरची भाषा

भाषा व शिक्षण : काश्मीर खोऱ्यात, बुर्झिल व झोजी खिंडींपर्यंतच्या प्रदेशात, त्याचप्रमाणे बनिहाल, रामबन व भद्रवाह या भागांत मिळून सु. २५,००० चौ. किमी. क्षेत्रातील अंदाजे २० लाख लोक काश्मीरी भाषा बोलतात. तिच्याखेरीज राज्यात डोग्री, लडाखी, पंजाबी, बाल्टी, दर्डी, उर्दू, बोधी व पहाडी भाषा बोलणारेही आहेत.

खनिजे

जम्मू प्रांतात अँथ्रासाइटसारखा व काश्मीर खोऱ्यात हलका कोळसा थोड्या प्रमाणात सापडतो.  कश्मीर खोऱ्यात करेवाच्या भागात लिग्नाइट कोळसा सापडतो, पाकिस्तानमधील तेलक्षेत्र कोटली,  नौशहर, सरूइन सर, मानसर बाजूने रावीपलीकडे ज्वालामुखी क्षेत्रात गेले आहे. मानसर-रामनगर भागात नैसर्गिक वायू आढळला आहे. चक्कर सलाल, खंडी आणि पुआनी येथे लोहधातुक आहे.

रियासी भागात बॉक्साइटचे मोठे साठे आहेत. तांब्याची धातुके अनंतनाग जिल्ह्यात, सिंधु खोऱ्यात व चिनाब खोऱ्यात आढळत आहेत. करगिल भागात सिंधूच्या खोऱ्यात क्वचित थोडे सोने सापडते. श्रीनगरजवळ घर्षके व किश्तवारच्या पादरभागात क्वॉर्ट्‌झ मिळते. सोनमर्ग व कर्ना येथील क्वॉर्ट्‌झ दाब विद्युत्‌धर्मी आहे.

जम्मू प्रांतात रामबन, बटोटे व अस्सर येथे आणि काश्मीर प्रांतात उरी, बारमूल व लच्छीपुरा येथे व अनंतनागजवळ जिप्सम मिळते. जम्मूत चेक्कर टिकरी व जंगलगली (सलाल) येथे चिनीमाती मिळते. बेंटोनाइट जम्मूत व संकोचन मृत्तिका (मुलतानी माती) बारमूलजवळ रामपुरा व जम्मूत राजौरी व बुदिल येथे मिळते. उरी तहसिलीत गेरू सापडतो. त्याचा अपयोग रंग, गिलावा वगैरेत होतो.

ग्रामीण भागात घरे, दारे रंगविण्यास गेरूच वापरतात. किश्तवारमधील पादर येथे ४,४२० मी. उंचीवर कॉरंडम सापडते, व माणकेही सापडण्याची शक्यता आहे. बल्टिस्तानात द्रास येथे, स्कार्डूत दासू येथे, काश्मीर प्रांतात कर्ना येथे व किश्तवारमधील पादरभागात वैर्दूय व ॲक्वामरीन ही रत्ने सापडतात.

शिगारच्या उत्तरेस मिळणाऱ्या सर्पेंटाइनपासून हिरवट रंगाच्या चहादाण्या, पेले इ. वस्तू बनवितात. पादर येथे सापडणाऱ्या रॉक क्रिस्टल व फेल्स्पारचा उपयोग ध्वनिक्षेपणाच्या कामी होतो आणि त्यापासून गुंड्या, कर्णभूषणे इ. वस्तूही होतात. पाकव्यास प्रदेशातील चुनखडक, ग्रॅफाइट इत्यादींचा उपयोग करता येत नाही. स्लेट इंडिअनाइट वगैरे इतर काही खनिजे मिळण्यासारखी आहेत. त्यासाठी वाहतुकीच्या चांगल्या सोयी होणे आवश्यक आहे.

जम्मू काश्मीर चा पेहराव

मुस्लिमांचा पेषाख गोल टोपी, खमीस-जाकीट व ढिला चुणीदार पायजमा असा असतो. विशेष प्रसंगी ते शेरवानी किंवा लांब डगला घालून समारंभात शालही पांघरतात. हिंदू पंडित खांद्यावर उपरणे घेऊन कान झाकून रेखीव फेटा बांधतात.

मुसलमान स्त्रियाही सलवार व कमीस पेहरून डोक्याला कसबा (रंगीत रुमाल) बांधतात. त्यांच्या पोषाखांवर कशिदा व नक्षी भरपूर असते. नानारंगी खड्यांचे व चांदीचे अलंकार घालण्याची त्यांना हौस असते. फक्त शहरांत त्या बुरखा घेतात. हिंदू स्त्रिया डोक्याला तरंगा (चौकोनी पांढरा रुमाल) बांधून वेणीसारखा मलमलीचा शेपटा पाठीवर सोडतात. आता शहरांतून स्त्री-पुरुषांचे पोषाख इतर भारतीयांसाखरे आधुनिक होत चालले आहेत.

आहार आणि पेय

आहारात भात, भाजी, डाळ-रोटी, प्रसंगी मांस-मासळी हे पदार्थ हिंदु-मुस्लिमांत सामायिक आहेत. मोसमात मिळणारी फळेही खाण्यात येतात. चहा आणि तंबाखूचे सेवन सर्वत्र चालते.

वने आणि प्राणी

समुद्रसपाटीपासून १,५५० मी. उंचीपर्यंत बांबू व झुडपे, पायथा टेकड्यात उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वृक्ष, आर्द्र समशीतोष्ण भागात सदाहरित ओक, लॉरेल व चेस्टनट १,५५० ते १,८६० मी. उंचीपर्यंत देवदार, प्लेन, स्प्रूस त्याच्यावर ३,१४० मी. उंचीपर्यंत सावलीच्या बाजूला ओक व उन्हाच्या बाजूला सीडार, सिल्व्हर फर, पाइन, यू, ब्ल्यू पाइन आणि अक्रोड ३,७२० मी. पेक्षा जास्त उंचीला शुष्क समशीतोष्ण भागात सूचिपर्णी वृक्ष, देवदार, ज्यूनिपर, ओक, ॲश अल्पाइन हवामानात सिल्व्हर फर, ज्यूनिपर, पाइन, बर्च, ऱ्होडो डेंड्रॉन, विलो व सदाहरित झुडपे असे झाडांचे प्रकार या राज्यात आढळतात.

चीन व चिनार वृक्ष हे काश्मीरचे वैशिष्ट्य आहे. ते सर्वत्र दिसतात. राज्याचा सु. १४% भाग वनाच्छादित आहे. पूर्व बल्टिस्तानात हिमरेषेखाली तुरळक गाळमैदानात झाऊ, डेंगरउतारावर बर्त्सेसारखी झुडपे, काही वन्य झुडपे व तुरळक गवत उगवते.

बल्टिस्तानात २,४१० ते ३,१०० मी. उंचीवर दऱ्याच्या उताराला पाइन व देवदारांची काही बने व प्रवाहांच्या कडेने पॉप्लर व विलो वृक्ष आहेत. फळझाडांपकी अक्रोड, जरदाळू, सफरचंद, पेअर, पीच, प्लम, तुती व बेरीजातींचे प्रकार बागांप्रमाणे वनांतूनही मधूनमधून आढळतात.

काश्मीर खोऱ्यातील असंख्य उपयुक्त औषधी व मसाल्याच्या वनस्पतींपैकी धूपाचा गुग्गुळ, धाग्यासाठी अंबाडी, हिंग, जिरे, कमळबी, पाणगवत, अंतर्सालीकरता भूर्ज, बाभळीच्या जाती, तूण, धामणी, मंज, पपई, जंगली करडई, दंती, कुमुद, नीळ, टाकळा, बाहवा, अडुळसा,कण्हेर, डाँबिया, बोर, फुलाई इत्यादींचा उल्लेख करता येईल.

वन्य प्राण्यांत विशेष उल्लेखनीय बारशिंगा, हनगाल काळवीट, मारखेर हा रानबकरा, कस्तुरीमृग, काळे व पिंगट अस्वल, आयबेक्स, लांडगा, खोकड, गोरल आदी जनावरे व निळा बगळा, हिमकुक्कुट, चकेर, पार्ट्रिज, फेझंट, सँड ग्राउज, ग्रीब, गल, प्लवर, स्नाइप, करकोचा, पारवा, वुलर सरोवरावरील गूज व बदकांचे अनेक प्रकार, गरुड, नाइटजार, खिफ्ट, कोकीळ, ससाणे, घुबडे, खंड्या, हूपू, बुलबुल इ. पक्षी आहेत. नद्यांतून १३ प्रकारचे मासे सापडतात. गुना, पोहर इ. विषारी सर्पही आढळतात.

वाहतूक

क्रमांक १ ए हा राष्ट्रीय हमरस्ता जम्मूपासून उधमपूरवरून बनिहाल बेगद्यातून श्रीनगरवरून बारमूल व उरीपर्यंत जातो. जम्मु ते पूंछ व श्रीनगर ते सोनमर्ग हे दोन पक्के रस्ते वगळल्यास सोनमर्गहून बुझिर्ल खिंडीतून गिलगिटवरून मिंटाका खिंड हा उत्तरेकडचा आणि सोनमर्गहून झाजी खिंडीतून करगिलवरून लेह हा पूर्वेचा, हे डोंगरी रस्ते केवळ तट्‌टू, खेचर, याक यांच्या मदतीने वाहतूकीस शक्य आहेत.

लेहहून दक्षिणेस हिमाचल प्रदेशातील मनालीपर्यंत, पूर्वेस तिबेट सीमेवरील साका खिंडीपर्यंत आणि उत्तर सीमेला काराकोरम खिंडीपर्यंत दुर्गम पर्वतीय पथ आहेत. झेलम नदीचा उपयोग मुझफराबादपर्यंत नावेने मालवाहतुकीसाठी होऊ शकते .पाऊस, धुके किंवा बर्फ नसेल तेव्हा विमानवाहतूक दिल्ली ते श्रीनगर किंवा जम्मू अशी होऊ शकते.

कला

रेशमी व लोकरी शालींवर अप्रतिम भरतकाम, कशिदा, अक्रोडाच्या लाकडावरील कोरीवकाम, कागदलगद्याच्या सुंदर वस्तू, धातूच्या भांड्यांवरील नक्षी, लाखेरी लाकूडकारागिरी, वेताच्या करंड्या, नामांकित गालिचे, नमदे व चामड्याचे सफाईदार काम या कलांबद्दल काश्मीरची प्रसिद्धी भारताप्रमाणेच परदेशांतही आहे.

क्रिडा

पोलो हा तट्टांवर बसून खेळण्याचा मैदानी खेळ गिलगिट विभागातच प्रथम निघाला अशी परंपरागत समजूत आहे. तेथील लोक या खेळात प्रवीण असतात. श्रीनगरला होड्यांच्या शर्यती हा नव्यानेच सुरू केलेला खेळ लोकप्रिय झाला आहे.

पर्यटन

पर्यटनव्यवस्था व्यवसायाकडे शासनाने विशेष लक्ष पुरविले आहे. गुलमर्ग, चष्मशाही, कुकरनाग, अच्छीबल, दल सरोवर, पहलगाम इ. पर्यटन केंद्रे विकसित करण्यात आली आहेत. पर्यटकांसाठी विविध प्रकारचे निवास आणि क्रीडा यांची सोय केलेली आहे. पठाणकोट-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ८५ खास राज्यपरिवहन बसगाड्या धावतात.

प्रेक्षणीय स्थळांच्या सहलींसाठी आरामगाड्या व मोटारींची सोय केलेली आहे. ठिकठिकाणी निवास व खाद्यपेयांची व्यवस्था आहे. हिवाळी बर्फ खेळांचे केंद्र म्हणून गुलमर्गचा खास विकास करण्यात येत आहे. विमानाने, मोटारीने किंवा बसने प्रथम श्रीनगरला जाऊन तेथून सर्व ठिकाणी जाता येते. राज्याचे पर्यटन खाते प्रवाशांच्या सुखसोयी पाहण्यात तत्पर आहे.

प्रेक्षणीय स्थळे

निसर्गसौंदर्याचे वैभव काश्मीरमध्ये जगातील फारच थोड्या प्रदेशांस लाभले आहे. भारताचे नंदनवन ठरलेल्या या राज्यात श्रीनगरजवळची शालीमार, चष्मशाही, निशात, नसीम अशी रमणीय उद्याने गुलमर्ग, खिलनमर्ग, सोनमर्ग हे नयनमनोहर भूप्रदेश पहलगाम, अमरनाथ, लिद्दार दरी, हरमुख, नंगापर्वत अशी निसर्गदृश्ये वुलर, दल, मानसबल, गंगाबल, शेषनाग, कौंसरनाग, नीलनागसारखी सरोवरे अच्छीबल, कुकरनाग, व्हेरनाग, अनंतनागादी झरे पीर पंजाल, बनिहाल, झोजी, बुर्झिल अशा खिंडी मार्तंडमंदिर, वैष्णवदेवी, जम्मू-त्रिकुटा, तुलामुला, क्षीरभवानी, शंकराचार्य टेकडी, शारदा, दुर्गादेवी इ. प्राचीन मंदिरे श्रीनगरची शाह हमदान, हजरतबाल व पत्थर या मशिदी ही प्रेक्षणीय स्थळांत विशेष उल्लेखनीय आहेत.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment